Book Title: Mahapurana Part 2
Author(s): Jinsenacharya, Jindas Shastri
Publisher: Shantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
View full book text
________________
१२६)
महापुराण
(२८-१२९
बिभर्ति यः पुमान्प्राणान्परिभूतिमलीमसान् । न गुलिङगमात्रेण पुमानेष प्रतीयते ॥ १२९ स चित्रपुरुषो वास्तु चञ्चापुरुष एव वा । यो विनापि गुणः पोस्नर्नाम्नैव पुरुषायते ॥ १३० स पुमान्यः पुनीते स्वं कुलं जन्म च पौरुषः । भटब्रुवो जनो यस्तु तस्यास्त्वभवनिर्भुवि ॥ १३१ विजिगीषुतया देवा वयं नेच्छाविहारतः । ततोऽरिविजयादेव सम्पदस्तु सदापि नः ॥ १३२ बस्तुवाहनराज्याङगैराराधयति यः परम् । परभोगीणमेश्वयं तस्य मन्ये विडम्बनम् ॥ १३३ शरशाली प्रभुः कोऽपि मत्तोऽयं धनमिच्छति । धनायतोऽस्य दास्यामि निधनं प्रधनैः समम् ॥ १३४ विचूण्यनं शरं तावत्कोपाग्नः प्रथमेन्धनम् । करवाणीदमेवास्तु तनुशल्करुपेन्धनम् ॥ १३५ साक्षेपमिति संरम्भादुदीर्य गिरमूजिताम् । ब्यरंसीद्दशनजोत्स्ना संहरन्मगधामरः ॥ १३६
हे वीरानो, शने केलेल्या पराभवामुळे जो मळकट झालेल्या प्राणाना धारण करतो तो गुणानी पुरुष नसून तो केवळ पुरुषाच्या चिह्नांनीच पुरुष आहे असे समजावे ।। १२९ ।।
__ जो पुरुषात अवश्यक असणाऱ्या गुणावाचून पुरुष आहे. तो पुरुष नव्हे तो पुरुषाचे चित्र आहे किंवा तो पुरुषाचा पुतळा आहे असे मला वाटते ।। १३० ॥
जो आपल्या पराक्रमानी आपले कुल व जन्म पवित्र करतो त्यालाच पुरुष म्हणावे. पण जो व्यर्थ आपणाला वीरपुरुष म्हणवितो त्याची या पृथ्वीवर उत्पत्ति होणे व्यर्थच आहे
___ आम्ही स्वच्छन्दाने विहार-क्रीडा करीत असल्यामुळे देव झालो आहोत असे नाही तर शत्रूना जिंकण्याच्या इच्छेने देव झालो आहोत म्हणून आम्हाला नेहमी शत्रूना जिंकल्यामुळेच संपत्ति-ऐश्वर्य प्राप्त होवो ।। १३२ ।।
हे वीर हो, रत्नादिकांचे नजराणे पाठविणे अथवा हत्ती घोडे वगैरे वाहने देणे व शत्रुराजांच्या प्रधानमंत्री वगैरेना खूष ठेवणे इत्यादि साधनांनी जो शत्रूची आराधना करतो, सन्तुष्ट ठेवतो त्यांचे ऐश्वर्य हे परक्यांना भोगण्यासाठी आहे असे समजावे व हे त्याला लाजिरवाणे आहे असे मला वाटते ।। १३३ ।।
वीर हो, ह्या बाणावरून हा राजा माझ्यापासून धन मिळावे अशी इच्छा करीत आहे पण धनाची इच्छा करणा-या या राजाला मी युद्धात निधन-मरणच देणार आहे असे समजा ॥ १३४ ॥
हे वीर हो, या बाणाचे प्रथम तुकडे करून माझ्या कोपरूपी अग्नीचे ते इंधन-जळण बनवीन व हे वाणरूपी इंधन आपल्या लहान तुकड्यानी माझ्या कोपरूपी अग्नीला पेटविण्यास अधिक उपयोगी होईल ॥ १३५ ।।
याप्रमाणे त्या मागध देवाने रागाने जोरदार तिरस्कारयुक्त भाषण केले व आपल्या दातांच्या कांतीला संकुचित करून त्याने आपले भाषण संपविले ।। १३६ ।।
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org