Book Title: Mahapurana Part 2
Author(s): Jinsenacharya, Jindas Shastri
Publisher: Shantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
View full book text
________________
९४)
महापुराण
(२७-३३
अगोष्पदमिदं देव देवैवरध्युषितं वनम् । लतालयविभात्यतैः कुसुमप्रस्तराञ्चितैः ॥ ३३ मन्दारवनवीथीनां सान्द्रच्छाया:समाश्रिताः । चन्द्रकान्तशिलास्वेते रंरम्यन्ते नभासदः ॥ ३४ नहो तटवनस्यास्य रामणीयकमद्भुतम् । अवधूतनिजानासा हि रंस्यन्तेऽत्र तत्सुराः॥ ३५ मनोभवनिवेशस्य लक्ष्मीरत्र वितन्यते । सुरदम्पतिभिः स्वरमारब्धरतिविभ्रमैः ।। ३६ इयं निधुवनासक्ताः सुरस्त्रीरतिकाहलाः । हमन्तीव तरङगोत्यैः शीकरैरमरापगा॥ ३७ इतः किन्नरसङगीतमितः सिद्धोपवीणितम् । इतो विद्याधरीनत्तमितस्तद्गतिविभ्रमः ॥ ३८ नृत्तमप्सरसां पश्यन् शण्वंस्तद्गीतनिःस्वनम् । वाजिवक्त्रोऽयमुद्ग्रीवः सममास्ते स्वकान्तया ।। ३९ निष्पर्यायं वनेऽमुष्मिनतुवर्गो विवर्धते । परस्परमिव द्रष्टुमुत्सुफायितमानसः ॥ ४०
हे प्रभो, देव जेथे नेहमी येऊन निवास करतात व वनगायी वगैरे प्राण्यांचा जेथे प्रवेश होत नाही अशा उंच ठिकाणी हे वन आहे. जेथे फुलांच्या शय्या आहेत अशा लतागृहानी हे वन शोभत आहे ।। ३३ ।।
___मंदारवृक्षांच्या वनपंक्तीच्या दाट छायांच्याखाली चन्द्रकान्त शिलावर हे देव बसून वारंवार क्रीडा करून सुखोपभोग घेत आहेत ।। ३४ ।।
हे प्रभो, या तटावरील वनाचे सौन्दर्य अतिशय आश्चर्य उत्पन्न करीत आहे अर्थात् अवर्णनीय आहे. कारण येथे आपले निवासस्थान सोडून देव येथे येऊन खूप क्रीडा करीत असतात ।। ३५ ।।
ज्यानी आपल्या इच्छेला अनुसरून रतिक्रीडा प्रारंभिली आहे, अशा देवानी व देवाङ्गनानी येथे कामदेवाच्या घराची शोभा वाढविली आहे. तात्पर्य-देवदेवीच्या स्वच्छंद रतिक्रीडा पाहून असे वाटते की जणु हे कामदेवाचेच घर आहे ॥ ३६ ॥
ही गंगानदी आपल्या तरंगापासून उत्पन्न झालेल्या व वर उडणाऱ्या जलबिंदूनी संभोग करण्यात असमर्थ होऊन दीनपणाने अस्पष्ट शब्द करणान्या देवांगनाना जणु हसत आहे अशी दिसते ।। ३७ ।।
___ एकीकडे किन्नरदेवाचे गाणे, वादन व नृत्य चालू आहे व एका बाजूला सिद्धजातीच्या देवांचे वीणावादन चाल आहे. एकीकडे विद्याधर स्त्रियांचे नत्याचा कार्यक्रम चालला एका बाजूला विद्याधरस्त्रिया विलासपूर्वक विहार करीत आहेत ॥ ३८ ॥
ज्याचे मुख घोड्यासारखे आहे असा हा किन्नरदेव आपल्या पत्नीसह आपला कंठ उंच करून अप्सरांचे नृत्य व त्यांच्या गायनाचे शब्द ऐकत बसला आहे ॥ ३९ ॥
या वनात एकमेकाना पाहण्यासाठी ज्याचे मन उत्सुक झाले आहे असे वसन्तादिक सहाऋतु निष्पर्याय एकदम वाढू लागले. सहाही ऋतूंची शोभा वनाला प्राप्त झाली आहे ॥४०॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org