________________
११२)
महापुराण
(२८-२३
अगोष्पदेष्वरण्येषु दृशं व्यापारयन्विभुः । भूमिच्छिद्रापिधानाय क्षणं यत्नमिवातनोत् ॥ २३ पथि प्रणेमुरागत्प सम्भ्रान्ता मण्डलाधिपाः । दण्डोपनतवृत्तस्य विषयोऽयमिति प्रभुम् ॥ २४ सचक्रं धेहि राजेन्द्र, सधुरं प्राज सारथे । सञ्जल्प इति नास्यासीदयत्नानतविद्विषः ॥ २५ प्रतियोद्धमशक्तास्तं प्रधनेषु जिगीषवः । तत्पदं प्रणतिव्याजात् स्वमौलिभिरताडयन् ॥ २६॥ विभुत्वमरिचक्रेषु भूपरागानुरञ्जनम् । स्वचक्र इव सोऽधत्त महतां चित्रमीहितम् ॥ २७ सन्ध्यादिविषये नास्य समकक्षो हि पार्थिवः । षाड्गुण्यमत एवास्मिश्चरितार्थमभूत्प्रभौ ॥ २८ प्रतिराष्ट्रमुपानीतप्राभूतान्विषयाधिपान् । संभावयत्प्रसादेन सोऽत्यगाद्विषयान्बहून् ॥ २९ ।
+--........
गाय आदिक प्राण्यांच्या संचाराने रहित बनात दृष्टि टाकणारे भरतचक्री जणु लोकाना असे वाटले की, पृथ्वीच्या छिद्राना बुजविण्यासाठी काही क्षणापर्यन्त प्रयत्न करीत आहेत ।। २३ ।।
मार्गात घाबरलेले अनेक देशाचे राजे चक्रवर्तीजवळ येऊन आपल्या दंडाने या देशाचा अधिकार आपल्याला प्राप्त झाला आहे असे म्हणून त्यांना नमस्कार करू लागले ॥ २४ ।।
या भरतराजाला प्रयत्नावाचून शत्रु नम्र होत असत म्हणून हे राजेन्द्र आपण चक्ररत्न धारण करा व हे सारथ्या तूं रथाची पुढची बाजु उत्तम रीतीने सांभाळ असे शब्द बोलण्याचा कधी प्रसंग आला नाही ॥ २५ ॥
समरांगणात जय मिळविण्याची इच्छा करणारे पण युद्ध करण्यास असमर्थ असे राजे नमस्कार करण्याच्या निमित्ताने आपल्या किरीटानी भरतेश्वराच्या पायाना ताडन करीत असत ॥ २६ ॥
भरतराजेश्वर जसे आपल्या राज्यात विभुत्व-ऐश्वर्य धारण करीत होते तसे शत्रूच्या राज्यातही विभुत्व धारण करीत होते अर्थात् शत्रूना पृथ्वीरहित करीत होते. त्यांच्या पृथ्वीचे हरण करीत असत व भरत महाराज जसे आपल्या राज्यात 'भूपरागानुरञ्जन' राजे लोकावर प्रेमपूर्ण अनुरंजन करीत असत तसे शत्रूच्या राज्यात देखिल भूपरागानुरंजन म्हणजे पृथ्वीला धूळीनी व्याप्त करीत असत. अर्थात् शत्रूला धुळीत मिळवीत असत. यावरून हे योग्यच वाटते की जे महापुरुष असतात त्यांचे आचरण आश्चर्यकारक असते ॥ २७ ॥
सन्धि- तह करणे, विग्रह- युद्ध करणे, यान- शत्रूवर चाल करून जाणे, आसनदबा धरून बसणे, द्वैधीभाव- शत्रू मध्ये फूट पाडणे, आश्रय- कोणाची तरी मदत मिळविणे याविषयी कोणताही राजा भरतराजाच्या बरोबरीचा नव्हता म्हणून सन्धि आदिक सहा गुण या भरतेश्वरात चरितार्थ झाले होते ॥ २८ ॥
प्रत्येक राष्ट्रामध्ये नजराणा घेऊन येणाऱ्या त्या त्या देशाच्या राजावर कृपा करून त्याचा भरतेश्वर सत्कार करीत असे. अशारीतीने भरतेश्वर अनेक देशाना उल्लंघून पुढे गेला ॥ २९॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org