Book Title: Mahapurana Part 2
Author(s): Jinsenacharya, Jindas Shastri
Publisher: Shantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
View full book text
________________
२८-१९२)
महापुराण
(१३५
तोटकवृत्तम् परितः सरसीः सरसैः कमलैः । सुहिताः सुचिरं विचरन्ति मृगाः ॥ उपतीरममुष्य निसर्गसुखां । वसति निरुपद्रुतिमेत्य वने ॥ १८८ अनुतीरवनं मृगयूथमिदं कनकस्थलमुज्ज्वलितं रुचिभिः ॥ परिवीक्ष्य दवानलशङ्कि भृशं परिधावति धावति तीरभुवः ॥ १८९
प्रहषिणी लावण्यादयमभिसारयन्सरित्स्त्रीरास्रस्तप्रतनुजलांशुकास्तरङ्गः ॥ आश्लिष्यन्मुहुरपि नोपयाति तृप्ति सम्भोगैरतिरसिको न तृप्यतीह ॥ १९०
वसंततिलक रोषोभुवोऽस्य तनुशीकरवारिसिक्ताः समाजिता विरलमुच्चलितैस्तरङ्गः ॥ भान्तीह सन्ततलताविगलत्प्रसूननित्योपहारसुभगा द्युसदां निषेव्याः ॥ १९१
मन्दाक्रान्ता स्वर्गाद्यानश्रियमिद हसत्युत्प्रसूने वनेस्मिन् । मन्दाराणां सरति पवने मन्दमन्दं वनान्तात् ॥ मन्दाक्रान्ताः सललितपदं किञ्चिदारब्धगाना- ३चक्रम्यन्ते खगयुक्तयस्तीरदेशेष्वमुष्य ॥ १९२
या समुद्राच्या तटावरील वनात उपद्रवरहित व स्वभावतः सुखदायक अशा स्थानी येऊन सरस असे कलमी जातीचे साळीचे धान्य खाऊन पुष्कळ काळपर्यंत या तलावाच्या चारी बाजूस हरिण सुखाने राहतात ॥ १८८ ॥
या समुद्राच्या तीरावरील वनात आपल्या कान्तीनी चमकणारे सुवर्णाचे स्थल पाहून हा हरिणांचा समदाय दावानलाची शंका उत्पन्न झाल्यामुळे अतिशय लौकर किनाऱ्याच्या प्रदेशाकडे सर्व बाजूनी धावत आहे।। १८९ ॥
___ ज्यांचे जलरूपी पातळ वस्त्र काही खाली सरकले आहे अशा नद्यारूपी स्त्रियांना लावण्यामुळे सौंदर्यामुळे पक्षी-खारेपाण्यामुळे हा समुद्र आपल्याकडे बोलावून वारंवार त्यांना आपल्या तरंगरूपी हातानी आलिंगितो तथापि तो तृप्त होतच नाही. पण हे अगदी बरोबरच दिसते. कारण जो अतिशय रसिक अर्थात् कामी असतो तो स्त्रियांच्या पुष्कळ संभोगानेही तृप्त होत नाही ॥ १९० ॥
या समुद्राच्या किनाऱ्यावरील भूमि बारीक जलकणांनी नेहमी सिंचित होतात व विरळ उसळणाऱ्या तरंगानी धुराळा नाहीसा करून स्वच्छ केल्या जातात व यानंतर नेहमी वेळीच गळत असलेल्या पुष्पानी आच्छादित होऊन सुन्दर दिसतात अशा भमि देवानी सेव्य होतात अर्थात् अशा ठिकाणी देव येऊन क्रीडा करितात ।। १९१ ॥
आपल्या प्रफुल्ल पुष्पांनी स्वर्गातील बगीचाच्या सौंदर्याला जणु हसत आहे अशा मन्दार वृक्षांच्या वनात वारा मंद मंद रीतीने वाहत असतां गमतीने एकेक पाऊल टाकीत मंद चालणाऱ्या आणि काही गात असलेल्या या विद्याधरांच्या स्त्रिया या समुद्राच्या तीरावर हिंडत आहेत हे राजेन्द्रा आपण पाहा ॥ १९२ ।।
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org