Book Title: Mahapurana Part 2
Author(s): Jinsenacharya, Jindas Shastri
Publisher: Shantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
View full book text
________________
२७-३२)
महापुराण
(९३
स्थलाब्जशङ्किनी हंसी सरस्यब्जरजस्तते। संहृत्य पक्षविक्षेपं विशन्तीयं निमज्जति ॥ २५ हंसोऽयं निजशावाय चञ्चवोद्धृत्य लसविसम् । पीथबुद्धचा ददात्यस्मै शशाङ्ककरकोमलम् ॥२६ कृतयत्नं प्लवन्तेऽमी राजहंसाः सरोजले । सरोजिनीरजःकीर्णे धूतपक्षाःशनैःशनैः ॥ २७ चक्रवाकी सरस्तीरे तरङ्ग स्थगिताममूम् । अपश्यन्करर्ण रौति चक्राह्वः साश्रुलोचनः ॥ २८ मभ्येति वरटाशकी धार्तराष्ट्रः कृतस्वनः । सरस्तरङ्गशुभ्राङ्की कोककान्तामनिच्छतीम् ॥ २९ अनुगंगातट भाति साप्तपर्णमिदं वनम् । सुमनोरेणुभियोम्नि वितानश्रियमादधत् ॥ ३० मन्दाकिनीतरङगोत्थपवनोऽध्वश्रमं हरन् । शनैःस्पृशति नोऽङगानि रोधोवनविधूननः ॥ ३१ आतिथ्यमिव नस्तन्वन् हृतगडगाम्बुशीकरैः । अभ्येति पवमानोऽयं वनवीथीविधूनयन् ॥ ३२
सरोवरात चोहोकडे कमलांचा पराग पसरला होता. त्यामुळे हंसिणीला हे जमिनीवरचे कमल आहे अशी शंका आली. म्हणून तिने आपले पसरलेले पंख आखडून घेतले व त्या कमलाकडे जात असता ती बुडत आहे. हे विभो, आपण ते दृश्य पहा ॥ २५ ।।
हा हंस चन्द्राच्या किरणाप्रमाणे मृदु असे सुंदर कमलतन्तु चोचीने काढून हे पाजण्यास योग्य आहेत असे समजून आपल्या पिलाला देत आहे ।। २६ ॥
हे राजहंस कमलपरागानी व्याप्त झालेल्या या सरोवरांतील पाण्यांत हळूहळू आपले पंख हालवून यत्नपूर्वक पोहत आहेत ।। २७ ।।
तरङ्गानी आच्छादिलेल्या आपल्या चक्रवाकीला सरोवराच्या तटावर न पाहिल्यामुळे ज्याचे नेत्र अश्रूनी डबडबलेले आहेत असा चक्रवाकपक्षी करुणा उत्पन्न होईल असे रडत आहे ॥ २८ ॥
हा काळ्या चोचीचा आणि काळ्या पायांचा संभोगेच्छु हंसपक्षी शब्द करीत, सरोवराच्या तरंगानी जिचे अंग शुभ्र दिसत आहे अशा चक्रवाकीला ही हंसी आहे असे समजून तिच्या मागून जात आहे पण ती त्याला इच्छित नाही ।। २९ ।।
गंगेच्या किना-याला अनुसरून हे सातविणीच्या झाडांचे वन शोभत आहे. याने आपल्या फुलांच्या परागांनी आकाशात छताची शोभा उत्पन्न केली आहे ॥ ३० ॥
मंदाकिनीच्या तरंगापासून उत्पन्न झालेला हा वायु तिच्या तटावरील वनाला हालवित आहे व आमच्या मार्गाच्या श्रमाला नाहीसे करण्यासाठी आमच्या अंगाना मंदमंद झुळकीने स्पर्श करीत आहे ॥ ३१ ।।
वनपंक्तीला हालविणारा हा वारा आणलेल्या गंगानदीच्या जलबिन्दूनी आमचा अतिथिसत्कार करण्यासाठी येत आहे ।। ३२ ।।
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org