________________
२७-१५०)
महापुराण
(१०७
जनतोत्सारणव्यग्रमहादौवारपालकम् । कृतमङ्गलनिर्घोषं वाग्देव्येव कृतास्पदम् ॥ १४६ चिरानुभूतमप्येवमपूर्वमिव शोभया । नृपो नृपाङ्गणं पश्यन् किमप्यासीत्सविस्मयः ॥ १४७ निधयो यस्य पर्यन्ते मध्ये रत्नान्यनन्तशः। महतः शिबिरस्यास्य विशेषं को नु वर्णयेत् ॥ १४८
शार्दूलविक्रीडितम्स श्रीमानिति विश्वतः स्वशिबिरं लक्ष्म्या निवासायितम् । पश्यन्नात्तधृतिविलाध्य विशिखाः स्वर्गापहारिश्रियः ॥ सम्भ्राम्यत्प्रतिहाररुद्धजनतासम्बाधमुत्केतनम् । प्राविक्षत्कृतसग्निवेशमचिरावात्मालयं श्रीपतिः ॥ १४९ तत्राविष्कृतमङ्गले सुरसरिद्वीचीभुवा वायुना। सम्मृष्टाङ्गणवेदिके विकिरता तापच्छिदः शीकरान् । शस्ते वास्तुनि विस्तृते स्थपतिना सद्यः समुत्थापिते ।। लक्ष्मीवान्मुखमावसन्निधिपतिः प्राची दिशं निर्जयन् ॥ १५०
आत प्रवेश करीत आहेत अशा गर्जना करीत असलेल्या समुद्राप्रमाणे ते राजांगण शोभत होते ॥ १४५ ॥
या अंगणाच्या दरवाजावर उभे राहिलेले द्वारपाल लोकांची गर्दी हटविण्यात दंग झाले होते व अंगणात मंगलशब्द होत होते. त्यामुळे सरस्वतीदेवी येथे निवास करीत आहे असे वाटत होते ।। १४६ ॥
भरतराजाने असे दृश्य पुष्कळ वेळा अनुभविले होते, पाहिले होते तथापि हे शोभेने अपूर्व आहे असे त्याला वाटले व ते राजांगण पाहत असता त्याला वर्णन न करता येणारे आश्चर्य वाटले ॥ १४७ ॥
ज्याच्या सभोवती नऊ निधिमध्ये अनेक प्रकारची अनंतरत्ने आहेत अशा मोठ्या छावणीची शोभा वर्णन करण्यास कोण बरे समर्थ होईल ।। १४८ ॥
सर्व बाजनी जे लक्ष्मीचे निवासस्थान बनले आहे अशा शिबिराला पाहणाऱ्या त्या लक्ष्मीसंपन्न भरतराजाला मोठा संतोष वाटला. स्वर्गाच्या शोभेचे हरण करणाऱ्या अनेक मार्गाला उल्लंघून राजा भरत आपल्या शिबिराजवळ आला. दरवाजावर पुढे द्वारपाल फिरत होते व ते लोकांची गर्दी हटवीत होते. शिबिरावर ध्वज फडकत होता. त्या शिबिराच्या अनेक विभागांची रचना सुंदर होती. अशा त्या शिबिरातील आपल्या वाड्यात लक्ष्मीपति भरताने प्रवेश केला ॥ १४९ ॥
_स्थपतिरत्नाने विस्तृत व प्रशस्त असा राजवाडा तत्काळ रचला होता. त्यात दर्पण वगैरे अष्टमंगलद्रव्ये स्थापिली होती. त्या वाड्याच्या अंगणातील वेदिका देवनदीच्या तरंगापासून
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org