Book Title: Mahapurana Part 2
Author(s): Jinsenacharya, Jindas Shastri
Publisher: Shantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
View full book text
________________
२७-१५)
पद्महदाद्धिमवतः प्रसन्नादिव मानसात् । प्रसूता पप्रथे पृथ्व्यां शुद्धजन्माहि पूज्यते ॥ ९ व्योमापगामिमां प्राहुवियतः पतितां क्षितौ । गङगादेवीगृहं विष्वगाप्लाव्य स्वजलप्लवैः ॥ १० बिर्भात हिमवानां शशाङ्ककरनिर्मलाम् । आसिन्धोः प्रसृतां कीर्तिमिव स्वां लोकपावनीम् ॥ ११ वनराजीद्वयेनेयं बिर्भात तटवर्तना । बाससोरिव युग्मेन विनीलेन धृतश्रिया ।। १२ स्वताश्रयिणीं धत्ते हंसमालां कलस्वनाम् । काञ्चीमिवेयमम्भोजरजः पिञ्जरविग्रहाम् ॥ १३ नदीसखीरियं स्वच्छमृणालशकलामलाः । सम्बिर्भात स्वसात्कृत्य सख्यं इलाध्यं हि तादृशाम् ॥ १४ राजहंसैरियं सेव्या लक्ष्मीरिव विभाति ते । तन्वती जगतः प्रीतिमलध्यमहिमा परैः ।। १५
महापुराण
पद्मसरोवर हैं जणु हिमवान् पर्वताचे प्रसन्न मन आहे व त्यापासून ही नदी उत्पन्न शाली असल्यामुळे या पृथ्वीत तिची फार प्रसिद्धी झाली आहे. बरोबरच आहे की, ज्याचे जन्म शुद्ध वंशात झालेले असते तो सर्वत्र पूज्य होतो ।। ९ ।।
( ९१
ही गंगा आकाशातून पृथ्वीवर आली म्हणून हिला व्योमापगा - आकाशनदी असे म्हणतात व हिने आपल्या जलप्रवाहानी गंगादेवीचे गृह-प्रासाद सर्व बाजूनी भिजवून सोडलें आहे ।। १० ।।
लवणसागरापर्यन्त पसरलेली, लोकाना पवित्र करणारी व चन्द्राच्या किरणाप्रमाणे निर्मल अशी ही गंगानदी जणु आपली कीर्ति आहे असे समजून तिला हा हिमवान् पर्वत धारण करित आहे ॥। ११ ॥
आपल्या दोन्ही बाजूच्या तटावर असलेल्या ज्या दोन वनपंक्ति त्याना जणु शोभिवंत व नील वर्णाची दोन वस्त्रे म्हणून ही नदी धारण करीत आहे ।। १२ ।।
आपल्या तटाचा जिने आश्रय घेतला आहे, कमलांच्या परागानी पिवळसर जिचे शरीर झाले आहे व जी मधुर शब्द करीत आहे अशा हंसपंक्तीला ही गंगानदी जणु आपल्या कमरपट्ट्याप्रमाणे धारण करित आहे ॥ १३ ॥
ही गंगानदी कमलाच्या दांडयातील शुभ्र तन्तूप्रमाणे निर्मल अशा आपल्या नदीरूपी मैत्रिणीना आपल्यामध्ये विलीन करून त्याना धारण करीत आहे. हे योग्यच आहे कारण अशा मोठ्या व्यक्तीचे सख्य प्रशंसनीयच असते ।। १४ ।।
Jain Education International
हे प्रभो, आपली लक्ष्मी जशी राजहंसानी-श्रेष्ठ राजानी सेव्य-उपभोग्य होण्यास योग्य आहे व जगाला संतुष्ट करणारी, प्रीतियुक्त आहे व जिचा मोठेपणा दुसऱ्याकडून उल्लंघिला जात नाही अशी आहे. त्याप्रमाणे ही नदीही राजहंसपक्षानी सेवनीय आहे, जगाच्या संतोषाला कारण आहे व हिचा मोठेपणा कोणाला उल्लंघिता येणार नाही अशी आहे ।। १५ ।।
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org