Book Title: Mahapurana Part 2
Author(s): Jinsenacharya, Jindas Shastri
Publisher: Shantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
View full book text
________________
२८-८३)
महापुराण
वीचिबाहुभिराघ्नन्तमजस्रं तटवेदिकाम् । समर्यादत्वमाहत्य श्रावयन्तमिवात्मनः ॥ ७९ चलद्भिरचलोदग्रैः कल्लोलैरतिवर्तनम् । सरिद्युवतिसम्भोगादसम्मान्तमिवात्मनि ॥ ८० तरङगिततनुं वृद्धं पृथुकं व्यक्तरङगितम् । सरन्तमतिकान्ताङ्गं सग्राहमतिभीषणम् ॥ ८१ लावण्येऽपि न सम्भोग्यं गाम्भीर्येऽप्यनवस्थितम् । महत्त्वेऽपि कृताक्रोशं व्यक्तमेव जलाशयम् ॥ ८२ न चास्य मदिरासङगो न कोऽपि मदनज्वरः । तथाप्युद्रिक्तकन्दर्प मारूढमधुविक्रियम् ॥ ८३
( ११९
भय उत्पन्न करीत होता म्हणून बिभीषण होता. तो अत्यन्त मोठा होता व गंभीर होता म्हणून महोदर होता. या प्रकारे तो असा दिसत होता की, जणु राक्षसांचा समूहच आहे ॥ ७८ ॥
तो समुद्र आपल्या तरङ्गरूपी बाहूंनी वारंवार तटाच्या वेदिकेला धक्के देऊन जणु आपला मर्यादितपणा तिला तो ऐकवीत आहे ।। ७९ ।।
तो समुद्र पर्वताप्रमाणे उंच अशा आपल्या लाटांनी किनान्याचे उल्लंघन करीत होता. जणु नद्यारूपी तरुणींच्या संभोगाने तो स्वतःमध्ये मावत नाही असे वाटत होते ॥ ८० ॥ त्याच्या ठिकाणी अनेक तरंगरूपी सुरकुत्या उत्पन्न झाल्यामुळे तो वृद्ध पुरुषाप्रमाणे दिसत होता. अथवा पुष्कळ तरंगांनी तो खूप वाढल्याप्रमाणे दिसत होता. अथवा तो समुद्र एखाद्या पृथुक - बालकासारखा दिसत होता अथवा पृथु- पुष्कळ कं पाणी ज्यात आहे असा दिसत होता जसे बालक पृथ्वीवर आपल्या गुडघ्यानी रांगत असते तसे हा समुद्र लहरींनी सरकत होता. जसे बालक नेहमी अतिशय सुन्दर अंगाचे दिसते तसे हा समुद्रही अतिशय कान्ताङ्ग-सुंदर अंगाचा होता. तो समुद्र सुग्राह- मगरमत्स्यादिकांनी युक्त असल्यामुळे अतिशय भीषण - भयंकर होता ।। ८१ ।।
त्या समुद्रात लावण्य-सौन्दर्य असूनही ते उपभोग योग्य नव्हते. अर्थात् त्याच्या ठिकाणी लावण्य - खारटपणा असल्यामुळे तो भोगण्यास योग्य नव्हता. त्याच्या ठिकाणी गंभीरता असूनही तो अनवस्थित होता, चंचल होता. त्याच्या ठिकाणी महत्त्व मोठेपणा होता पण नेहमी आक्रोश करीत होता, गर्जना करीत होता, म्हणून तो स्पष्टपणे जलाशय होता. फार मोठ्या पाण्याचा साठा त्याच्याजवळ होता अथवा तो स्पष्टपणे जलाशय-जडाशय - मूर्खपणाचे अस्तित्वानेयुक्त होता ॥ ८२ ॥
Jain Education International
या समुद्राला मदिरासंग मद्याचा स्पर्श झाला नव्हता व याला कोणता मदनज्वरही नव्हता. तथापि तो उद्रिक्त कन्दर्प- अधिक मदन बाधेने युक्त होता हा विरोध आहे. पण परिहार असा - हा समुद्र आरूढ मधुविक्रियः मधु-पुष्परसाच्या विकाराला धारण करीत होता अथवा मधु-मनोहर वि जलपक्ष्यांची क्रिया धारण करीत होता व हा समुद्र मदनज्वराने युक्त असूनही उद्रिक्त कन्दर्प होता, अतिशय कामविकाराने रहित होता. याचा दुसरा अर्थ - उद्रिक्तवाढला आहे कं-पाण्याचादर्प- अहंकार तो ज्याला अधिक आहे असा हा समुद्र आहे ॥ ८३ ॥
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org