Book Title: Mahapurana Part 2
Author(s): Jinsenacharya, Jindas Shastri
Publisher: Shantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
View full book text
________________
२८-१२८)
महापुराण
(१२५
अहं हि भरतो नाम चक्री वृषभनन्दनः । मत्साद्भवन्तु मद्भुक्तिवासिनो व्यन्तरामराः ॥१२० इति व्यक्तलिपिन्यासो दूतमुख्य इव द्रुतम् । स पत्री चक्रिणा मुक्तः प्रामुखीमास्थितो गतिम् ॥ जितनिर्घातनिर्घोषं ध्वनि कुर्वन्नभस्तलान् । व्यपतन्मागधावासे तत्सैन्यक्षोभमानयन् ॥ १२२ । किमेष क्षुभितोऽम्भोधिः कल्पान्तपवनाहतः । निर्घातः किं स्विदुद्ध्वान्तो भूमिकम्पो नु जम्भते ॥ इत्याकुलाकुलधियस्तनिकायोपगाः सुराः । परिवव्ररुपेत्यैनं सन्नद्धा माग प्रभम् ॥ १२४ देव दीप्रः शरः कोऽपि पतितोऽस्मत्सभाङगणे । तेनायं प्रकृतः क्षोभो न किञ्चित्कारणान्तरम् ॥ येनायं प्रहितः पत्री नाकिना दानवेन वा । तस्य कतुं प्रतीकारमिमे सज्जा वयं प्रभो ॥ १२६ इत्यारक्षिभरेस्तर्णमेत्य विज्ञापितः प्रभः। अलमाध्वं भटालापरित्यचः प्रत्यवाच तान ॥ १२७ यूयं त एव मद्गृह्याः सोऽहमेवास्मि मागधः । श्रुतपूर्वमिदं किं वः सोढपूर्वो मयेत्यरिः॥ १२८
मी वृषभदेवाचा पुत्र भरत चक्रवर्ती आहे. माझ्या ताब्यात असलेल्या प्रदेशात राहणारे जे व्यंतरदेव आहेत त्यांनी माझ्या अधीन असले पाहिजे अशा अभिप्रायाची अक्षरे ज्यावर आहेत असा जणु मुख्य दूत की काय असा बाण भरतराजाने सोडला तेव्हां तो पूर्वदिशेकडे निघाला ॥ १२०-१२१ ॥
विजेच्या कडकडाटाला जिंकणारा अशा ध्वनीला करणारा तो बाण आकाशातून मागध नावाच्या व्यंतर राजाच्या निवासस्थानी पडला व त्यावेळी त्या व्यंतरदेवाच्या सैन्यात मोठा क्षोभ उत्पन्न झाला. त्या सैन्यात मोठी धांदल उडाली ।। १२२ ॥
कल्पान्तकालाच्या वाऱ्याच्या आघाताने हा समुद्र खवळला आहे काय ? किंवा अतिशय भयंकर शब्द करणारा हा विजांचा कडकडाट आहे काय ? किंवा हा भूमिकम्प वाढू लागला आहे काय ? ।। १२३ ।।
__ याप्रमाणे विचार मनात उत्पन्न होऊन ज्यांना फार भय वाटत आहे असे त्या व्यंतरनिकायाचे देव त्या मागध देवाकडे आले व त्याला घेरून याप्रमाणे बोलू लागले ।। १२४ ॥
हे प्रभो, एक अतिशय तेजस्वी बाण आमच्या सभागृहाच्या अंगणात येऊन पडला व त्यामुळे हा क्षोभ उत्पन्न झाला आहे. याशिवाय दुसरे काही कारण नाही ॥ १२५ ।।
हे प्रभो, कोणी स्वर्गीय देवाने किंवा दानवाने हा बाण पाठविला आहे. तेव्हा त्याचा प्रतिकार करण्यास आम्ही सर्व आज तयार झालो आहोत ॥ १२६ ॥
___ याप्रमाणे सभागृह रक्षणाकरिता नेमलेल्या वीरांनी शीघ्र येऊन आपल्या मालकाला विनंती केली. तेव्हां हे वीरहो आता तुमचे भाषण पुरे करा असे मागधदेवाने म्हटले व तो याप्रमाणे त्यांना बोलला ।। १२७ ॥
हे देवांनो माझे स्वामित्व ज्यांच्यावर आहे असे तुम्ही माझेच पूर्वीचे देव आहात व मीही तोच पूर्वीचा तुमचा स्वामी असा मागध देव आहे. मी माझ्या शत्रूचे हे कृत्य पूर्वी कधी सहन केले आहे काय ? व तुम्ही पूर्वी कधी हे ऐकले आहे काय ? ॥ १२८ ।।
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org