Book Title: Mahapurana Part 2
Author(s): Jinsenacharya, Jindas Shastri
Publisher: Shantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
View full book text
________________
११४)
महापुराण
(२८-३८
श्यामाङगीरनभिव्यक्तरोमराजीस्तनूदरीः । परिधानोकृतालोलपल्लवव्यक्तसंवृतीः ॥ ३८ चमरीबालकाविद्धकबरीबन्धबन्धुराः । फलिनीफलसन्दृब्धमालारचितकण्ठिकाः ॥ ३९ कस्तूरिकामृगाध्यासवासिताः सुरभीम॒दः । सञ्चिन्वतीर्वनाभोगे प्रसाधनजिघृक्षया ॥ ४० पुलिन्दकन्यकाः सैन्यसमालोकनविस्मिताः । अव्याजसुन्दराकारा दूरादालोकयत्प्रभुः ॥ ४१ चमरीबालकान्केचित्केचित्कस्तूरिकाण्डकान् । प्रभोरूपायनीकृत्य ददृशुर्लेच्छराजकाः ॥ ४२ तत्रान्तपालदुर्गाणां सहस्राणि सहस्रशः । लब्धचक्रधरादेशः सेनानीः समशिधियत् ॥ ४३ अपूर्वरत्नसन्दर्भः कुप्यसारधनैरपि । अन्तपालाः प्रभोराज्ञां सप्रणामरमानयन् ॥ ४४ ततो विदूरमुल्लङध्य सोऽध्वानं सहसेनया। गङगाद्वारमनुप्रापत्स्वमिवालङध्यमर्णवम् ॥ ४५ बहिःसमुद्रमुद्रिक्तं द्वैप्यं निम्नोपगं जलम् । समुद्रस्येव निष्यन्दमब्धेराराद्वयलोकयत् ॥ ४६
ज्यांचे अवयव सावळ्या रंगाचे आहेत, ज्यांचे पोट कृश असून त्यावरील रोमपंक्ति अव्यक्त आहे, ज्यानी आपल्या अंगावर चंचलपाने वस्त्राप्रमाणे धारण केली असल्यामुळे ज्याच्या शरीराचे आच्छादन स्पष्ट दिसत आहे, ज्यानी आपले केस चमरीमृगाच्या केसानी बांधले असल्यामुळे ज्या फार सुंदर दिसत आहेत व ज्यानी गुंजा गुंफून त्यांच्या माळा आपल्या गळ्यात धारण केल्या आहेत, कस्तूरी मृगाच्या बसण्याने जिला सुगंध प्राप्त झाला आहे अशी माती आपल्याला भूषित करण्यासाठी वनाच्या एका भागात ज्या गोळा करीत आहेत, सैन्याला पाहून ज्या आश्चर्ययुक्त झाल्या आहेत, ज्यांचा आकार स्वाभाविक सुन्दर आहे अशा भिल्लांच्या तरुण मुलींना भरतराजाने दुरून पाहिले ॥ ३८-४१ ।।
कांही म्लेंच्छ राजांनी (वनातील भिल्ल वगैरेचे राजे) कस्तुरी मृगांचे नजराणे भरत प्रभूला अर्पण करून त्यांचे दर्शन केले व कांहीनी कस्तूरीच्या काण्डकांना नजराणा म्हणून प्रभूला अर्पण केले व त्याचे दर्शन घेतले ॥ ४२ ॥
त्या गंगामुखाच्या जवळ चक्रवर्ती भरतप्रभूची आज्ञा प्राप्त करून सेनापतीने लक्षावधी किल्ले आपल्या ताब्यात घेतले ।। ४३ ।।
म्लेंच्छ राजांचे जे किल्ल्यांचे रक्षक होते त्यांनी उत्कृष्ट रत्नांचे ढीग व रेशमी वस्त्रे, चंदनादिकांचे नजराणे नृपेश्वर भरताला प्रणामपूर्वक अर्पण केले व अशा रीतीने त्यांचा सन्मान केला ॥ ४४ ।।
तदनंतर आपल्या सेनेला बरोबर घेऊन भरतेशाने दूरचा मार्ग उल्लंधिला व आपल्या प्रमाणे अलङध्य अशा समुद्राच्याजवळ असलेल्या गंगाद्वाराला तो प्राप्त झाला ।। ४५ ॥
गंगेच्या मुखाजवळ अधिक झाल्यामुळे समुद्राच्या बाहेर द्वीपसंबंधी खोलगट प्रदेशात पसरलेले गंगेचे पाणी जणु समुद्राचा प्रवाह आहे अशा त्याला भरतेशाने दूरून पाहिले ।। ४६ ॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org