Book Title: Mahapurana Part 2
Author(s): Jinsenacharya, Jindas Shastri
Publisher: Shantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
View full book text
________________
११०)
महापुराण
(२८-९
जयद्विरदमारूढो ज्वलज्जैत्रास्त्रभासुरः । जयलक्ष्मीकटाक्षाणामगमत्स शरव्यताम् ॥ ९ महामुकुटबद्धानां सहस्राणि समन्ततः । तमनुप्रचलन्ति स्म सुराधिपमिवामराः ॥१० दूरमद्य प्रयातव्यं निवेष्टव्यमुपार्णवम् । त्वरध्वमिति सेनान्यः सैनिकानुदतिष्ठिपन् ॥ ११ त्वर्यतां प्रस्थितो देवो दवीयश्च प्रयाणकम् । बलाधिकारिणामित्थं वचो बलमचिक्षुभत् ॥ १२ अद्यासिन्धु प्रयातव्यं गङ्गाद्वारे निवेशनम् । संसाध्यो मागधोऽद्यैव विलंघ्य पयसां निधिम् ॥ १३ समुद्रमद्य पश्यामः समुद्रङ्गत्तरङ्गकम् । समुद्रलङ्घनेऽद्यैव समुद्रं शासनं विभोः ॥ १४ भन्योन्यस्येति सञ्जल्पैः सम्प्रास्थिषत सैनिकाः। प्रयाणभेरीप्रध्वानस्तदोद्यन्द्यामदिध्वनत् ॥ १५ ततः प्रचलिता सेना सानुगङ्ग धृतायतिः । मिमानेव तदायाम पप्रथे प्रथितध्वनिः ॥ १६
प्रभू भरत जयशाली हत्तीवर आरुढ झाला होता. उज्ज्वल व जयशाली अस्त्रांनी तो फार तेजस्वी दिसत होता. जणु जयलक्ष्मी आपले नेत्र कटाक्ष त्याच्यावर फेकून त्याला विद्ध करीत आहे असे वाटत असे ॥ ९ ॥
___ जसे इंद्राच्या मागून हजारो देव जातात तसे या सम्राटाच्या मागून हजारो मुकुटबद्ध महाराजे सर्व बाजूंनी चालले होते ॥ १० ॥
" आज फार दूर प्रयाण करावयाचे आहे, आज समुद्राजवळ मुक्काम करावयाचा आहे. यासाठी त्वरा करा" असे म्हणून अनेक सेनापतीनी सर्व सैनिकांना उठविले ॥ ११ ॥
" उठा. त्वरा करा. भरत महाराजानी पुढे प्रयाण केले आहे व आपणा सर्वाना फार दूर जाऊन मुक्काम करावयचा आहे, तुम्ही मोठ्या त्वरेने चालले पाहिजे. असे सेनापतीचे सर्व भाषण ऐकून सर्व सैन्यात मोठी गडबड उत्पन्न झाली ॥ १२ ॥
___आज समुद्रापर्यन्त प्रयाण करावयाचे आहे व गंगा जेथे समुद्राला मिळते तेथे मुक्काम करावयाचा आहे व आजच समुद्रात प्रवेश करून आजच तेथे राहणाऱ्या मागध देवाला जिंकावयाचे आहे ॥ १३ ॥
ज्यातील लाटा उंच उसळत आहेत अशा समुद्राला आपण सर्वानी बघावयाचे आहे व आजच समुद्र उल्लंधिला पाहिजे. असा महाराजांचा मोर्तब होऊन आज्ञा झाली आहे यास्तव प्रयाण वेगाने करा ।। १४ ॥
सर्व सैनिकही एकमेकांना वरच्याप्रमाणे सांगून प्रयाण करू लागले व त्यावेळी प्रयाणसूचक नगन्यांचा मोठा आवाज वर आकाशात पसरून सर्वत्र त्याने आकाश व्यापलें ॥ १५ ॥
____ यानंतर गंगानदीला अनुसरून जिने आपली लांबी धारण केली आहे व जिची लांबी मोजण्याकरिता जी लांब पसरली आहे व जिचा ध्वनि पसरला आहे अशी ती चक्रिसेना प्रयाण करू लागली ॥ १६ ॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org