Book Title: Mahapurana Part 2
Author(s): Jinsenacharya, Jindas Shastri
Publisher: Shantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
View full book text
________________
सप्तविंश पर्व
अथ व्यापारयामास दृशं तत्र विशाम्पतिः । प्रसन्नःसलिलः पाद्यं वितरन्न्यामिवात्मनः ॥ १ व्यापारितदृशं तत्र प्रभुमालोक्य सारथिः । प्राप्तावसरमित्यूचे वचश्चेतोऽनुरञ्जनम् ॥ २ इयमाह्लादिताशेषभुवना देवनिम्नगा। रजो विधुन्वती भाति भारतीव स्वयम्भुवः ॥ ३ पुनातीयं हिमाद्रि च सागरं च महानदी । प्रसूतौ च प्रवेशे च गम्भीरा निर्मलाशया ॥४ इमां वनगजाः प्राप्य निर्वान्त्येते मदश्च्युतः । मुनीन्द्रा इव साद्विद्यां गम्भीरां तापविच्छिक्ष्म् ॥ ५ इतःपिवन्ति वन्येभाःपयोऽस्याः कृतनिःस्वनाः । इतोऽमी पूरयन्त्येनां मुक्तासाराः शरद्घनाः ॥ ६ अस्याः प्रवाहमम्भोधिर्धत्ते गाम्भीर्ययोगतः। असोढं विजयान तुडगेनाप्यचलात्मना ॥ ७ अस्याः पयःप्रवाहेण नूनमन्धिवितृड्भवेत् । क्षारेण पयसा स्वेन दह्यमानान्तराशयः॥८
----------------
जणु आपणास पाय धुण्यासाठी स्वच्छ पाणी देत आहे की काय अशा गंगेकडे भरतेश्वराने आपली दृष्टि वळविली. आपल्या प्रभूने भागीरथी नदीकडे दृष्टि वळविली हे पाहून त्याच्या मनाला हर्षयुक्त करणारे समयोचित भाषण पुढे वणिल्याप्रमाणे सारथ्याने केले ॥ १-२॥
हे प्रभो, सर्व जगताला आनंदित करणारी ही देवनदी भागीरथी रजाला-धुराळ्याला व मनातील पापाला नष्ट करणान्या भगवान् ऋषभदेवाच्या वाणीप्रमाणे शोभत आहे. गंभीर नि जलाशयानी-डोहांनी भरलेली ही महानदी गंगा आपले जन्मस्थान अशा हिमालयपर्वताला व आपले प्रवेशस्थान अशा लवणसमुद्राला पवित्र करीत आहे ॥ ३-४ ॥
जसे संसारतापाला नष्ट करणाऱ्या गंभीर उत्तम अध्यात्मविद्येची प्राप्ति करून घेऊन मुनीन्द्र शान्ति मिळवितात, सुखी होतात तसे ज्यांच्या गंडस्थलातून मद गळत आहे असे हे वनगज या नदीला प्राप्त करून अर्थात् हिच्यात प्रवेश करून सुखी होतात ॥ ५ ॥
या नदीच्या एका बाजूला येऊन मोठ्याने शब्द करणारे वनगज या महानदीचे पाणी पितात व एका बाजूला गर्जना करणारे व जलवृष्टि करणारे हे शरत्कालचे मेघ या गंगानदीला पाण्यांनी भरीत आहेत ॥ ६॥
हा विजयार्घ पर्वत तुंग-उंच आहे व अचल अतिशय निश्चल आहे तथापि तो तिचा प्रवाह धारण करण्यास असमर्थ झाला पण लवणसमुद्र अतिशय गंभीर व खोल आहे त्यामुळे त्याने हिचा प्रवाह धारण केला आहे ॥ ७ ॥
स्वतःच्या क्षार पाण्याने ज्याच्या पोटात दाह उत्पन्न झाला आहे असा हा लवणसमुद्र खरोखर हिच्या पाण्याच्या प्रवाहाने तहानेने रहित झाला असेल ॥ ८ ॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org