________________
१३८)
महापुराण
(२८-२०१
स्रग्धरा वनद्रोण्याममष्य क्वथदिव जठरं व्यक्तमुढ दाम्बु । स्फूर्जत्पातालरन्ध्रोछ्वसदनिलबलाविष्वगावय॑मानम् ॥ प्रस्तीर्णानेकरत्नान्युपहरति जने नूनमुत्तप्तमन्तः। प्रायो रायां वियोगो जनयति महतोऽप्युग्रमन्तर्विदाहम् ॥ २०१
प्रहर्षिणी आयुष्मन्निति बहुविस्मयोऽयमब्धिः । सद्रत्नः सकलजगज्जनोपजीव्यः । गम्भीरप्रकृतिरनल्पसत्त्वयोगः । प्रायस्त्वामनहरते विना जडिम्ना ॥ २०२
वसन्ततिलक इत्थं वियन्तरि परां श्रियमम्बराशेरावर्णयत्यनुगतैर्वचनविचित्रः । प्राप प्रमोदमधिकं न चिराच्च सम्राट् सेनानिवेशमभियातुमना बभूव ॥ २०३
फार मोठ्या पातालरूपी छिद्रांच्या द्वारातून वर येणान्या व वाढणा-या वान्यांच्या वेगाने जो सर्व बाजूंनी फिरत आहे व ज्यात पाण्याचे अनेक बुडबुडे सारखे उत्पन्न होत आहेत अशा समुद्राचा मध्यभाग अर्थात् पोटाचा प्रदेश वज्राच्या कढईत उकळत आहे- कढत आहे असा भासत आहे अथवा या समुद्राची रत्ने इतस्ततः पसरली असल्यामुळे लोक नेहमी घेऊन जातात. यामुळे हा समुद्र मनातल्या मनात फार सन्तप्त होत आहे व हे सन्तप्त होणे याचे अयोग्य नाही. कारण धनाचा वियोग मोठमोठ्या व्यक्तींच्या मनातही भयंकर दाह उत्पन्न करीत असतो॥ २०१॥
हे दीर्घायुषी राजा, आपण जसे अनेक आश्चर्यानी भरलेले आहात, हा समुद्रही आपल्याप्रमाणे अनेक आश्चर्यानी भरलेला आहे. जसे आपल्याजवळ अनेक ( उत्तम ) रत्ने आहेत तसे हा समुद्रही अनेक (उत्तम ) रत्नांनी युक्त आहे, भरलेला आहे. हे राजन् जगातील सर्व जीव आपल्या साहाय्याने जगतात तसे सर्व जीव या समुद्राचे उपजीव्य आहेत, अर्थात् समुद्रात उत्पन्न झालेल्या रत्नानी, मोत्यानी व पाण्यानी लोक आपली उपजीविका करतात. जसे आपण गंभीर स्वभावाचे आहात तसा हा समुद्र देखील गंभीर अतिशय खोल स्वभावाचा आहे. हे प्रभो आपण जसे अनल्पसत्वयोग-अनन्त शक्तीच्या संबंधाने युक्त आहात तसे हाही अनल्पसत्त्वयोग-मोठ्या मगर मासे आदि जलचर प्राण्यानी युक्त आहे. या प्रकारे हा समुद्र आपले अनुकरण करीत आहे. पण अन्तर आहे ते असे आहे- हा जलाच्या समृद्धीने युक्त आहे व आपण जडिम्ना विना- मूर्खपणाने रहित आहात. आपण अतिशय सुज्ञ आहात तसा हा सुज्ञ नाही. हा मूर्ख आहे ॥ २०२ ।।
याप्रमाणे त्या सारथ्याने योग्य व मनोरम अशा अनेक विचित्र वचनानो समद्राच्या शोभेचे वर्णन केले व त्याने भरतराजाला आनंद झाला. नंतर लोकर आपल्या सेनेच्या छावणीत जाण्याची त्याला इच्छा झाली ।। २०३ ।।
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org