Book Title: Mahapurana Part 2
Author(s): Jinsenacharya, Jindas Shastri
Publisher: Shantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
View full book text
________________
१०२)
महापुराण
(२७-१०१
स्वेदबिन्दुभिराबद्धजालकानि नृपस्त्रियः । वदनान्यूहरब्जिन्यः पनानीवाम्बुशीकरैः ॥ १०१ नृपवल्लभिकावक्त्रपङ्कजेष्वपुषच्छ्यिम् । धर्मबिन्दूद्गमो निर्यल्लावण्यरसपूरवत् ॥ १०२ गलद्धर्माम्बुबिन्दूनि मुखानि नृपयोषिताम् । अवश्यायततानीव राजीवानि विरेजिरे ॥ १०३ नृपाङ्गनामुखाब्जानि धर्मबिन्दुभिराबभुः । मुक्ताफलैर्द्रवीभूतैरिवालकविभूषणः ॥ १०४ रथवाहा रथानहुरायतैः फेनिलैर्मुखैः । तीवं तपति तिग्मांशौ समेऽपि प्रस्खलत्खुराः ॥ १०५ ह्रस्ववृत्तखुरास्तुङ्गास्तनुस्निग्धतनूरुहाः । पृथ्वासना महावाहाः प्रययुर्वातरंहसः ॥ १०६ महाजवजुषो वक्त्रादुद्वमन्तः खुरानिव । महोरस्काः स्फुरत्प्रोथा द्रुतं जग्मुर्महाहयाः ॥१०७ समुच्छ्रितपुरोभागाः शुद्धावर्ता मनोजवाः । अपर्याप्तेषु मार्गेषु द्रुतमीयुस्तुरङ्गमाः ॥ १०८ मेधासत्त्वजवोपेता विनीताश्चटुलक्रमाः । गलमाना इव स्प्रष्टुं महीमश्वा द्रुतं ययुः ॥ १०९
प्रतिवादीपेक्षा मध्यस्थी करणारा मनुष्य जर तेजस्वी असेल तर त्यापासून दोघानाही त्रास होतो. मध्ये आलेल्या सूर्यापासून पृथ्वीला जो ताप होतो त्यावरून कवीने हा अभिप्राय सुचविला आहे ॥ १०० ।।
___ ज्याप्रमाणे कमलांच्या वेली जलबिदूनी युक्त अशा कमलाना धारण करतात त्याप्रमाणे नृपस्त्रियानी घामाच्या जलबिंदूनी युक्त अशी आपली तोण्डे धारण केली ।। १०१ ॥
नृपस्त्रियांच्या मुखकमलावर उत्पन्न झालेले घामाचे बिंदु त्यांच्या सौन्दर्यरसाचा पूरच वाहतो की काय असे शोभू लागले ।। १०२ ॥
घामाचे बिंदु ज्यापासून गळत आहेत अशी नृपस्त्रियांची तोण्डे प्रातःकाळी पडलेल्या दवांनी व्यापिलेली जणु कमले आहेत अशी शोभत होती ।। १०३ ॥
राजस्त्रियांची मुखकमले केशात गुंफलेल्या व सूर्याच्या तापाने जणु पातळ झालेल्या मोत्यानी जशी शोभावीत त्याप्रमाणे घामाच्या बिंदूनी शोभत होती ।। १०४ ।।
सूर्य तीव्रतेने जनाला संतप्त करीत असता, लांबट व फेसयुक्त अशा मुखांच्या घोड्यांनी रथ धारण करून तो रथ ओढू लागले. ओढीत असता सम जमिनीवरही अडखळत पाय टाकू लागले ।। १०५ ॥
___ आखूड व गोल ज्यांचे खूर आहेत व जे उंच आहेत, आखूड व तुळतुळित ज्यांची आयाळ आहे, ज्यांची पाठ रुंद आहे असे घोडे वान्याच्या वेगाने धावत होते ॥ १०६ ।।
जे फार वेगवन्त आहेत, ज्यांची छाती रुंद व ज्यांचे ओठ फुरफुरत आहेत, आणि मुखातून जणु आपले खूर बाहेर टाकीत आहेत असे मोठे घोडे फार त्वरेने पळू लागले ॥१०७॥
ज्यांचा पुढचा भाग-मान उंच आहे व देवमणि वगैरे शुभ भोव-यानी जे युक्त आहेत, मनाप्रमाणे तीव्र वेगवान् आहेत असे घोडे लहानशा मार्गात वेगाने चालू लागले ।। १०८ ॥
बुद्धि, वेग व बल यानी युक्त, चांगले शिकलेले, ज्याचे पाय चंचल आहेत व जमिनीवर धुराळा असल्यामुळे तिला स्पर्श करण्याविषयी जणु मनात चिळस धारण करणारे असे घोडे फार वेगाने धावू लागले ।। १०९ ॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org