Book Title: Mahapurana Part 2
Author(s): Jinsenacharya, Jindas Shastri
Publisher: Shantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
View full book text
________________
२८-१६०)
महापुराण
(१२९
ससम्भ्रममिवास्याभूच्चित्तं किञ्चित्ससाध्वसम् । साशङ्कमिव सोद्वेगं प्रबुद्धमिव च क्षणम् ॥१५३ ततः प्रसेदुषी तस्य न चिरादेव शेमुषी । पूर्वापरं व्यलोकिष्ट कोपापायात्प्रशेमुषी ॥ १५४ सोऽयं चक्रभृतामाद्यो भरतोऽलङध्यशासनः । प्रतीक्ष्यः सर्वथास्माभिरनुनेयश्च सादरम् ॥ १५५ चक्रित्वं चरमाङ्गत्वं पुत्रत्वं च जगद्गुरोः । इत्यस्य पूज्यमेकैकं किं पुनस्तासमुच्चितम् ॥ १५६ इति निश्चित्य सम्भ्रान्तैरनुयातः सुरोत्तमैः । सहसा चत्रिणं द्रष्टुमुच्चचाल स मागधः ॥ १५७ समुन्मणितिरीटांशुरचितेन्द्रशरासनम् । क्षणेनोल्लडध्य सम्प्रापत्तं देशं यत्र चक्रभृत् ॥ १५८ पुरोधाय शरं रत्नपटले सुनिवेशितम् । मागधः प्रभुमानसीदार्य स्वीकुरु मामिति ॥ १५९ चक्रोत्पत्तिक्षणे भद्र यन्नायामोऽनभिज्ञकाः । महान्तमपराध नस्तं क्षमस्वाथितो महुः ॥ १६०
त्यावेळी त्या मागधदेवाचे चित्त थोडेसे व्यग्र झाले, थोडीशी भीतिही त्याला वाटली. थोडा संशयही उत्पन्न झाला व त्याचे मन खिन्न झाले व पूर्वीचे अज्ञान नाहीसे होऊन ते चांगले जागेही झाले ॥ १५३ ॥
यानंतर लौकरच त्याची बुद्धि प्रसन्न झाली व कोप नाहीसा झाल्यामुळे प्रशम धारण करून मागच्या व पुढच्या कालाचा तो विचार करू लागला ॥ १५४ ।।
हा भरत सर्वचक्रीमध्ये पहिला चक्रवर्ती आहे, याची आज्ञा उल्लंघता येणार नाही. हा आमच्याकडून सर्वप्रकारे पूजिला गेला पाहिजे व आम्ही त्याला पूर्णपणे सन्तुष्ट केले पाहिजे ।। १५५ ॥
___ हा भरतराजा चक्रवर्ती आहे, तद्भवमोक्षगामी आहे व आदिभगवंताचा पुत्रही आहे. यांच्यातील एकेक धर्म देखिल पूज्य आहे. मग या तीन धर्माचा समुदाय यांच्यात असल्यामुळे तो पूज्य आहे हे सांगण्याची आवश्यकताच नाही ॥ १५६ ॥
या सर्व गोष्टींचा निश्चय केला व त्वरा करणाऱ्या त्या सर्व उत्तम देवासह चक्रवर्तीला पाहण्यासाठी तो मागधदेव एकदम निघाला ।। १५७ ॥
ज्यांचे किरण वर पसरले आहेत, अशा रत्नांच्या किरीटाने ज्याने इन्द्रधनुष्य उत्पन्न केले आहे असा तो मागधदेव शीघ्र आकाशाचे उल्लंघन करून जेथे चक्रवर्ती भरत होता तेथे आला ॥ १५८॥
रत्नखचित करंड्यात ठेवलेला तो बाण त्या देवाने पुढे ठेवला व हे प्रभो, माझा आपण स्वीकार करा असे म्हणून त्याने चक्रवर्तीला नमस्कार केला ॥ १५९ ॥
हे प्रभो, आपणास चक्ररत्नाची प्राप्ति झाली त्यावेळी आम्हाला न समजल्यामुळे आम्ही आलो नाही. हा आमच्याकडून मोठा अपराध घडला आहे. आपण आम्हाला क्षमा करावी अशी त्याने वारंवार प्रार्थना केली ।। १६० ।।
म.१७
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org