Book Title: Mahapurana Part 2
Author(s): Jinsenacharya, Jindas Shastri
Publisher: Shantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
View full book text
________________
महापुराण
(२७-८५
तदाश्वीयखुरोद्घातादुत्थिता वनरेणवः । दिशां मुखेषु सँल्लग्नास्तेनुर्जवनिकाश्रियम् ॥ ८५ साविनां चारबाणानि स्यूतान्यपि सितांशुकः । काषायाणीव जातानि ततानि वनरेणुभिः ॥ ८६ वनरेणुभिरालग्नजडीभूतानि योषितः । स्तनांशुकानि कृच्छेण दधुरध्वश्रमालसाः ॥ ८७ कुम्भस्थलेषु संसक्ताः करिणामध्वरेणवः । सिन्दूरश्रियमातेनुर्धातुभूमिसमुत्थिताः ॥ ८८ ततो मध्यन्दिनेऽभ्यणे दिदीपे तीव्रमंशुमान् । विजिगीषरिवारूढप्रतापः शुद्धमण्डलः ॥ ८९ सरस्तीरतरच्छायामाश्रयन्ति स्म पक्षिणः । शरदातपसन्तापात्सडकुचत्पत्रसम्पदः ॥ ९० हंसाः कलमखण्डेषु पुजीभूतान्स्वशावकान् । पक्षराच्छादयामासुरसोढजरठातपान् ॥ ९१ वन्याःस्तम्बरमा भेजःसरसोरवगाहितुम् । मदनुतिषु तप्तासु मुक्ता मधुकरव्रजः ॥ ९२
त्यावेळी सेनेतील घोड्यांच्या खुरांच्या आघातानी वर उडालेला जो वनातील धुराळा त्याने सर्व दिशा व्यापल्यामुळे त्यानी पडद्याची शोभा धारण केली ॥ ८५ ॥
स्वारांची चिलखते ही वरून शुभ्र वस्त्रानी जरी अच्छादलेली होती तरीही त्या वनातील धुळीनी भरून गेल्यामुळे कषायवस्त्रांनी-तांबड्यो वस्त्रांनी आच्छादल्याप्रमाणे दिसू लागली ।। ८६ ॥
मार्गात झालेल्या श्रमाने थकलेल्या स्त्रियांनी वनातील धुराळा चिकटून जड झालेल्या आपल्या स्तनांशुकांना-चोळ्यांना मोठ्या कष्टाने धारण केले ॥ ८७ ॥
गेरु, हुरमुंज वगैरे धातूंच्या जमिनीपासून वर उडलेल्या रस्त्यावरील धुळी जेव्हां हत्तीच्या गण्डस्थलावर चिकटून बसल्या तेव्हा त्यानी तेथे शेंदूराची शोभा उत्पन्न केली. शेंदूर हत्तीच्या गण्डस्थलावर लावलेला आहे असे वाटू लागलें ॥ ८८॥
यानंतर दिवस उगवून जेव्हां दोन प्रहर झाले तेव्हां सूर्याचा प्रकाश तीव्र झाला व आकाशात मेघ नसल्यामुळे सूर्यबिंब निर्मल झाले व शत्रूना जिंकण्यास निघालेल्या व ज्याचा देश शत्रूच्या उपद्रवानी रहित आहे व ज्याचा प्रताप वाढला आहे अशा राजाप्रमाणे तो सूर्य दिसू लागला ॥ ८९॥
शरदऋतूच्या उन्हाच्या संतापाने ज्यानी आपले पंख मिटविले आहेत अशा पक्ष्यानी सरोवराच्या तटावर असलेल्या झाडाच्या सावलीचा आश्रय घेतला ।। ९० ।।
ज्याना सूर्याचे तीव्र उन्ह सहन झाले नाही म्हणून साळीच्या शेतात जी एके ठिकाणी गोळा होऊन बसली आहेत अशा आपल्या पिलांना हंसपक्षांनी आपल्या पंखानी झाकून घेतले ।। ९१॥
मदाचे पाणी सूर्याच्या प्रखर किरणानी तापून गालावरून जेव्हा गळू लागले तेव्हा भुंग्यांच्या समुदायानी ज्याचा त्याग केला आहे असे रानटी हत्ती पाण्यात खूप डुंबण्याकरिता सरोवराकडे गेले ॥ ९२ ॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org