Book Title: Mahapurana Part 2
Author(s): Jinsenacharya, Jindas Shastri
Publisher: Shantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
View full book text
________________
२६-११४)
महापुराण
(८३
सरस्तीरभुवोऽपश्यत्सरोजरजसातताः । सुवर्णरजसा शङ्कामध्वन्यहृदि तन्वतीः ।। १०७ बलरेणभिरारुद्ध दोषामन्ये नभस्यसौ । करुणां रुदती वीक्ष्य चक्रे चक्राह्वकामिनीम् ॥ १०८ गवां गणानथापश्यद्गोष्पवारण्यचारिणः । क्षीरमेघानिवाजलं क्षरत्क्षीरप्लुतान्तिकान् ॥ १०९ सौरभेयान्स शृङगानसमुत्खातस्थलाम्बुजान् । मृणालानि यशांसीव किरतोऽपश्यदुन्मदान् ॥ ११० वात्सकं क्षीरसम्पोषादिव निर्मलविग्रहम् । सोऽपश्यच्चापलस्येव परां कोटि कृतोत्प्लुतम् ॥ १११ स पक्वकणिशानम्रकलमक्षेत्रमैक्षत । नौद्धत्यं फलयोगीति नृणां वक्तुमिवोद्यतम् ॥ ११२ वप्रान्तर्भुवमाघ्रातुमिवोत्पलमिवानतान् । स कैवार्येषु कलमान् वीक्ष्यानन्दं परं ययौ ॥ ११३ फलानतान्स्तम्बकरीन् सोऽपश्यद्वप्रभूमिषु । स्वजन्महेतून्केदारान् नमस्यत इवादरात् ॥ ११४
-----..............................
सरोवराचे तीरभूमिप्रदेश कमलांच्या परागधुळीने आच्छादित झाले होते त्यामुळे ते वाटसरूंच्या मनात सोन्याच्या धुळीनी व्याप्त झाले आहेत अशी शंका उत्पन्न करीत असत. अशा सरोवराच्या तीरभूमीना भरतराजाने पाहिले ।। १०७ ॥
सैन्याच्या धुराळयाने आकाश जेव्हां व्याप्त झाले तेव्हा दिवसा देखील अंधकाराने ते व्याप्त झाले. त्यामुळे चक्रवाक पक्ष्याची मादी रडू लागली. कारण आता आपल्या पतीचा वियोग होईल असे तिला वाटले. ते तिचे रडणे पाहून भरतराजाच्या मनात करुणा उत्पन्न झाली ॥१०८॥
यानंतर काही पुढे गमन करून गाई जेथे चरतात अशी कुरणे लागली. तेथे गायींचे समूह भरतराजाने पाहिले. गळणान्या दुधांनी तेथील जमीन भरून गेली होती. त्यामुळे तो गाईंचा समूह दुधाचे जणु मेघ आहेत असे राजाला वाटले ।। १०९ ।।
आपल्या शिंगांच्या अग्रानी स्थलकमलाना उपडून त्यातील कमलतन्तूंना जणु जे यशाप्रमाणे भासत आहेत त्यांना इकडे तिकडे फेकणा-या पसरणान्या उन्मत्त बैलाना भरतराजाने पाहिले ॥ ११० ॥
भरतराजाने गायींच्या वासरांचा समूह पाहिला. शुभ्र अशा दुधाने ज्यांचे चांगले पोषण झाले असल्यामुळे तो अतिशय शुभ्र वर्णाचा दिसत होता. व तो समूह उडया मारीत असल्यामुळे जणु चपलपणाच्या पराकोटीला प्राप्त झाला होता ॥ १११ ।।
यानंतर भरतभूपाने ज्यांची कणसे पिकली आहेत व त्यामुळे जे नम्र झाले आहे असे कलम नांवाच्या साळींचे शेत पाहिले जणु ते उद्धतपणा हा उत्तम फल देणारा नसतो असे लोकाना सांगत आहे की काय असे वाटत होते ॥ ११२ ॥
शेतात उत्पन्न झालेल्या कमलांचा वास घेण्यासाठी जणु नम्र झाले आहेत अशा कलम जातीच्या साळीच्या रोपाना पाहून भरतराजाला फार आनंद वाटला ॥ ११३ ॥
लोंब्यानी लकडून गेल्यामुळे शेतातील जमिनीला जिने आपणास जन्म दिला आहे तिला जणु आदराने नमस्कार करीत आहेत अशा भाताच्या शेताना भरतराजाने पाहिले॥११४॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org