Book Title: Mahapurana Part 2
Author(s): Jinsenacharya, Jindas Shastri
Publisher: Shantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
View full book text
________________
६०)
महापुराण
(२५-२१८
धाम्नां पते तवामूनि नामान्यागमकोविदः । समुच्चितान्यनुध्यायन्पुमान्पूतस्मृतिर्भवेत् ॥ २१८ गोचरोऽपि गिरामासां त्वमवाग्गोचरी मतः । स्तोता तथाप्यसन्दिग्धं त्वत्तोऽभीष्टफलं भजेत् ॥ त्वमतोऽसि जगद्वन्धुस्त्वमतोऽसि जगद्भिषक् । त्वमतोऽसि जगद्धाता त्वमतोऽसि जगद्धितः॥ त्वेमकं जगताञ्ज्योतिस्त्वं द्विरूपोपयोगभाक् । त्वं त्रिरूपैकमुक्त्यङ्गः स्वोत्थानन्तचतुष्टयः ॥ २२१
ञ्चब्रह्मतत्त्वात्मा पञ्चकल्याणनायकः। षड्भेदभावतत्त्वज्ञस्त्व सप्तनयसङग्रहः ॥ २२२ दिव्याष्टगणमूर्तिस्त्वं नवकेवललब्धिकः । दशावतारनिर्धार्यो मां पाहि परमेश्वर ॥ २२३
ते धर्मपाल आहेत ॥ १०६ ।। जगत्पाल- जगताच्या मनाचे रक्षण करणारे प्रभु जगत्पाल आहेत ॥१०७॥ धर्मसाम्राज्यनायक-- धर्मरूप सर्व साम्राज्याचे प्रभु नायक-स्वामी आहेत ॥१०८॥
हे महातेजस्वी जिनेश्वरा, आगमाच्या जाणत्या विद्वानांनी तुझी ही नांवे वेचून काढलेली आहेत. या नांवाचे वारंवार चिन्तन करणारा भक्त पुरुष ज्याची स्मृति पवित्र झाली आहे असा होईल ।। २१८ ।।
हे प्रभो, या हजार नामशब्दांचा जरी आपण विषय झालेले आहात तरी आपण आमच्या वाणीचा विषय झालेले नाहीत. कारण आपले यथार्थ वर्णन करणे कोणालाही शक्य नाही तरी पण आपली स्तुति करणारा भक्त आपणापासून निःसंशय इच्छित फलाला मिळवील ।। २१९ ॥
हे प्रभो, आपण जगाचे बन्धु-हितकर्ते आहा. तसेच आपण जगताच्या मानसिक व शारीरिक पीडा नाहीशा करणारे जगद्वैद्य आहात. हे प्रभो, आपण जगाचे पोषण करणारे व जगाचे हितकर्ते आहात ॥ २२० ॥
हे प्रभो, आपण या त्रैलोक्याला प्रकाशित करणारे मुख्य तेज आहात. आपण केवलज्ञान व केवलदर्शन या दोन उपयोगांनी पूर्ण झालेले आहात. सम्यग्दर्शन, सम्यग्ज्ञान व सम्यक्चारित्र या रत्नत्रयाचे संमेलनरूप एक मुक्तीचे अङ्ग आहात व आपल्या आत्म्यापासून अनन्त चतुष्टय ( अनन्तज्ञान, अनन्तदर्शन, अनन्तसुख व अनन्तशक्ति ) उत्पन्न झाले आहे ।। २२१ ॥
हे प्रभो, आपण पञ्चपरमेष्ठिस्वरूपाचे आहात, ( अर्हत्, सिद्ध, आचार्य, उपाध्याय आणि साधु) आणि आपण पञ्चकल्याणाचे स्वामी आहात. हे भगवन्ता, आपण सहा प्रकारच्या द्रव्यांचे स्वरूप जाणत आहात (जीव, पुद्गल, धर्म, अधर्म, आकाश व काल ). हे आदिभगवंता, आपण नेगमादि सात नयांचा संग्रहस्वरूप आहात (नैगम, संग्रह, व्यवहार, ऋजुसूत्र, शब्द, समाभिरूढ व एवंभूत ) ॥ २२२ ॥
- हे प्रभो, आपण सम्यक्त्वादि आठ दिव्य गुणांची मूर्ति आहात ( सम्यक्त्व, केवलज्ञान, केवलदर्शन, वीर्य, सूक्ष्मत्व, अगुरुलघु, अव्याबाधता, अवगाहन). आपण नऊ केवललब्धींनी विराजमान आहात. (क्षायिक सम्यग्दर्शन, क्षायिकज्ञान-केवलज्ञान, यथाख्यातचारित्र, दान, लाभ, भोग, उपभोग वीर्य व केवलदर्शन ) व महाबलादि दहा जन्मानी आपण निश्चयाने जाणण्यास योग्य आहात यास्तव हे परमेश्वरा, आपण माझे रक्षण करा ॥ २२३ ॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org