Book Title: Mahapurana Part 2
Author(s): Jinsenacharya, Jindas Shastri
Publisher: Shantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
View full book text
________________
११८)
महापुराण
(२८-७१
उत्फेनज़म्भिकारम्भैः सापस्मारमिवोल्बणम् । केनाप्यशक्यमाधर्तुं क्वचिदप्यनवस्थितम् ॥ ७१ अकस्मादुच्चरद्ध्वानमनिमित्तचलाचलम् । अकारणकृतावर्तमतिसङकुसुकस्थितिम् ॥ ७२ हसन्तमिव फेनोत्थैर्लसन्तमिव वीचिभिः । चलन्तमिव कल्लोलाद्यन्तमिव घृणितैः ॥ ७३ सरत्नमुल्बणविषं मुक्तसूत्कारभीकरम् । स्फुरत्तरङगनिर्मोकं स्फुरन्तमिव भोगिनम् ॥ ७४ अत्यम्बुपानादुद्रिक्तप्रतिश्यायमिवाधिकम् । क्षुतानीव विकुर्वाणं ध्वनितानि सहस्रशः ॥ ७५ मायूनमसकृत्पीतविश्वस्रोतस्विनीरसम् । रसातिरेकादुद्गारं तन्वानमिव खात्कृतः ॥ ७६ निजगम्भीरपातालमहाग पदेशतः। अतृप्यन्तमिवाम्भोभिरातालविवृताननम् ॥ ७७ विशां रावणमाक्रान्त्या चलग्राहं बिभीषणम् । रक्षसामिव सम्पातमतिकायं महोदरम् ॥ ७८
जसे अपस्मार-फेफरे रोगाने पीडित रोगी वारंवार फेसानीसहित जांभया देतो तसा हा समुद्र फेससहित तरंगानी युक्त आहे, जसा अपस्मार रोगी कोणाकडून पकडला जात नाही तसा हा समुद्रही कोणाकडून रोकला जात नाही, अडविला जात नाही. जसा अपस्मार रोगी कोठेही स्थिर राहत नाही तसा हा समुद्र स्थिर नव्हता, नेहमी त्यात चंचलपणा होता ।। ७१॥
या समुद्रात अकस्मात् गर्जना होत असे व कारणावाचून चंचलता उत्पन्न होत असे. कारणावाचून त्यात भोवरे उत्पन्न होत असत. यामुळे त्याचा अस्थिर स्वभाव प्रकट होत होता ।। ७२ ॥
फेसांनीसहित तरंगामुळे तो हसत आहे व नाचत आहे असे वाटत होते व मोठ्या लाटांनी तो धावत आहे व गर्जनांनी तो उन्मत्ताप्रमाणे वाटत होता ॥ ७३ ।।
ज्याच्या फणावर रत्न आहे व ज्याच्या ठिकाणी तीव्र विष आहे व फुत्कार सोडीत असल्यामळे जो भीति उत्पन्न करतो आणि चमकणाच्या तरङ्गाप्रमाणे ज्याच्यावर कात आहे अशा फुरफुरणान्या सप्रिमाणे हा लवणसमुद्र आहे. अर्थात् हा समुद्रही रत्नांनी युक्त आहे व पुष्कळ विष-पाणी यात आहे. हा सू सू असा शब्द करतो, याचे तरङ्ग सर्पाच्या कांतीप्रमाणे चमकतात ।। ७४ ।।
अथवा या समुद्राला अतिशय पाणी प्याल्यामुळे जणु पडसे आले आहे व त्यामुळे शिंकाप्रमाणे हा हजारो वेळा आवाज करीत आहे असे वाटते ।। ७५ ।।
__ अथवा हा समुद्र अतिशय खादाड मनुष्याप्रमाणे आहे. अर्थात् त्याच्याप्रमाणे सगळ्या नद्यांचे पाणी हा पीत असतो. तो मनुष्य अतिशय अन्न खाऊन वारंवार ढेकरा देतो तसा हा अतिशय पाण्यामुळे वारंवार खात्कार करतो म्हणजे वारंवार शब्द करतो ।। ७६ ॥
हा समुद्र आपल्या गंभीर पातालरूपी मोठ्या पोटाच्या मिषाने पुष्कळ पाण्याने ही जणु अतृप्त झाल्यामुळे टाळूपर्यन्त त्याने आपले तोंड पसरले आहे असा दिसतो ।। ७७ ।।
तो समुद्र संपूर्ण दिशामध्ये व्याप्त होऊन शब्द करीत होता म्हणून रावण होता. त्याने अनेक पर्वत आपल्या पाण्यात बुडविले होते म्हणून तो अचलग्राह होता. तो सर्व जीवांना
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org