Book Title: Mahapurana Part 2
Author(s): Jinsenacharya, Jindas Shastri
Publisher: Shantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
View full book text
________________
अष्टाविंशतितमं पर्व
अथान्येद्युदिनारम्भे कृतप्राभातिकक्रियः । प्रयाणमकरोच्चक्री चक्ररत्नानुमार्गतः ॥ १ अलङध्यं चक्रमाक्रान्तपरचक्रपराक्रमम् । दण्डश्च दण्डितारातिर्द्वयमस्य पुरोऽभवत् ॥ २ रक्ष्यं देवसहस्रेण चक्रं दण्डश्च तादृशः । जयाङ्गमिदमेवास्य द्वयं शेषः परिच्छदः ॥ ३ विजयार्धप्रतिस्पद्धवर्माणं यागहस्तिनम् । प्रतस्थे प्रभुरारुह्य नाम्ना विजयपर्वतम् ॥ ४ प्राचीं दिशमथो जेतुमापयोधेस्तमुद्यतम् । ननु स्तम्बेरमव्याजागृहे विजयपर्वतः ॥ ५ सुरेभं शरदभ्राभमारूढो जयकुञ्जरम् । स रेजे दीप्तमुकुटः सुरेभं सुरराडिव ॥ ६ सितातपत्र मस्योच्चैविधृतं श्रियमादधे । यशसां प्रसवागारमिव तद्व्याजजृम्भितम् ॥ ७ लक्ष्मीप्रहासविशदा चामराली समन्ततः । व्यधूयतास्य विध्वस्ततापा ज्योत्स्नेव शारदी ॥ ८
यानंतर दुसरे दिवशी दिवसाच्या प्रारंभी चक्रवर्तीने सकाळच्या सर्व क्रिया केल्या व चक्ररत्नाच्या मार्गाला अनुसरून प्रयाण केले ॥ १ ॥
शत्रूंच्या सैन्याच्या पराक्रमाचा नाश करणारे व ज्याचे अन्य कोणी उल्लंघन करू शकत नाही असे चक्ररत्न व शत्रूंना दण्डित करणारे दण्डरत्न ही दोन्ही चक्रवर्तीच्यापुढे चालत होती ॥ २ ॥
या चरत्नाचे हजार देव रक्षण करीत असत, तसेच हजार देव दण्डरत्नाचे रक्षण करीत असत. चक्रवर्तीला जय मिळवून देण्यास ही दोन रत्नेच कारण आहेत. बाकीची सर्वं सैन्य आदिक सामग्री शोभेसाठी होती ।। ३ ॥
विजयार्ध पर्वताशी स्पर्द्धा करणारे शरीर ज्याचे आहे अशा विजयपर्वत नावाच्या आदरणीय हत्तीवर आरोहण करून भरतचक्रीने प्रयाण केले ॥ ४ ॥
समुद्रापर्यन्त पूर्व दिशेला जिंकण्यासाठी उद्यत झालेल्या त्या भरतप्रभूला हत्तीच्या मिषाने विजयपर्वताने आपल्या मस्तकावर धारण केले की काय असे वाटत होते ।। ५ ॥
सु-उत्तम रेभं शब्द ज्याचा आहे अर्थात उत्तम गर्जना करणारा व शरत्कालच्या शुभ्र मेघाप्रमाणे कान्ति ज्याची आहे अशा जयकुञ्जरावर जयशील हत्तीवर आरूढ झालेला व ज्याचा मुकुट चमकत आहे असा भरतचक्री सुरेभदेव हत्तीवर- ऐरावतावर आरुढ झालेल्या इन्द्राप्रमाणे शोभू लागला ॥। ६ ।।
मस्तकावर धारण केलेलें या भरताचे जे शुभ्र छत्र त्याने भरताला अपूर्व शोभा आली व तें छत्राच्या मिषाने कीर्तीच्या उत्पत्तीचे जणु घर आहे असे शोभत होते ।। ७ ।।
लक्ष्मीच्या उत्कृष्ट हास्याप्रमाणे निर्मल अर्थात् शुभ्र अशी चामरांची पंक्ति भरताच्या चारी बाजूनी वारली जात होती व शरत्कालच्या चन्द्राच्या चांदण्याप्रमाणे त्या चामरसमूहांनी सर्व उष्णता नाहीशी केली होती ॥। ८ ।।
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org