Book Title: Mahapurana Part 2
Author(s): Jinsenacharya, Jindas Shastri
Publisher: Shantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
View full book text
________________
२८-२०० )
महापुराण
शार्दूलविक्रीडित
अस्योपान्तभुवश्चकासति तरां वेलोच्छलन्मौक्तिकैः ॥ आकीर्णाः कुसुमोपहारजनितां लक्ष्मीं दधाना भृशम् ॥ सेवन्ते सहसुन्दरीभिरमरा याः स्वर्गलोकान्तरम् ॥ तन्वाना घृतसम्म दास्तटवनच्छायातरून् संश्रिताः ॥ १९८ एते ते मकरादयो जलचरा मत्वेव कुक्षिम्भरिम् । वारांराशिमनन्तरायमधिकं पुत्रा इवास्यौरसाः ॥ भागस्य प्रतिलिप्सया नु जनकस्याक्रोशतोऽप्यग्रतो । युध्यन्ते मिलिताः परस्परमहो बद्धक्रुधो धिग्धनम् ॥ १९९ लोकानन्दिभिरप्रमापरिगतं रुच्चावचैर्भोगिनाम् । आरूढैरधिमस्तकं शुचितमैः सन्तापविच्छेदिभिः ॥ पातालविनृताननं म्हुरपि प्राप्तव्ययंरक्षये ।
रासंसारममुष्य नास्ति विगमो रत्नैर्जलौघैरपि ॥ २००
वाहत चालला आहे व इकडे मोठमोठ्या माशांच्या शरीराना कंपित करणारा व हलणान्या लहरींच्या शब्दानी भयंकर भासणारा हा प्रचंड वायु वाहत आहे ॥ १९७ ॥
(१३७
या समुद्राच्या तीरावरील भूमि भरतीच्या वेळी वर उडालेल्या मोत्यांच्या समूहांनी भरून गेल्यामुळे पुष्पांचे समूह सर्वत्र पसरल्याप्रमाणे अतिशय सुंदर शोभेला धारण करीत आहेत व त्यावेळी या भूमि अन्य स्वर्ग जणु आहे अशा शोभतात. आणि त्यावेळी या किना-यावरील वृक्षांच्या सावलींचा आश्रय घेऊन आपल्या देवांगनासह देव येथे येऊन मोठ्या आनंदाने या भूमींचा आश्रय घेऊन क्रीडा करतात ।। १९८ ।।
Jain Education International
हे मगर, मासे वगैरे जलचर प्राणी या समुद्राला आपला जनक मानतात व आपण त्याचे औरसपुत्र आहोत असे समजतात. आपल्या पित्याजवळ अनन्त धन आहे असे मानून आपल्याला धनाचा हिस्सा मिळावा म्हणून आपसात भांडतात व आपला पिता असे भांडू नका असे म्हणत असताही रागावून आपसात लढाई करतात. यावरून अशा अनर्थाला कारण असलेल्या धनाचा धिक्कार असो असे मला वाटते ।। १९९ ॥
ज्यांनी आपली तोंडे उघडली आहेत अशी पाताले व वडवानल यांच्यामुळे वारंवार - हास पावूनही ज्यांचा केव्हांही नाश होत नाही, जी लोकांना आनंद देतात, जी प्रमाणरहित अगणित आहेत, अनेक प्रकारांची आहेत, जी सर्पाच्या मस्तकावर फणावर आरूढ झाली आहेत व जी अत्यंत पवित्र आहेत, ज्याच्यापासून संताप नष्ट होतो अशी रत्ने व पाण्याचे समूह यांचा संसार असेपर्यन्त केव्हाही नाश होत नाही. तात्पर्य- जरी या समुद्राची अनेक रत्ने पाताळांत व विवरात पडून नष्ट होतात आणि पुष्कळ पाणी वडवानलात जळून जाते तरीही याचे रत्नसमूह व जलसमूह कधीही विनाश पावत नाहीत. कारण ज्यांचा नाश होतो त्यापेक्षा अधिक रत्ने व जलसमूहाची नेहमी उत्पत्ति होत जात आहे ॥ २०० ॥
म. १८
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org