Book Title: Mahapurana Part 2
Author(s): Jinsenacharya, Jindas Shastri
Publisher: Shantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
View full book text
________________
२७-८४)
सक्रीडतां रथाङ्गानां स्वनमाकर्णयन्मुहुः । हरिणानामिदं यूथं नापसर्पति वर्त्मनः ॥ ७७ हरिणीप्रेक्षितेष्वेताः पश्यन्ति सकुतूहलम् । स्वां नेत्रशोभां कामिन्यो बर्हिबर्हेषु मूर्धजान् ॥ ७८ इत्यनाकुलमेवेदं सैन्यैरप्याकुलीकृतम् । वनमालक्ष्यते विष्वग सम्बाधमृगद्विजम् ॥ ७९ जरठोsप्यातपो नायमिहास्मान्देव बाधते । वने महातरुच्छायानैरन्तर्यानुबन्धिनि ॥ ८० इमे वनमा भान्तिसान्द्रच्छाया मनोरमाः । त्वद्भक्त्यै वनलक्ष्म्येव मण्डपा विनिवेशिताः ॥ ८१ सरस्यःस्वच्छसलिला वारितोष्णास्तटद्रुमाः । स्थापिता वनलक्ष्म्येव प्रपा भान्ति क्लमच्छिदः ॥ बहुबाणासनाकीर्णमिदं खड्गिभिराचितम् । सहास्तिकमपर्यन्तं वनं युष्मद्वलायते ॥ ८३ इत्थं वनस्य सामृद्धयं निरूपयति सारथौ । वनभूमिमतीयाय सम्राडविदितान्तराम् ॥ ८४
महापुराण
हे प्रभो, क्रीडा करीत चाललेल्या अर्थात् सावकाश चाललेल्या या रथांच्या चाकांचा safe वारंवार ऐकूनही हा हरिणांचा कळप मार्ग सोडून बाजूला सरकत नाही ।। ७७ ।।
(९९
या स्त्रिया हरिणींच्या डोळयामध्ये आपल्या डोळ्यांची शोभा कौतुकाने पाहत आहेत व मोराच्या पिसान्याचे ठिकाणी आपल्या केशांची शोभा कौतुकाने पाहत आहेत ॥७८॥
हे राजन् तुझ्या सैन्याने जरी हे वन आकुल केले आहे तथापि ते आकुलतारहित आहे अर्थात् सैन्याने कोणाला पीडा दिली नाही म्हणून हे वन चारी बाजूनी पशु व पक्षी यांना बाधा दिली नसल्यामुळे शान्त दिसत आहे ।। ७९ ।।
हे प्रभो, हा वाढलेला असाही सूर्याचा ताप आम्हाला येथे बाधा देत नाही. कारण मोठमोठ्या वृक्षांच्या सावलींचा या प्रदेशात निरंतर संबंध आहे म्हणून येथे सूर्याचे कडक उन्ह आम्हाला बिलकुल बाधक होत नाही ॥ ८० ॥
हे प्रभो, दाट सावलीचे हे मनोहर वनवृक्ष जणु आपल्याविषयीच्या भक्तीने वनलक्ष्मीने मंडप उभे केल्याप्रमाणे दिसतात ॥ ८१ ॥
तटावरील वृक्षानी ज्यावर पडणा-या सूर्याचे उन्हाचे निवारण केले आहे अशी ही स्वच्छ पाण्याची सरोवरे वाटसरूचे श्रम नष्ट करण्यासाठी वनलक्ष्मीने स्थापन केलेल्या जणु पाणपोया आहेत असे वाटते ।। ८२ ।।
हे प्रभो, हे वन आपल्या सेनेसारखे वाटत आहे, कारण आपली सेना बहुबाणासनाकीर्ण आहे अर्थात् पुष्कळ धनुष्यानी युक्त आहे तसे हे वनही बाण नावाचे वृक्ष व आसण्याची झाडे यानी युक्त आहे. आपली सेना खड्गी - तरवारधारी वीर पुरुषानी युक्त आहे व हे वन खड्गी - गेंडे यानी युक्त आहे. आपली सेना हत्तींनी युक्त आहे व हे वनही सहास्तिक अनेक वनगजानी युक्त आहे. आपल्या सेनेचा अन्त जसा लागत नाही तसे या वनाचाही अन्त लागत नाही म्हणून आपल्या सैन्याप्रमाणे हे वन आहे ।। ८३ ।।
Jain Education International
याप्रमाणे वनभूमीच्या समृद्धीचे वर्णन सारथी करीत असता, जिच्या लांबी-रुंदीचे ज्ञान नाही अशा त्या वनलक्ष्मीला त्या सम्राटाने उल्लंघिले ॥ ८४ ॥
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org