Book Title: Mahapurana Part 2
Author(s): Jinsenacharya, Jindas Shastri
Publisher: Shantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
View full book text
________________
८२)
महापुराण
(२६-९९
तरङ्गर्धवलीभूतविग्रहां कोककामिनीम् । व्यामोहादनुधावन्तं स जरखंसमैक्षत ॥ ९९ नदीपुलिनदेशेषु हंससारसहारिषु शयनेष्विव तस्यासीद्धृतिः शुचिमसीमसु ॥ १०० रोषोलताशि खोत्सृष्टपुष्पप्रकरशोभिनीः । सरित्तीरभुवोऽवर्शज्जलोच्छवासतरङगिताः ॥ १०१ लतालयेषु रम्येषु रतिरस्य प्रपश्यतः । स्वयङ्ग लत्प्रसूनौघरचितप्रस्तरेष्वभूत् ॥ १०२ क्वचिल्लतागृहान्तस्थचन्द्रकान्तशिलाश्रितान् । स्वयशोगानसंसक्तान्किन्नरान्प्रभुरेक्षत ॥ १०३ क्वचिल्लताप्रसूनेषु विलीनमधुपावलीः । विलोक्य स्रस्तकेशीनां सस्मार प्रिययोषिताम् ॥ १०४ सुमनोवर्षमातेनुः प्रीत्येवास्याधिमूर्धजम् । पवनाधूतशाखाग्राः प्रफुल्ला मार्गशाखिनः ॥ १०५ सच्छायान्सफलांस्तुङ्गान्सर्वसम्भोग्यसम्पदः । मार्गदुमान्समद्राक्षीत्स नृपाननुकुर्वतः ॥ १०६
तरंगानी जिचे शरीर पांढरे झाले आहे अशा चक्रवाकीला ही हंसी आहे असे मानून मोहाने-भ्रमाने एक वृद्ध हंस तिच्याकडे धावत जात आहे असे राजाने पाहिले ।। ९९ ।।
ज्यांचा सीमाप्रदेश अतिशय शुचि-स्वच्छ आहे, जे हंस व सारस पक्ष्यानी मनोहर वाटतात असे नद्यांचे वाळवंटप्रदेश भरतराजाला शय्येप्रमाणे वाटले व त्याच्या मनाला फार आनंद झाला ।। १०० ।।
किना-यावरील वेलींच्या शेंड्यातून गळालेल्या पुष्पसमूहानी शोभणान्या व पाण्याच्या उसळण्याने तरंगयुक्त झालेल्या अशा नद्यांच्या तटप्रदेशाना भरतचक्रवर्तीने पाहिले ।। १०१॥
आपोआप गळत असलेल्या फुलांच्या समूहाने जेथे शय्या तयार झाल्या आहेत अशा रम्य लतागृहाकडे पाहणाऱ्या भरतराजाच्या मनात प्रेम उत्पन्न झाले ।। १०२ ॥
कोठे कोठे लतागृहाच्या आतच चन्द्रकान्तशिलातलावर बसून स्वतःचे म्हणजे भरतराजाच्या यशोगानात गढून गेलेल्या किन्नरांना भरताने पाहिले ॥ १०३ ॥
कोठे कोठे वेलींच्या फुलामध्ये गुंग झालेल्या भुंग्यांच्या पंक्तीला पाहून ज्यांचे केशांची रचना ढिली होऊन खाली लोंबत आहे अशा आपल्या प्रियस्त्रियांचे भरताला स्मरण झाले ॥ १०४॥
__ वाऱ्याने ज्यांच्या फांद्यांचे शेंडे हालत आहेत असे मार्गावरचे प्रफुल्ल वृक्ष जणु प्रीतीने या भरतराजाच्या मस्तकावर पुष्पवृष्टि करू लागले ॥ १०५ ॥
जसे राजे सच्छाय- उत्तम छायेने-कान्तीने युक्त असतात तसे मार्गस्थ वृक्ष ही सच्छाय उत्तम दाट सावलीने युक्त असतात. जसे राजे सफल असतात अनेक प्रकारच्या धन प्राप्तीने युक्त असतात तसे वृक्ष तुङ्ग-उंच व सफल होते. राजाची संपत्ती सर्वांना उपभोगयोग्य असते तसे मार्गस्थ वृक्षांची पाने, फुले व फळांची संपत्ति सर्वभोग्य होती. त्यामुळे राजाचे अनुकरण करणा-या त्या वृक्षाना भरतराजाने मोठ्या आदराने पाहिले ॥ १०६ ॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org