Book Title: Mahapurana Part 2
Author(s): Jinsenacharya, Jindas Shastri
Publisher: Shantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
View full book text
________________
८६)
महापुराण
(२६-१३१
विस्तीर्णैर्जनसम्भोग्यैः कूजवंसालिमेखलैः । तरङ्गवसनैःकान्तःपुलिनर्जघनरिव ॥ १३१ लोलोमिहस्तनिघृतपक्षिमालाकलस्वनः । किमप्यालपितुं यत्नं तन्वती वा तटद्रुमैः ।। १३२ क्षतीर्वनेभदन्तानां रोधोजघनवतिनीः । रुन्धतीमधिभीत्येव लसदुर्मिदुकलकः ॥ १३३ रोमराजीमिवानीलां वनराजी विवृण्वतीम् । तिष्ठमानामिवावर्तव्यक्तनाभिमुदन्वते ॥ १३४ विलोलवीचिसट्टादुत्थितां पतगावलिम् । पताकामिव बिभ्राणां लब्धां सर्वापगाजयात् ॥ १३५ समांसमीनां पर्याप्तपयसं धीरनिःस्वनम् । जगतां पावनी मान्यां हसन्तीं गोमचचिकाम् ॥ १३६ गुरुप्रवाहप्रसृतां तीर्थकामैरुपासिताम् । गम्भीरशब्दसम्भूति जैनी श्रुतिमिवामलाम् ॥ १३७
धारण केले आहे व हिच्या दोन्ही किनाऱ्यावर जी वनपंक्ति आहे तीच हिचे नेसण्याचे व पांघरण्याचे वस्त्र असल्यामुळे ही गंगानदी स्त्रीप्रमाणे भासत आहे ।। १३० ।। .
ही गंगानदी विस्तीर्ण वाळवंटरूपी जघन-ढुंगणाला धारण करिते व ते सर्वजनभोग्य झालेले आहे. ते तिचे ढुंगण शब्द करणाऱ्या हंसरूपी कमरपट्टयानी शोभत आहे. चंचल जे तरंग हेच हिचे-गंगानदीचे हात आहेत व या हातानी हुसकून लावलेले म्हणजे वर उडविलेलें जे पक्षी त्यांच्या मधुर शब्दानी जणु ही आपल्या तटावर असलेल्या झाडाबरोबर बोलण्याचा काही प्रयत्न करीत आहे अशी भासत आहे ।। १३१-१३२ ॥
रानटी हत्तीनी आपल्या दातानी जे हिच्या तटरूपी ढुंगणावर नखक्षते केली आहेत ती आपला पति जो समुद्र त्याला दिसू नयेत म्हणून जणु त्याच्या भीतीने ही गंगानदीरूपी स्त्री शोभणाऱ्या लाटारूपी रेशमी वस्त्रानी जणु झाकित आहे अशी भरतराजाला दिसली ।। १३३ ॥
गंगानदीच्या तटावर जी वनपंक्ति होती ती जणु तिच्या पोटावर नीलवर्णाची रोमराजी आहे व ती जणु आपल्या समुद्ररूपी पतीला दाखवित आहे व जे पाण्याचे भोवरे तिच्या ठिकाणी उत्पन्न होत आहेत हेच जणु या गंगानदीरूपी स्त्रीची बेंबी आहे व ती आपल्या समुद्ररूपी पतीला व्यक्त करून दाखवित आहे अशी शोभते ॥ १३४ ।।
चंचल लाटांच्या धक्क्यामुळे वर उडालेली जी पक्ष्यांची पंक्ति हीच जणु पताका जी या गंगानदीने सर्व नद्यांना जिंकून मिळविली आहे व तिला हिने धारण केले आहे असे भरतराजाला वाटले ॥ १३५ ॥
प्रत्येक वर्षी जिच्यात खूप पाणी येते व जी गंभीरध्वनि करते. जी जगाला पावन करते व जगताला आदरणीय आहे अशी ही गंगानदी जणु उत्तम गायीला हसत आहे. कारण ती ही प्रत्येक वर्षी प्रसवते, पुष्कळ दूध देते, धीरगंभीर असा हंभा हंभा शब्द करते व ती जगताला पावन करते मान्य आहे ।। १३६ ।।
ही गंगानदी मोठ्या प्रवाहाने फोफावली आहे. जे हिला तीर्थ समजतात ते हिची सेवा-उपासना करतात. गंभीर शब्दाची उत्पत्ति हिच्यापासून होते अर्थात् ही गंभीर गर्जना करते अशी असल्यामुळे जिनेश्वराच्या मुखातून निघालेल्या श्रुतिप्रमाणे दिसते. कारण
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org