Book Title: Mahapurana Part 2
Author(s): Jinsenacharya, Jindas Shastri
Publisher: Shantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
View full book text
________________
२७-१३७)
महापुराण
दूराष्यकुटीभेदानुत्थितान्प्रभुरक्षत । सेनानिवेशमभितः सौधशोभापहासिनः ॥ १२९ रौप्यदण्डेषु विन्यस्तान् विस्तृतान्पटमण्डपान् । सोऽपश्यज्जनतातापहारिणः सुजनानिव ॥ १३० किमेतानि स्थलाब्जानि हंसयूथान्यमूनि वा । इत्याशडक्य स्थलाग्राणि दूराद्ददृशिरे जनैः॥१३१ सामन्तानां निवेशेषु कायमानानि नैकथा । निवेशितानि विन्यासैनिदध्यौ प्रभुरग्रतः ॥ १३२ परितः कायमानानि वीक्ष्य कण्टकनिर्वृतीः । निष्कण्टके निजे राज्ये मेने तानेव कण्टकान् ॥१३३ तरुशाखाग्रसंसक्तपर्याणादिपरिच्छदान् । स्कन्धावाराबहिः कांश्चिदावासान्प्रभुरक्षत ॥ १३४ बहिनिवेशमित्यादीन्विशेषान्स विलोकयन् । प्रवेशे शिबिरस्यास्य महाद्वारमथासदत् ॥ १३५ तदतीत्य समं सैन्यः स गच्छन् किञ्चिदन्तरम् । महाब्धिसमनिर्घोषमाससाद वणिक्पथम् ॥ १३६ कृतोपशोभमाबद्धतोरणं चित्रकेतनम् । वणिग्भिरूढ रत्नार्घ स जगाहे वणिक्पथम् ॥ १३७ ।।
सेनेच्या निवासस्थानाच्या सभोवती राजवाड्याच्या शोभेला हसणाऱ्या अशा अनेक तंबूला दुरूनच पाहिले ।। १२९ ।।
रुप्याच्या खांबावर जे उभे केले आहेत असे विस्तृत वस्त्रमंडप भरतराजाने पाहिले. ते लोकांचा ताप दूर करणारे असल्यामुळे सज्जनाप्रमाणे वाटत होते ॥ १३० ॥
त्या तंबूची टोके ही जणु जमिनीवर उगवलेली कमले आहेत, किंवा हे हंसाचे कळप जणु आहेत अशा अनेक प्रकारच्या शंकानी ते तंबू लोकानी दुरून पाहिले ॥ १३१ ।।
जे मांडलिकराजाचे तंबू होते त्यात अनेक प्रकारचे विभाग पडदे लावून केले होते. (जसे हे भोजनगृह, ही बसण्याची खोली वगैरे) या सर्वांचे भरतराजाने निरीक्षण केले॥१३२॥
त्या प्रत्येक तंबूच्या भोवती काटेरी कुंपणे होती. त्याना भरतप्रभूने पाहिले व आपल्या निष्कण्टक राज्यात हेच काय ते काटे आहेत असे त्याला वाटले ॥ १३३ ॥
त्या छावणीच्या बाहेर वृक्षांच्या शाखांच्या अग्रावर घोड्यांचे खोगीर वगैरे पदार्थ अडकविले होते. याचप्रमाणे झोपड्यासारखे लहान लहान निवासस्थानेही प्रभूने पाहिली।।१३४॥
याचप्रमाणे छावणीच्या बाहेर असलेली काही विशेष स्थाने पाहात पाहात शिबिरात प्रवेश करताना शिबिराच्या महाद्वाराजवळ भरतराजे आले ॥ १३५ ॥
सैन्यासह जाणाऱ्या प्रभु भरताने महाद्वाराला ओलांडून कांहीं अन्तर गमन केले व मोठ्या समुद्राप्रमाणे शब्द जिथे होत आहेत अशा बाजारात ते आले ॥ १३६ ।।
तो बाजार अनेक तन्हानी सुशोभित झाला होता. त्यात अनेक ठिकाणी तोरणे बांधली होती व चित्रविचित्र पताका उभ्या केल्या होत्या. व्यापारी लोक त्या बाजारात रत्नादि पदार्थांच्या किंमती वगैरेचे वर्णन करीत होते. अशा बाजारात भरतराजाने प्रवेश ला ।। १३७ ।। म.१४
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org