________________
२८-३७)
महापुराण
(११३
नासौ व्यापारितो हस्तो मौर्वी धनुषि नापिता । केवलं प्रभुशक्त्यैव प्राची दिग्विजितामुना ॥ ३० गोकुलानामुपान्त्येषु सोऽपश्यद्यवबल्लवान् । वनवल्लीभिराबद्धजटकान्गोभिरक्षिणः ॥ ३१ मन्थाकर्षश्रमोद्भूतस्वेदबिन्दुचिताननाः । मथ्नतीः सकुचोत्कम्पं सलीलत्रिकनर्तनः ॥ ३२ मन्थरज्जुसमाकृष्टिक्लान्तबाहूः श्लपांशकाः । स्रस्तस्तनांशुका लक्ष्यत्रिवलीभङगुरोदराः ॥ ३३ क्षुब्धाभिघातोच्चलितस्थूलगोरसबिन्दुभिः । विरलैरङ्गसंलग्नः शोभा कामपि पुष्णतीः ॥ ३४ मन्थारवानुसारेण किञ्चिदारब्धमूर्च्छनाः । विस्रस्तकबरीबन्धाः कामस्येव पताकिकाः ॥ ३५ गोष्ठाङगणेषु संलापैः स्वरमारब्धमन्थनाः । प्रभुर्गोपवधूः पश्यन्किमप्यासीत्समुत्सुकः ॥ ३६ बने वनगजर्जुष्टे प्रभुमेनं वनेचराः । वन्तर्वनकरीन्द्राणामद्राक्षुः सह मौक्तिकः ॥ ३७
...........
__ या भरतेशाने कधी आपल्या हातात तरवार घेतली नाही व धनुष्यावर दोरी बढविली नाही. परन्तु याने फक्त आपल्या प्रभु शक्तीनेच- विशिष्ट राजतेजानेच पूर्व दिशा जिंकली ॥ ३० ॥
__ ज्यानी आपले केश वनातील वेलीनी बांधले आहेत व जे गाई म्हशींचे रक्षण करितात अशा तरुण गवळयाना गायींच्या कळपाजवळ भरतेशाने पाहिले ॥ ३१ ॥
रवीची दोरी सारखी ओढल्यामुळे झालेल्या श्रमापासून उत्पन्न झालेल्या घामाच्या बिंदूनी ज्यांचे मुख भरून गेले आहे व दही घुसळीत असता ज्यांचे स्तन व ढुंगणही हलत आहेत, वारंवार रवीची दोरी ओढीत असता ज्यांचे बाह थकले आहेत. ज्यांचे वस्त्र दिले झाले आहे. स्तनावरील वस्त्र खाली गळाल्यामुळे ज्यांच्या कृश पोटावरील त्रिवळी दिसत आहेत ।। ३२-३३ ।।
रवीच्या घुसळण्यामुळे क्षुब्ध होऊन वर उसळलेले व स्थूल असे जे गोरसाचे-दह्याचे बिंदु ते ज्यांच्या अंगाला चिकटलेले आहेत, त्यामुळे त्या गवळणींच्या अंगाला काही अपूर्व शोभा आली होती ॥ ३४ ।।।
दही घुसळताना होणारा जो शब्द त्याला अनुसरून चढ-उताराचे गाणे ज्या मुखाने म्हणत आहेत, ज्यांच्या वेणीचे बंधन गळून पडल्यामुळे सुटलेले केसानी ज्या मदनाच्या जणु पताका आहेत असा भास उत्पन्न होतो ॥ ३५ ॥
गोठ्याच्या अंगणात एकमेकीशी बोलत स्वच्छन्दाने दही घुसळण्याचे कार्य ज्या करीत आहेत अशा गवळयांच्या स्त्रियांना भरत प्रभूनी पाहिले व त्यांच्या मनात काही उत्सुकता उत्पन्न झाली ।। ३६ ॥
रानटी हत्ती जेथे आहेत अशा वनात राहणारे जे भिल्ल आदिक लोक त्यांनी प्रभु भरताचे दर्शन घेतले व त्यांनी जंगली मोठ्या हत्तींचे दात आणि त्यांच्या गंडस्थलात उत्पन्न मालेली मोत्येही नजराणा म्हणून अर्पण केली ॥ ३७ ।। म. १५
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org