________________
१०६)
प्रत्यापणमसौ तत्र रत्नराशीशिधीनिव । पश्यन्मेने निषीयत्तां प्रसिद्धयैव तथास्थिताम् ॥ १३८ समौक्तिकं स्फुरद्रत्नं जनतोत्कलिकाकुलम् । रथा वणिक्पथाम्भोधि पोता इव ललङ्घिरे ॥ १३९ चलदश्वीयकल्लोलः स्फुरनिस्त्रिशरोहितैः । राजमार्गोऽम्बुबेर्लीलां महेभमकरैरधात् ॥ १४० राजन्यकेन संरुद्धः समन्तादानृपालयम् । तदासौ विपणीमार्गः सत्यं राजपथोऽभवत् ॥ १४१ ततः पर्यन्तविन्यस्त रत्नभासुरतोरणम् । रथकडयापरिक्षेपकृतबाह्यपरिच्छदम् ॥ १४२ आरुध्यमानमश्वीयैस्तिकेनातिदुर्गमम् । बहुनागबलैर्जुष्टं फलभैश्च करेणुभिः ॥ १४३ छत्रखण्डकृतच्छायं सहोद्यानमिव क्वचित् । क्वचित्सामन्तमण्डल्या रचितास्थानमण्डलम् ॥ १४४ प्रविशद्भिश्च निर्यद्भिरपर्यन्तैर्नियोगिभिः । महाब्धेरिव कल्लोलैस्तटमाविर्भवध्वनि ॥ १४५
महापुराण
त्या भरतप्रभूने प्रत्येक दुकानात निधीप्रमाणे रत्नांचे ढीग पाहिले व निधि नऊ आहेत अशी जी निधींची इयत्ता - संख्या ठरविली आहे ती फक्त प्रसिद्धीकरिता ठरविली आहे. खरे पाहिले असता ते निधि पुष्कळ आहेत असे त्याने मानले ।। १३८ ॥
(२७-१३८
तो बाजार, ज्यात रत्नें चमकत आहेत अशा मोत्यानी भरलेल्या समुद्राप्रमाणे दिसत होता. लोकरूपी तरंगानी तो भरलेला - व्याप्त झालेला दिसत होता. त्या बाजारात जे रथ जात होते ते नावा- नौकाप्रमाणे होते. त्या नौका त्या बाजाररूपी समुद्राला उल्लंघून पुढे गेल्या ।। १३९ ।।
त्या बाजारातील मोठा रस्ता चालणाऱ्या अश्वसमूहरूपी लाटानी युक्त होता व चमकणा-या खड्गरूपी माशानी व मोठे हत्ती हेच कोणी सुसरमगर त्यांनी समुद्राप्रमाणे शोभत होता ।। १४० ।।
त्यावेळी भरतेश्वराच्या तंबूपर्यन्त मांडलिक राजसमूहाने तो व्यापाऱ्यांच्या दुकानांचा मार्ग व्यापून गेला होता म्हणून खरोखर त्यावेळी तो राजमार्ग झाला ॥। १४१ ।।
यानंतर भरतेश्वराने आपल्या राजवाड्याच्या अंगणाला पाहिले व त्याला फार मोठे आश्चर्य वाटलें. त्या अंगणाच्या सर्व बाजूनी रत्नांची चमकणारी तोरणे लावली होती व त्या अंगणाच्या बाहेरच्या भागात गोलाकाराने रथांचे समूह उभे केले होते ।। १४२ ।।
याचप्रमाणे बाहेरच्या भागात घोड्यांच्या व हत्तींच्या समूहाने ते अंगण व्यापून गेले असल्यामुळे प्रवेश करण्यास कठिण झाले होते. तसेच तेथे हत्तींचे छावे व हत्तिणीही होत्या. त्यामुळे ते अंगण हत्ती ज्यात राहतात अशा वनाप्रमाणे भासत होते ।। १४३ ।।
ते अंगण कोठे कोठे अनेक छत्रांच्या सावलीनी मोठ्या बगीचाप्रमाणे दिसत होते व कोठे कोठे अनेक राजांच्या समूहाने युक्त असल्यामुळे जणू तें नृपांगण सभामण्डलाची शोभा धारण करीत होते ।। १४४ ॥
Jain Education International
त्या अंगणातून पुष्कळ राजसेवक बाहेर जात होते. पुष्कळ सेवक आत प्रवेश करीत होते. त्यामुळे ज्यातून शब्द करणाऱ्या लाटा तटापर्यन्त जात आहेत व तटापासून पुन:
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org