Book Title: Mahapurana Part 2
Author(s): Jinsenacharya, Jindas Shastri
Publisher: Shantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
View full book text
________________
२७-११९)
महापुराण
(१०३
अश्वेभ्योऽपि रथेभ्योऽपि पत्तयो वेगितं ययुः । सोपानकः पदैः स्थाणुकण्टकोपललखिनः ॥ ११० शाक्तिकाः सहयाष्टीकैः प्रासिका धन्विभिः समम् । नैस्त्रिशिकाश्च तेऽन्योन्यं स्पर्द्धयेव ययुद्धतम् ।। पुरः प्रधावितैः प्रेङ्घद्वारबाणाग्रपल्लवाः । जातपक्षा इवोड्डीय भटा जग्मुरभिद्रुतम् ॥ ११२ प्रयात धावतापेत मागं मारुद्ध्वमग्रतः । इत्युच्चैरुच्चरद्ध्वानाः पौरस्त्यानत्ययुर्भटाः ॥ ११३ इतोऽपसर्पताश्वीयादितो धावत हास्तिकात् । इतो रथादपत्रस्तात् दूरं नश्यत नश्यत ॥ ११४ अमुष्माज्जनसङ्घट्टादुत्थापयत डिम्भकान् । इतो हस्त्युरसादश्वानपसारयत द्रुतम् ॥ ११५ इतः पन्थानमारुद्धय स्थितोऽयं घातुको गजः । मध्येऽध्वं प्राजितुर्दोषात्पर्यस्तोऽयमितो रथः ॥११६ क्रमेलकोऽयमुत्रस्तः प्रतीपं पथि धावति । उत्सृष्टभारो लम्बोष्ठो जनानिव विडम्बयन् ॥ ११७ वित्रस्ताद्वेसरादेनां पतन्तीमवरोधिकाम् । सन्धारयन्प्रपातेऽस्मिन्सोविदल्लः पतत्ययम् ॥ ११८ यवीयानेष पण्यस्त्रीमुखालोकनविस्मितः । पतितोऽप्यश्वसङघट्टैनात्मानं वेद शून्यधीः ॥ ११९
ज्यांच्या पायात जोडे आहेत व त्यामुळे खुंट, कांटे व दगड याना उल्लंघणारे असे पायदळ सैन्य, घोड्यापेक्षा व रथापेक्षा देखिल अधिक वेगाने पुढे निघून गेले ।। ११० ॥
शक्त्यायुध धारण करणारे, यष्टि आयुधधारक, भाला धारण करणारे, धनुष्यधारी, खड्गधारी, हे सगळे एकमेकाविषयी जणु ईर्ष्या धारण करून फार वेगाने पुढे गेले ॥ १११ ॥
पुढे वेगाने पळण्याने ज्यांच्या चिलखताचे अग्रभाग-पदर उडत आहेत असे योद्धे पंख उत्पन्न झाल्यामुळे जणु उडून जात आहेत की काय असे फार वेगाने ते गेले ॥ ११२ ।।
चला, पळा, पुढील मार्ग अडवू नका याप्रमाणे मोठ्याने बोलणारे काही योद्धे पुढे असलेल्याना ओलांडून गेले ।। ११३ ।।
हे लोकहो, तुम्ही घोडेस्वारापासून बाजूला जा. या हत्तीच्या समुदायापासून बाजूला वेगाने पळा. हा रथ इकडे तिकडे धावत आहे याच्यापासून फार दूर लौकर पळा ॥ ११४ ।।
या लोकांच्या गर्दीतून या बालकाना उचलून घ्या. इकडे हत्तीच्या जवळून घोड्याना कोकर बाजूला करा ॥ ११५ ॥
हा दुष्ट हत्ती रस्ता आडवून उभा राहिला आहे व मार्गामध्येच हाकणान्याच्या चुकीमुळे हा रथ पडला आहे ॥ ११६ ।।
तसेच ह्या लांब ओठाच्या उंटाने आपल्या पाठीवरचे ओझे टाकून दिले आहे व मार्गात लोकाना त्रास देत उलट पळत सुटला आहे ॥ ११७ ॥
गजादिकाना पाहून भ्यालेल्या या खेचरावरून ही पडद्यातील स्त्री खाली पडत असता तिला सावरून धरणारा हा कंचुकी या उचंवटयावर आपण ही पडत आहे ।। ११८ ।।
वेश्येच्या मुखाकडे पाहून आश्चर्यचकित झालेला शून्यधी अविचारी हा तरूण घोड्याच्या धक्क्याने आपणही पडला आहे पण ते त्याला समजत नाही ॥ ११९ ॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org