Book Title: Mahapurana Part 2
Author(s): Jinsenacharya, Jindas Shastri
Publisher: Shantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
View full book text
________________
९२)
महापुराण
(२७-१६
नववेदीमियं धत्ते समुत्तुङ्गां हिरण्मयीम् । आज्ञामिव तवालध्यां नभोमार्गविलअघिनीम् ॥ १६ इतः प्रसीद देवेमां शरल्लक्ष्मीं विलोकय । वनराजिषु संख्ढां सरित्सु सरसीषु च ॥ १७ इमे सप्तच्छदाः पौष्पं विकिरन्ति रजोऽभितः । पटवासभिवामोदसंवासितहरिन्मुखम् ॥ १८
कुसुमबाणस्य बाणैरिव विकासिभिः । हियते कामिनां चेतो रम्यं हारि न कस्य वा ॥ १९ विकसन्ति सरोजानि सरःसु सममुत्पलैः । विकासिलोचनानीय ववनानि शरच्छ्रियः ॥ २० पङ्कजेषु निलीयन्ते भ्रमरा गन्धलोलुपाः । कामिनीमुखपद्मेषु कामुका इव काहलाः ॥ २१ मनोजशरपुङ्खाभैः पक्षेमंकरा इमे । विचरन्त्यग्जिनीखण्डे मकरन्दरसोत्सुकाः ॥ २२ रूषिताः कञ्जकिञ्जल्कैराभान्त्येते मधुव्रताः । सुवर्णकपिशेरङ्गः कामाग्नेरिव मुर्मुराः ॥ २३ स्थलेषु स्थलपद्मिन्योविक सत्यश्चकासति । शरच्छ्रियो जिगीषन्त्यो दृष्यशाला इवोत्थिताः ॥ २४
जी अतिशय उंच आहे, जी सोन्याची बनलेली आहे, जिने आकाशमार्गाला उल्लंघिले आहे, पण जिला आपल्या आज्ञेप्रमाणे कोणी उल्लंघू शकत नाही अशा वनवेदिकेला या नदीने धारण केले आहे ।। १६ ।।
हे राजेश्वरा, आपण प्रसन्न व्हा व येथील वनात नद्यांचे स्थानी व सरोवरात शरदऋतूने जी शोभा उत्पन्न केली आहे तिचे अवलोकन करा ।। १७ ।।
हीं सात्विणीची झाडे आपल्या पुष्पांचा पराग सभोवती पसरतात त्यामुळे वस्त्राला सुगन्धित करणाऱ्या चूर्णाप्रमाणे सर्व दिशांची मुखे सुगन्धित झाली आहेत ॥। १८ ।।
मदनाचे जणु बाण आहेत अशी बाणवृक्षांची जी विकसित फुले त्यानी कामी स्त्री-पुरुषांची मने हरण केली आहेत. बरोबरच आहे की, रम्य पदार्थ कोणाच्या मनाला आवडत नाही बरे ? ॥ १९ ॥
जणु शरत्कालाच्या लक्ष्मीची ही प्रफुल्ल डोळयानी शोभणारी तोंडे आहेत अशी सरोवरात उत्पन्न झालेली ही नीलकमलाबरोवर दिनविकासि कमले प्रफुल्ल झाली आहेत. हे प्रभो, आपण त्याना पाहा ॥ २० ॥
अस्पष्ट शब्द उच्चारणारे कामुक पुरुष जसे कामी स्त्रियांच्या मुखकमलावर आसक्त होतात तसे सुगन्धात लुब्ध झालेले भुंगे या कमलसमूहात आसक्त झाले आहेत ।। २१ ।।
मदनाच्या बाणाच्या मागच्या भागाला लावलेल्या पंखाप्रमाणे ज्यांचे पंख आहेत असे भुंगे कमलिनींच्या समूहातील मकरन्दपानाविषयी उत्सुक होऊन त्यावर भ्रमण करीत आहेत ॥ २२ ॥
कमलातील केसरानी सर्व बाजूनी माखले गेलेले हे भुंगे सोन्याप्रमाणे पिवळे झालेल्या आपल्या अंगानी मदनाग्नीच्या ठिणग्याप्रमाणे भासत आहेत ॥ २३ ॥
जमिनीवर उत्पन्न झालेल्या व विकसलेल्या या स्थलकमलिनी जगाला जिंकण्याची अभिलाषा धरणाऱ्या शरद्लक्ष्मीचे उभारलेले जणु तंबू आहेत अशा शोभतात ।। २४ ।।
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org