Book Title: Mahapurana Part 2
Author(s): Jinsenacharya, Jindas Shastri
Publisher: Shantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
View full book text
________________
२८-१४४)
महापुराण
( १२७
ततस्तमूचुरभ्यर्णाः सुरा दृष्टपरम्पराः । प्रभुं शमयितुं क्रोधाद्विद्यावृद्धैः प्रभोः स्थितिः ॥ १३७ यथावसरमथ्यं च मितं च बहुविस्तरम् । अनाकुलं च गम्भीरं नाधियामीदृशं वचः ॥ १३८ सत्यं परिभवः सोढुमशक्यो ज्ञानशालिनाम् । बलवद्भिविरोधस्तु स्वपराभवकारणम् ।। १३९ सत्यमेव यशो रक्ष्यं प्राणैरपि धनैरपि । तत्तु प्रभुमनाश्रित्य कथं लभ्येत धीधनैः ॥ १४० अलब्धलाभो लब्धार्थपरिरक्षमित्यपि । द्वयमेतत्सुखाल्लभ्यं जिगीषोर्नाश्रयं विना ॥ १४१ बलिनामपि सन्त्येव बलीयांसो मनस्विनः । बलवानहमस्मीति नोत्सेक्तव्यमतः प्रभो ॥। १४२ न किञ्चिदप्यनालोच्य विधेयं सिद्धिकाम्यता । ततः शरः कुतस्त्योऽयं किमीयो वेति मृग्यताम् ॥ श्रुतं च बहुशोऽस्माभिराप्तीयं पुष्कलं वचः । जिनाश्चक्रधरैः सार्धं वर्त्स्यन्तीहेति भारते ॥ १४४
यानंतर त्याच्याजवळ असलेले व ज्यांनी कुलपरम्परा पाहिली आहे असे देव मागध देवाचा कोप शान्त करण्यासाठी याप्रमाणे बोलू लागले. हे योग्यच आहे. कारण ज्ञानवृद्ध अशा लोकानीच राजाची मर्यादा ठेविली जाते, सांभाळली जाते ॥ १३७ ॥
ते विद्यावृद्ध देव जे बोलले ते असे होते. त्यांचे भाषण प्रसंगाला अनुरूप होते. ते स्वल्प होते पण त्यात पुष्कळ अर्थ भरलेला होता, त्यात भीति व मोह बिलकुल नव्हता व ते गंभीर होते अर्थात् विचाराने भरलेले होते. असे भाषण अज्ञानीजनाला बिलकुल करता यावयाचे नाही ।। १३८ ।।
ते ज्ञानवृद्ध असे म्हणाले - " हे प्रभो, मानी लोकाना दुसन्यानी केलेला पराभव सहन करणे अशक्य असते. पण बलवान् लोकाशी विरोध केला तर तो आपल्या पराभवाला कारण होतो म्हणून बलवंताशी विरोध करणे योग्य नाही ।। १३९ ।।
13
" प्राण व धन या दोहोंच्या द्वारे खरोखर यशाचे रक्षण करावे. पण ते यश बलवान् प्रभूंचा आश्रय केल्याशिवाय शहाण्या लोकांना कसे बरे मिळेल ।। १४० ।।
""
"
'जी वस्तु मिळाली नाही ती प्राप्त करून घेणे व जी वस्तु मिळविली आहे तिचे चांगले रक्षण करणे या दोन्ही गोष्टी विजयी राजाच्या आश्रयावाचून सुखाने मिळत नसतात हे ध्यानात घेतले पाहिज ।। १४१ ।।
"या जगात जे कोणी बलवान् आहेत त्यांच्यापेक्षाही अधिक बलवान् व अधिक मानी पुष्कळ आहेत म्हणून हे प्रभो, मी बलवान् आहे असा अभिमान आपण करू नका ॥ १४२ ॥ " आपले कार्य अवश्य झाले पाहिजे असे इच्छिणान्याने कोणतेही कार्य विचार केल्यावाचून करू नये. यास्तव हा बाण कोठून आला, हा कोणाचा आहे याचा विचार
"
करा ।। १४३ ।।
"
'हे प्रभो, आम्ही पुष्कळ वेळा सर्वज्ञाचे वचन या भारतात चक्रवर्तीबरोबर जिनेश्वर होतील असे पुष्कळ वेळा ऐकिले आहे " ।। १४४ ॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org