Book Title: Mahapurana Part 2
Author(s): Jinsenacharya, Jindas Shastri
Publisher: Shantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
View full book text
________________
२६-१३०)
महापुराण
निगमान्परितोऽपश्यद्ग्राममुख्यान्महाबलान् । वयस्तिरोजनैः सेव्यान्महारामतरूनपि ॥ १२३ ग्रामान्कुक्कुटसंपात्यान्सोत्यगादृतिभिर्वृतान । कोशातकोलतापुष्पस्थगिताभिरितोऽमुतः ॥ १२४ कुटीपरिसरेण्वस्य धृतिरासीत्प्रपश्यतः । फलपुष्पानता वल्लीः प्रसवाढचाः सतीरपि ॥ १२५ योषितो निष्कमालाभिर्वलयश्च विभूषिताः । पश्यतोऽस्य मनो जहुमीणाः संश्रितावृतीः॥१२६ हैयङ्गवीनकलशर्वनामपि निहित्रकैः । ग्रामेषु फलभेदैश्च तमद्राक्षुर्महत्तराः ॥ १२७ ततो विदूरमुल्लङघ्य सोऽध्वानं पृतनावृतः । गङ्गामुपासदद्वीरः प्रयाणैः कतिधैरपि ॥ १२८ हिमवद्विधृतां पूज्यां सतीमासिन्धुगामिनीम् । शुचिप्रवाहामाकल्पवृत्ति कीतिमिवात्मनः ॥ १२९ शफरीप्रेक्षणामुद्यत्तरङ्गभ्रूविनर्तनाम् । वनराजीबृहच्छारीपरिषानां वधूमिव ॥ १३०
या वाड्यांच्या सभोवती गावातील महाबलवान् आणि मुख्य अशा लोकाना राजाने पाहिले व पक्षी, पशु आणि माणसे ज्यांचा उपभोग घेत आहेत अशी बगीच्यातील मोठ्या वृक्षानाही पाहिले ॥ १२३ ॥
काही गावे कोंबडा उडून पलिकडे जाईल इतकी लहान होती व त्याच्या सभोवती पुष्पानी युक्त अशा पडवळांच्या वेलीनी आच्छादित अशी कुंपणे होती. अशा गावाना ओलांडून भरतचक्रीने पुढे प्रयाण केले ।। १२४ ।। .
प्रत्येक झोपडीच्या सभोवती फलानी व फुलानी लकडलेल्या वेली होत्या व झोपडीत पुत्रवतीसती स्त्रिया राहत होत्या या सर्वांना पाहून भरतराजाला आनंद वाटला ॥ १२५ ।।
ज्यांच्या गळ्यात सोन्याच्या माळा आहेत व हातात कांकणे आहेत व कुंपणाजवळ ज्या उभ्या राहिल्या आहेत अशा स्त्रियानी पाहणान्या राजाचे मन हरण केले ॥ १२६ ।।
प्रत्येक गावात जे मुख्य पाटील वगैरे अधिकारी होते त्यानी लोण्याच्या अनेक घागरी व दह्याची भांडी व नाना प्रकारची फळे यांचे नजराणे भरतराजाला अर्पण केले व त्याचे दर्शन त्यानी घेतले ।। १२७ ॥
यानंतर आपल्या सैन्यासह त्या वीर भरतराजाने काही दिवस प्रयाण करून लांब असलेल्या त्या मार्गाला उल्लंघिले व तो गंगानदीच्या जवळ येऊन पोहोचला ॥ १२८ ॥
भरतचक्रवर्तीला गंगानदी ही स्वतःच्या कीर्तिप्रमाणे वाटली. भरतेश्वराची कीर्ति हिमवान् पर्वताने धारण केली होती व ती लवण समुद्रापर्यंत पोहोचली होती. ती त्याची कीर्ति सतीप्रमाणे पूज्य होती व निर्मल आणि कल्पान्त कालापर्यन्त टिकणारी होती. ही गंगानदी ही हिमवान् पर्वताने धारण केलेली व सतीप्रमाणे पूज्य व लवणसमुद्रापर्यन्त गेलेली आहे. हिचा प्रवाह शुचि-निर्मल आहे व कल्पान्तकालापर्यन्त टिकणारा आहे ।। १२९ ॥
जिचे नेत्र माशाप्रमाणे आहेत व उसळलेल्या तरङ्गाप्रमाणे जी आपल्या भुवया नाचविते, वनपंक्तिप्रमाणे हिरवी साडी जी नेसली आहे अशा स्त्रीप्रमाणे ही गंगानदी आहे. कारण हीही मत्स्यरूपी डोळ्यानी युक्त आहे. उसळणारे जे तरंग हेच भुवयांचे नर्तन ते या नदीने
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org