Book Title: Mahapurana Part 2
Author(s): Jinsenacharya, Jindas Shastri
Publisher: Shantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
View full book text
________________
२६-९८)
महापुराण
चक्रानुयायि तद्भजे निधीनामोशितुर्बलम् । गुरोरिच्छानुवतिष्णु मुनीनामिव मण्डलम् ॥ ९० वण्डरत्नं पुरोधाय सेनानीरग्रणीरभूत् । स्थपुटानि समीकुर्वन्स्थलदुर्गाण्ययत्नतः ॥ ९१ अग्रण्यदण्ड रत्नेन पथि राजपथीकृते । यथेष्टं प्रययौ सैन्यं क्वचिदप्यस्खलद्गति ॥ ९२ ततोऽध्वनि विशामीशः सोऽपश्यच्छारदीं श्रियम् । दिशां प्रसाधनों कीर्तिमात्मीयामिव निर्मलाम् ॥ सरांसि कमलामोदमुद्वमन्ति शरच्छ्यिः । मुखायितानि सम्प्रेक्ष्य सोऽभ्यनन्ददधीशिता ॥ ९४ स हंसान्सरसा तीरेष्वपश्यत्कृतशिञ्जनान् । मृणालपीथसम्पुष्टान् शरदःपुत्रकानिव ॥ ९५ चञ्च्या मृणालमुद्धृत्य हंसो हंस्यै समर्पयन् । राजहंसस्य हृद्यस्य महतीं धृतिमादधे ॥ ९६ सध्रीची वीचिसंरुद्धामपश्यन्परितः सरः । कोकः कोकूयमानोऽस्य मनसः प्रीतिमातनोत् ॥ ९७ हंसयूनान्जफिञ्जल्करजःपिञ्जरितां निजाम् । वधू विधूतां सोऽपश्यच्चक्रवाको विशङ्ककया ॥ ९८
गुरूजींच्या इच्छेला अनुसरून वागणारा मुनिसमूह जसा त्याना अनुसरतो तसे नवनिधींचा स्वामी असलेल्या भरतराजाचे सैन्य त्या चक्रास अनुसरून प्रयाण करू लागले ॥९॥
दण्डरत्नाला पुढे करून सेनापति पुढे जात होता व सर्व उंच सखल असे दुर्गम वनप्रदेश प्रयत्नावाचून त्याने सम केले ॥ ९१ ॥
पुढे चाललेल्या दण्डरत्नाने वनातले मार्ग राजमार्गाप्रमाणे केले. त्यामुळे सर्व सैन्य न अडखळणान्या गतीने स्वेच्छेने गमन करू लागले ।। ९२ ॥
यानंतर प्रजेचा स्वामी अशा भरतराजाने मार्गात शरत्कालच्या शोभेला पाहिले. ती पाहताना सर्व दिशाना अलंकृत करणारी व निर्मल अशी आपली कीर्ति आहे काय असे त्याला वाटले ।। ९३ ।।
कमलांचा सुगन्ध चोहोंकडे पसरणारी व शरदलक्ष्मीची जणु मुखे आहेत की काय अशी सरोवरे पाहून भरतराजा फार आनन्दित झाला ।। ९४ ।।
__ सरोवराच्या काठी मधुर शब्द करणारे व कमलाच्या देठातील तन्तुरूपी लोणी खाऊन पुष्ट झालेले जणु शरदलक्ष्मीची बालके अशा हंसाना भरतराजाने पाहिले ॥ ९५ ।।
एका सरोवरातील राजहंस पक्षी आपल्या प्रियहंसीला आपल्या चोचीने कमलाचे तन्तु देत होता हे दृश्य पाहून या भरतराजाच्या मनाला फार आनंद वाटला ।। ९६ ॥
चक्रवाक पक्ष्याला सरोवराच्या लाटानी आच्छादित झालेली आपली प्रिय सोबतीण दिसली नाही म्हणून तो सरोवराच्या भोवती दीन शब्द करीत फिरू लागला. हे पाहून चक्रवर्तीच्या मनाला गंमत वाटली ।। ९७ ॥
कमलांच्या परागाच्या धुळीने एक हंसी पिवळी बनली होती तिला पाहून तिच्या प्रिय हंसाला ही चक्रवाकीच आहे का अशी शंका वाटली व त्याने तिचा त्याग केला हे भरतराजाने पाहिले व त्याला आश्चर्य वाटले ॥ ९८ ॥
म.११
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org