Book Title: Mahapurana Part 2
Author(s): Jinsenacharya, Jindas Shastri
Publisher: Shantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
View full book text
________________
महापुराण
(२६-११५
आपीतपयसः प्राज्यक्षीरा लोकोपकारिणीः । पयस्विनीरिवापश्यत्प्रसृताः शालिसम्पदः ॥ ११५ अवतंसितनालाब्जाः कञ्जरेणुश्रितस्तनीः । इक्षुदण्डभृतोऽपश्यच्छालीञ्छोत्कुर्वतीः स्त्रियः ॥ ११६ हारिगीतस्वनाकृष्टर्वेष्टिता हंसमण्डलैः । शालिगोप्यो दृशोरस्य मुदं तेनुर्वषटिकाः ॥ ११७ कृताध्वगोपरोधानि गीतानि दधतीः सतीः । न्यस्तावतंसाः कणिशैः शालिगोपीर्ददर्श सः ॥ ११८ सुगन्धिमुखनिःश्वासाभ्रमरैराकुलीकृताः । मनोऽस्य जन्हुः शालीनां पालिकाः कुलबालिकाः।।११९ उपाध्वं प्रकृतक्षेत्रान्क्षेत्रिणः परिषावतः । बलोपरोधरायस्तानक्षतासौ सकौतुकम् ॥ १२० उपशल्यभुवोऽब्राक्षीनिगमानभितो विभुः । केदारलावैराकीर्णा भ्राम्यद्भिः स कृषीवलैः ॥ १२१ सोऽपश्यनिगमोपान्ते पथः संस्त्यानकर्दमान् । प्रव्यक्तगोरवुरक्षोदस्थपुटानतिसङ्कटान् ॥ १२२
ज्यानी पुष्कळ पाणी प्राशन केले आहे व ज्या पुष्कळ दूध देतात व त्यामुळे ज्या लोकावर जणु उपकार करीत आहेत अशा गाईच्या समूहाप्रमाणे पुष्कळ पाणी पिऊन ज्या पुष्ट झाल्या आहेत व उत्तम दुधासारखा पांढरा चीक ज्यातून निघत आहे व जगाला पुष्ट करून त्यावर ज्या उपकार करीत आहेत अशा साळीच्या संपत्तीना भरताने पाहिले ।। ११५ ।।
ज्यानी देठासहित कमल कानावर ठेवून आपले कान भूषविले आहेत, ज्यांच्या स्तनावर कमलपराग पसरला आहे, ज्यानी आपल्या हातात काठी म्हणून ऊस घेतले आहेत व ज्या साळीधान्याचे पक्ष्यापासून रक्षण करण्यासाठी छोत्कार शब्द करीत आहेत अशा शेतकन्याच्या स्त्रियांना भरतराजाने पाहिले ।। ११६ ॥
कर्णमधुर गाण्याच्या स्वराने आकृष्ट झालेल्या हंसपक्ष्यानी घेरलेल्या साळीचे रक्षण करणाऱ्या तरुण स्त्रियानी भरतराजाच्या नेत्राना आनंदित केले॥ ११७ ॥
__ ज्यानी मधुरस्वराने वाटसरांच्या गमनाला प्रतिबन्ध केला आहे अशी मधुर गाणी म्हणणाऱ्या व साळीचे लोंबे ज्यानी आपल्या कानावर भूषण म्हणून ठेवले आहेत अशा सती शेतकऱ्यांच्या स्त्रियांना भरतराजाने पाहिले ॥ ११८ ।।
सुगंधयुक्त मुखाच्या श्वासामुळे भुंग्यानी ज्याना वारंवार घाबरे केले आहे, व ज्या साळीचे रक्षण करीत आहेत अशा कुलीन मुलीना भरतराजाने पाहिले ॥ ११९ ॥
मार्गाला लागूनच ज्यानी शेते पेरलेली आहेत असे शेतकरी लोक सैन्यातील लोक आपल्या शेतातून जाऊ नयेत म्हणून चोहोकडे धावत आहेत पण जबरदस्तीने सैन्य शेतातून जाऊ लागले म्हणून जे खिन्न झाले अशा त्याना भरतराजाने कौतुकाने पाहिले ।। १२० ॥
मोठ्या नगराच्या सीमेजवळ शेतकऱ्याच्या पुष्कळ वाड्या होत्या. त्या वाडीमध्ये इकडून तिकडून फिरणारे व धान्याची कापणी करणारे अशा शेतकऱ्यानी भरतराजाला पाहिले ॥१२१॥
वाडीजवळचे मार्ग ज्यातील चिखल वाळून गेला आहे असे होते व त्यात गायींच्या पावलांचे ठसे उमटले होते व ते मार्ग उंच सखल असल्यामुळे अगदी अवघड होते, अरूंद होते. अशा मार्गाना भरतेश्वराने पाहिले ।। १२२ ।।
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org