Book Title: Mahapurana Part 2
Author(s): Jinsenacharya, Jindas Shastri
Publisher: Shantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
View full book text
________________
९६)
महापुराण
(२७-५०
कदम्बामोवसुरभिः केतकोधूलिधूसरः । तपात्ययानिलो देव नित्यमत्र विज़म्भते ॥ ५० माद्यन्ति कोकिलाः शश्वत्सममत्र शिखण्डिभिः । कलहंसीकलस्वानः संमूच्छितविकूजिताः ॥ ५१ कूजन्ति कोकिला मत्ताःकेकायन्ते कलापिनः । उभयस्यास्य वर्गस्य हंसाः प्रत्यालपन्त्यमी ॥ ५२ इतोऽमी किन्नरीगीतमनुकूजन्ति षट्पदाः । सिद्धोपवीणितान्येष निन्हुतेऽन्यभूतस्वनः ॥५३ जितनूपुरझङ्कारमितो हंसविकूजितम् । इतश्च खेचरीनृत्यमनुनृत्यच्छिखावलम् ॥ ५४ इतश्च सैकतोत्सङ्गे सुप्तान्हंसानसशावकान् । प्रातःप्रबोधयत्युच्चैः खेचरीनपुरारवः ॥ ५५ इतश्च रचितानल्पपुष्पतल्पमनोहराः । चन्द्रकान्तशिलागर्भाः सुरैर्भोग्या लतालयाः ॥ ५६ इतीदं वनमत्यन्तरमणीयैः परिच्छवैः । स्वर्गाद्यानगतां प्रीति जनयेत्स्वःसवां सदा ॥ ५७ बहिस्तटवनादेतदृश्यते काननं महत् । नानाद्रुमलतागुल्मवीरुद्भिरतिदुर्गमम् ॥ ५८
__ कदम्बपुष्पांनी सुगंधित आणि केवड्यांच्या परागांनी धूसर असा ग्रीष्मऋतु निघून गेल्यानंतर हे प्रभो, येथे वायु नेहमी वाढत आहे ।। ५० ।।
येथे एका वेळी मोराबरोबर कोकिल देखिल नेहमी उन्मत्त होतात. अर्थात् वर्षाऋतूत देखिल कोकिल येथे शब्द करतात व हंसिणीच्या मधुर शब्दाबरोबर आपल्या शब्दाचे ते मिश्रण करीत आहेत ॥ ५१ ॥
याठिकाणी मत्त झालेले कोकिल शब्द करतात तसेच मोरही आपली केकावाणी नेहमी बोलत आहेत, येथे दोन्ही वर्गाचे अर्थात् हंसपक्षी कोकिलांच्या व मोरांच्या मागून शब्द करीत आहेत ॥ ५२ ॥
या वनाच्या एका स्थानी भुंगे किन्नरीच्या गाण्याला अनुसरून आपला गुंजारव करीत बाहेत व हे कोकिलांचे शब्द ( कुहुकुहु शब्द ) सिद्धजातीच्या देवांच्या वीणांच्या संकाराला लुप्त करीत आहेत ।। ५३ ॥
इकडे पैंजणांच्या झंकाराला जिंकणारे असे हंसांचे शब्द होत आहेत व इकडे मोरपक्षी ज्यांच्या नृत्यांचे अनुकरण करीत असतात असे विद्याधरी स्त्रियांचे नृत्य चालले आहे ।। ५४ ।।
इकडे वाळवंटात आपल्या बालकाबरोबर झोपलेल्या हंसाना अप्सरांच्या पैंजणांचा होणारा मोठा आवाज प्रातःकाळी जागे करून उठवीत आहे ।। ५५ ॥
वनाच्या या बाजूला पुष्कळ फुलानी ज्यावर शय्यांची रचना केली आहे अशा चन्द्रकान्तशिलानी युक्त असलेली व देव ज्यांचा उपभोग घेतात अशी लतागृहे आहेत ।। ५६ ॥
याप्रमाणे हे वन अत्यन्त सुंदर अशा अनेक भोगयोग्यसामग्रीनी स्वर्गीय देवांच्या मनात नेहमी स्वर्गातील उद्यानाविषयींची प्रीति येथे उत्पन्न करीत आहे असे मला वाटत बाहे ।। ५७ ॥ ।
हे राजन, या गंगानदीच्या तीराच्या वनापासून पलिकडचे वन मोठे आहे व त्यात अनेक झाडे, वेली, झुडपे व बारीक वेली असल्यामुळे ते प्रवेश करण्यास अशक्य दिसते ॥५८॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org