Book Title: Mahapurana Part 2
Author(s): Jinsenacharya, Jindas Shastri
Publisher: Shantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
View full book text
________________
१२०)
महापुराण
(२८-८४
अनाशितंभवं पीत्वा सुस्वादु सरितां जलम् । गतागतानि कुर्वन्तं सन्तोषादिव वीचिभिः ॥ ८४ नदीवधूभिरासेव्यं कृतरत्नपरिग्रहम् । महाभोगिभिराराध्यं चातुरन्तमिव प्रभुम् ॥ ८५ यादोदोर्घातनिर्दूतैर्दूरोच्छलितशीकरः । सपताकमिवाशेषशेषार्णवविनिर्जयात् ॥ ८६ कुलाचलपृथुस्तम्भजम्बूद्वीपमहौकसः । विनीलरत्ननिर्माणमेकं शालमिवोत्थितम् ॥ ८७ अनादिमस्तपर्यन्तमखिलावगाहिनम् । गम्भीरशम्दसन्दर्भ श्रुतस्कन्धमिवापरम् ॥८८ नित्यप्रवृत्तशब्दत्वाद्रव्याथिकनयाश्रितम् । वीचीनां क्षणभङगित्वात्पर्यायनयगोचरम् ॥ ८९ नित्यानुबद्धतृष्णत्वाच्छश्वज्जलपरिग्रहात् । गुरूणां च तिरस्कारात्किराजानमिवान्वहम् ॥ ९०
__ जे कितीही प्याले तरी तृप्ति होत नाही असे नद्यांचे अतिशयस्वादु पाणी पिऊन हा समुद्र संतोषाने जणु तरंगाच्याद्वारे इकडे तिकडे फिरत आहे असे वाटते ॥ ८४ ।।
नद्या याच कोणी स्त्रिया-नद्यारूपी स्त्रिया ज्याची सेवा करीत आहेत, ज्याच्याजवळ पुष्कळ रत्ने आहेत व ज्याची मोठमोठे भोगी-(सर्प व मित्रसमूह) आराधना सेवा करतात असा जणु सार्वभौम राजा आहे असा तो समुद्र दिसत होता ॥ ८५ ॥
क्रूर असे सुसर मगर वगैरे जलचरांच्या बाहूंच्या आघातांनी उंच उडत असलेल्या पाण्याच्या तुषारानी हा समुद्र बाकीच्या कालोद, क्षीरोदादि समुद्राना जिंकल्यामुळे जणु हातात जयध्वज धरल्याप्रमाणे दिसत आहे ॥ ८६ ॥
हिमवदादिक जे कुल पर्वत हेच जणु ज्याचे मोठे खांब आहेत असा जो जम्बूद्वीपरूपी महाप्रासाद त्याचा हा समुद्र नीलरत्नांनी जो बनविला आहे असा जणु हा उंच तट आहे असा भासत आहे ॥ ८७ ॥
अथवा हा लवण समुद्र जणु दुस-या श्रुतस्कन्धाप्रमाणे भासत आहे. जसा श्रुतस्कंध अनादि व अनिधन आहे तसा हा समुद्रही अनादि अनिधन आहे. जसा श्रुतस्कंध जीवादिक पदार्थाचे अवगाहन-सांगोपांग वर्णन करतो तसे हा समुद्रही सर्व पदार्थांचा प्रवेश आपल्यामध्ये करीत आहे. जसा श्रुतस्कंध गंभीर शब्दाच्या रचनेने युक्त आहे तसा हा समुद्र गंभीर शब्दानीगर्जनानी युक्त आहे ।। ८८ ॥
जसे द्रव्याथिक नय वस्तूंच्या नित्य धर्माचे वर्णन शब्दानी करीत असतो तसा हा समुद्र नित्य शब्दांनी प्रवृत्ति करितो अर्थात् नित्य गर्जना करीत असतो. जसा पर्यायार्थिकनय पर्यायांची क्षण नश्वरता सांगतो तसे या समुद्राच्या लहरी क्षणपर्यन्त राहून नाश पावत होत्या. त्यामुळे हा समुद्र पर्यायनयाचाही विषय बनलेला होता ।। ८९ ॥
हा समुद्र दुष्ट राजाप्रमाणे दिसत होता. दुष्टराजा नेहमी द्रव्याच्या तृष्णेने युक्त असतो व हा समुद्रही नेहमी तृष्णेने युक्त आहे कारण हा नेहमी अनेक नद्यांचे पाणी ग्रहण करीत असतो. दुष्ट राजा गुरु-वृद्ध अनुभवी लोकांच्या सल्ल्याचा तिरस्कार करतो. हा समुद्रही गुरु वजनदार पदार्थांना बुडवितो म्हणून दुष्ट राजाप्रमाणे आहे ॥ ९० ।।
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org