Book Title: Mahapurana Part 2
Author(s): Jinsenacharya, Jindas Shastri
Publisher: Shantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
View full book text
________________
१३४)
महापुराण
(२८-१८३
भुजङ्गप्रयातम् बहामी भुजङ्गाःसरत्नःफणाप्रैः । समुत्क्षिप्य भोगान्खमुदीक्षमाणाः विभाव्यन्त एते तरङ्गोव्हस्तेऽता दीपिकौघा महावार्षिनेव ॥ १८३ भुजङ्गप्रयातैरिदं वारिराशेर्जलं लक्ष्यतेऽन्तःस्फुरद्रत्नकोटि ।। महानीलवेश्मेव दीपैरनेकैवलद्भिश्चलभिस्ततध्वान्तनुद्भिः ॥ १८४
मत्तमयूरवृत्तम् बाताघातात्पुष्करवाद्यध्वनिमुच्चस्तन्वानेऽब्धौ मन्द्रगभीरं कृतवास्याः ॥ छोपोपान्ते सन्ततमस्मिन्सुरकन्या। रंरम्यन्ते मत्तमयूरः सममेतैः ॥ १८५ नोलं श्यामाः कृतरवमुच्चधुतमोदा । विद्युद्वन्तः स्फुरितभुजङ्गोत्फणरत्नम् ॥ आश्लिष्यन्तो जलदसमूहा जलमस्य । व्यक्तं नोपवजितुमलं ते घनकाले ॥ १८६ पश्याम्भोधेरनुतटमेनां वनराजी । राजीवास्य प्रशमिततापां विततापाम् ॥ वेलोत्सर्पज्जलकणिकाभिः परिधौताम् । नीलां शाटीमिव सुमनोभिः प्रविकीर्णाम् ॥
या ठिकाणी आपले शरीर उंच उभे करून रत्नांनी सहित असलेल्या आपल्या फणाच्या अग्रभागानी आकाशाकडे पाहणारे हे सर्प या महासमुद्राने आपल्या तरंगरूप मोठया हातानी जणु हे दिव्यांचे समूह अर्थात् अनेक दिवट्या-मशाली धारण केल्या आहेत असे बाटते ॥ १८३ ॥
___ ज्याच्या आत सर्वांच्या फणावरील कोट्यवधि रत्ने चमकत आहेत असे हे समुद्राचे पाणी सर्वांच्या इकडे तिकडे फिरण्याने चोहीकडे फिरणारे, पसरलेल्या अंधकाराला नष्ट करणारे, प्रदीप्त-प्रकाशयुक्त झालेल्या अनेक दिव्यानी शोभत असलेले नीलमण्याच्या मोठ्या बाड्याप्रमाणे शोभत आहे असे वाटते ॥ १८४ ।।
हा समुद्र वाऱ्याच्या आघातामुळे नगाऱ्याप्रमाणे खोल व गंभीर असा शब्द अर्थात् गर्जना जेव्हा करतो तेव्हा नृत्य करीत असलेल्या या देवकन्या या द्वीपाच्या जवळ उन्मत्त झालेल्या या मोरांच्या थव्याबरोबर नेहमी पुष्कळ प्रकारच्या क्रीडा करतात ॥ १८५ ।।
काळ्या रंगाचे व मोठी गर्जना करून आपला आनंद व्यक्त करणारे, वारंवार ज्यात विजा चमकत आहेत असे हे मेघ, ज्यात सर्वांच्या वर उभारलेल्या फणावरील रत्ने चमकत
आहेत अशा समुद्राच्या पाण्याला अगदी चिकटून आलिंगन देत आहेत म्हणून हे ( मेघ ) वर्षाकालात अन्य ठिकाणी आकाशातून गमन करण्यास उत्सुक होत नाहीत असे स्पष्ट दिसत भाहे ।। १८६ ॥
हे कमलमुख राजेन्द्रा सूर्याच्या किरणापासून होणाऱ्या दाहाला मिटविणारी व जिच्यात पाणी पसरले आहे अशी आणि तीरावर पसरलेल्या जलकणानी धुतलेले अर्थात ओले झालेले जणु निळे वस्त्र आहे असा भास उत्पन्न करणारी ही समुद्रतीरावरील वनपंक्ती फुलांनी बनदी गजबजलेली आहे तिजकडे आपण पाहा ॥ १७ ॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org