Book Title: Mahapurana Part 2
Author(s): Jinsenacharya, Jindas Shastri
Publisher: Shantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
View full book text
________________
१२८)
महापुराण
(२८-१४५
नूनं चक्रिण एवायं जयाशंसी शरागमः । धूतान्घतमसो द्योतः सम्भाव्योऽन्यत्र कि रवेः ॥ १४५ अथवा खलु संशय्य चक्रपाणेरयं शरः । व्यनक्ति व्यक्तमेवैनं तन्नामाक्षरमालिका ॥ १४६ तदेनं शरमभ्यर्च्य गन्धमाल्याक्षतादिभिः। पूजाद्यैव विभोराज्ञा गत्वास्माभिः शरार्पणात् ॥ १४७ मा गा मागध वैचित्यं कार्यमेतद्विनिश्चिनु । न युक्तं तत्प्रतीपत्वं तव तद्देशवर्तिनः ॥ १४८ तदलं देव संरभ्य तत्प्रातीप्यं न शान्तये । महतः सरिदोघस्य कः प्रतीपं तरन्सुखी ॥ १४९ बलवाननुवर्त्यश्चेवनुनेयोऽद्य चक्रभृत् । महत्सु वैतसौं वृत्तिमामनन्त्यविपत्करीम् ॥ १५० इहामुत्र च जन्तूनामुन्नत्य पूज्यपूजनम् । पापं तत्रानुबध्नाति पूज्यपूजाव्यतिक्रमः ॥ १५१ इति तद्वचनात्किञ्चित्प्रबुद्ध इव तत्क्षणम् । अज्ञातमेवमेतत्स्यादित्यसो प्रत्यपद्यन ॥ १५२
" खरोखर जगद्विजयाला सुचविणारा हा बाण चक्रवर्तीचाच आहे. कारण दाट अंधकाराचा नाश करणारा प्रकाश सूर्यावाचून अन्य पदार्थात आढळून येतो काय ?"१४५ ॥
" अथवा या विषयात संशय नकोच. हा बाण चक्रवर्तीचाच आहे. कारण त्याच्या नावाची अक्षरपंक्ति आम्हाला हा बाण चक्रवर्तीचाच आहे असे स्पष्ट सांगत आहे "|| १४६ ।।
" म्हणून गन्ध, फुले, अक्षतादिकांनी बाणाची पूजा करावी व आजच चक्रवर्तीकडे जाऊन त्याला हा बाण अर्पण करावा व त्या प्रभूची आज्ञा आजच पूज्य मानावी" ॥ १४७ ।।
__ " हे मागधदेवा मन विकारी होऊ देऊ नकोस व या कार्याचा अवश्य विचार कर. आपण चक्रवर्तीच्या देशात राहत आहोत याचा विचार करून तूं त्यांच्या विरुद्ध राहणे हे योग्य नाही" ।। १४८ ॥
" म्हणून हे प्रभो, हा कोप आता पुरे. चक्रवर्तीच्या उलट वागणे हे केव्हाही शान्तीला कारण होणार नाही. कारण नदीच्या मोठ्या प्रवाहाच्या उलट पोहणारा कोण बरे सुखी होईल" ॥ १४९ ।।
" जर बलवान व्यक्तीला अनुसरावे असे म्हणशील तर तो चक्रवर्ती बलवान् आहे म्हणून आज त्याला आम्ही अवश्य खुष केले पाहिजे. कारण मोठ्यांच्या पुढे वेताच्या वृत्तीने वागणे (वेत जसा नदीच्या प्रवाहाला अनुसरून नम्र होतो ) हे विपत्तीला दुःखाला कारण होत नाही" ।। १५० ॥
" पूज्यांचे पूजन करणे, त्यांचा आदर करणे हे इहपरलोकी प्राण्यांच्या उन्नतीला-सुखाला कारण होते व पूज्यांचा अनादर करणे हे इहलोकी व परलोकी पापाला उत्पन्न करणारे आहे" ।। १५१।।
___याप्रमाणे त्यांच्या भाषणाने तो मागधदेव तत्काल जागा झाल्याप्रमाणे झाला व यांनी मला जे माहीत नव्हते ते आज मला शिकविले असे तो मानू लागला" ।। १५२ ॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org