Book Title: Mahapurana Part 2
Author(s): Jinsenacharya, Jindas Shastri
Publisher: Shantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
View full book text
________________
१२४)
महापुराण
(२८-११२
क्षणं रथाअगसङ्गट्टाज्जलमब्धेद्विधाभवत् । व्यभावि भाविनां वर्त्म चक्रिणामिव सूत्रितम् ॥ ११२ रथोऽस्याभिमतां भूमि प्रायात्सारथिचोदितः । मनोरथोऽपि संसिद्धि पुण्यसारथिनोदितः ॥ ११३ गत्वा कतिपयान्यब्धौ योजनानि रथः प्रभोः। स्थितोऽन्तर्जलमाक्रम्य प्रस्ताश्व इव वाद्धिना ॥११४ द्विषड्योजनमागाह्य स्थिते मध्येर्णवं रथे । रथाङ्गपाणिराक्रुष्टो जग्राह किल कार्मुकम् ॥ ११५ स्फुरज्ज्यं वज्रकाण्डं तद्धनुरारोपितं यदा । तदा जीवितसन्देहदोलारूढमभूज्जगत् ॥ ११६ स्फुरन्मौर्वीरवस्तस्य मुहुः प्रध्वानयन्दिशः । प्रक्षोभमनयद्वाद्धिचलत्तिमिकुलाकुलम् ॥ ११७ संहार्यः किममष्याब्धिरुत विश्वमिदं जगत् । इत्याशडक्य क्षणं तस्थे तदानभसि खेचरः॥ ११८ वक्रेऽपि गुणवत्यस्मिन्नृजुकर्मणि कार्मुके । अमोघं सन्दधे बाणं श्लाघ्यं स्थानकमास्थितः ॥ ११९
रथाच्या चाकांच्या घर्षणामुळे समुद्राचे पाणी दुभागले जाई. जणु पुढे होणारे जे सगरादि चक्रवर्ती त्यांच्यासाठी दोरी लावून मार्ग तयार केला आहे की काय ? असे वाटलें ।। ११२॥
सारथ्याने हाकाललेला रथ भरतेशाला जे स्थान इष्ट होते तेथे जाऊन पोहोचला व पुण्यरूपी सारथ्याने प्रेरिलेल्या राजाच्या मनोरथाचीही सिद्धि झाली. इष्टस्थली रथ पोहोचल्याने राजाचे मनोरथही पूर्ण झाले ॥ ११३ ।।
भरतराजाचा रथ समुद्रात कांही योजन जाऊन, पाण्यामध्ये उभा राहिला. जणु समुद्राने आक्रमण करून त्यांच्या रथाचे घोडे थांबविले होते ।। ११४ ।।
तो रथ बारा योजने जाऊन समुद्रात उभा राहिला. यानंतर रागावलेल्या चक्रवर्तीने भापल्या हातात धनुष्य घेतले ॥ ११५ ॥
ज्याची दोरी चमकत आहे व ज्याचा बाण वज्राचा आहे असे धनुष्य जेव्हा चक्रवर्तीने सज्ज्य केले तेव्हां हे सगळे जगत् जीविताच्या संशयरूपी झोक्यावर आरूढ झाल्याप्रमाणे वाटले ।। ११६ ॥
चोहीकडे पसरून सर्व दिशांना दणाणून टाकणा-या त्या धनुष्याच्या दोरीच्या टंकारानी समुद्र अतिशय प्रक्षुब्ध झाला व मासे चोहीकडे धावू लागले ॥ ११७ ।।
हा भरतराजा समुद्राचा नाश करणार आहे ? का या सगळ्या जगाचा नाश करणार आहे ? अशा संशयाने त्यावेळी आकाशात सर्व विद्याधर क्षणपर्यन्त उभे राहिले ॥ ११८ ॥
___ जे वक्र असूनही गुणवान् आहे ( पक्षी- दोरीने सहित आहे. ) व सरल कार्य करणारे आहे. ( सरळ अशा बाणाला सोडणारे आहे ) अशा धनुष्यावर त्याने व्यर्थ न होणारा असा बाण जोडला व स्वतः वैशाखस्थानाने उभा राहिला. ( डावा पाय पुढे व उजवा पाय मागे करून उभे राहणे याला वैशाख स्थान म्हणतात ) ॥ ११९ ।।
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org