________________
२७-४९)
महापुराण
अशोकतरुरत्रायं तनुते पुष्पमञ्जरीम् । लाक्षारक्तैः खगस्त्रीणां चरणैरभिताडितः ॥ ४१ पुस्कोकिलानामालापमुखरीकृतदिङमुखः । चूतोऽयं मञ्जरीपत्ते मदनस्येव तारकाः ॥४२ चम्पका विकसन्त्यत्र कुसुमती वितन्वति । प्रदीपानिव पुष्पौघान् दधतोऽमी मनोभुवः ॥ ४३ सहकारेष्वमी मत्ता विरुवन्ति मधुव्रताः । विजिगीषोरनङ्गस्य काहला इव पूरिताः ॥ ४ कोकिलानकनिःस्वानरलिज्यारवजम्भितैः । अभिषेणयतीवात्र मनोभूर्भुवनत्रयम् ॥ ४५ निचुलःसहकारेण विकसन्नत्र माधवीम् । तनोति लक्ष्मीमणामहो प्रावृश्रिया समम् ॥ ४६ माधवीस्तबकेष्वत्र माधवोऽद्य विजृम्भते । वनलक्ष्मीप्रहासस्य लीलां तन्वत्सु विश्वतः ॥ ४७ वासन्त्यो विकसन्त्येता वसन्तर्तुस्मितश्रियम् । तन्वानाः कुसुमामोवैराकुलीकृतषट्पदाः ॥ ४८ मल्लिकाविततामोदैविलोलीकृतषट्पदः । पादपेषु पदं धत्ते शुचिः पुण्यशुचिस्मितः ॥ ४९
विद्याधरस्त्रियांच्या लाखेच्या रंगाने लाल झालेल्या पायानी ताडला गेलेला अशोक वृक्ष या वनांत पुष्पांच्या मोहराने लकडून जात आहे हे प्रभो, आपण पाहा ।। ४१ ।।
पुरुषकोकिलांच्या कुहुकुहु शब्दानी दाही दिशा शब्दयुक्त करणारा हा आम्रवृक्ष मदनाच्या डोळ्यातील जणु तारका आहेत अशा मोहराना धारण करीत आहे ॥ ४२ ॥
वसन्त ऋतु वृद्धिंगत होत असता हे चम्पकवृक्ष जणु मदनाचे दिवे आहेत अशा पुष्पसमूहाना धारण करीत आहेत ॥ ४३ ।।
हे मत्त झालेले भुंगे आम्रवृक्षावर गुंजारव करीत आहेत व त्यांचा तो गुंजारव त्रैलोक्याला जिंकण्याची इच्छा करणाऱ्या मदनाच्या जणु वाजविल्या जाणाऱ्या तुताऱ्या आहेत ।। ४४ ॥
कोकिलांचे शब्द हेच जणु नगान्यांचे शब्द व भुंग्यांचे गुंजारव हेच जणु धनुष्याच्या दोरीचे टङ्कार हे खूप वृद्धिंगत झाल्यामुळे जणु मदन त्रैलोक्याचेवर हल्ला करण्यास उद्युक्त झाला आहे असे वाटते ॥ ४५ ॥
__आम्रवृक्षाबरोबर विकास पावणारा हा विचूल नामक वृक्ष वर्षाऋतूच्या लक्ष्मी-शोभेबरोबर माधवी लक्ष्मीला वसंतऋतूच्या शोभेला पूर्णपणे वाढवित आहे. अहो, हे आश्चर्यकारक दिसते ॥ ४६ ॥
ह्या वनात वनलक्ष्मीच्या मोठ्या हसण्याच्या शोभेला- लीलेला वाढविणाऱ्या माधवीलतांच्या पुष्पगुच्छामध्ये आज वसन्त ऋतु वाढत आहे ॥ ४७ ।।
वसन्तऋतूच्या हास्यशोभेला वाढविणा-या अशा या माधवीलता प्रफुल्लित झाल्या आहेत व त्यानी आपल्या पुष्पांच्या सुगन्धानी भुंग्याना फार लुब्ध केले आहे ।। ४८ ॥
मोगयाच्या फुलांचे वास चोहीकडे पसरून त्यानी भुंग्याना अतिशय लुब्ध केले व याप्रमाणे ग्रीष्मऋतु ज्याने शुचि-निर्मल हास्य धारण केले आहे तो सर्व वृक्षावर आपले स्थान ठेवता झाला ॥ ४९ ॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org