Book Title: Mahapurana Part 2
Author(s): Jinsenacharya, Jindas Shastri
Publisher: Shantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
View full book text
________________
२६-१४२)
महापुराण
राजहंसः कृतोपास्यामलडध्यां विवृतायतिम । जयलक्ष्मीमिव स्फीतामात्मीयामब्धिगायनीम् ॥ विलसत्पनसम्भूतां जनतानन्ददायिनीम् । जगद्धोग्यामिवात्मीयां श्रियमायतिशालिनीम् ॥ १३९ विजयार्द्धतटाक्रान्तिकृतश्लाघ्यां सुरंहसम् । अभग्नप्रसरां दिव्यां निजामिव पताकिनीम् ॥ १४० व्यालोलोमिकरास्पष्टः स्वतीरवनपाद पैः । दद्धिरडकुरोद्धेदमाश्रितां कामुकरिव ॥ १४१ रोधोलतालयासीनान्स्वेच्छया सुरदम्पतीन् हसन्तीमिव सुस्वानः सीकरोत्थैविसारिभिः ॥ १४२
जिनश्रुति ही गुरुपरंपरेने चालत आलेली आहे, संसारसमुद्रातून तरून जाण्याची इच्छा करणारे भक्त हिची उपासना करतात व अतिशय निर्मल निर्दोष पूर्वापर दोषरहित आहे आणि गंभीर व खोल शब्दार्थाची उत्पत्ति हिच्यापासून झाली आहे ॥ १३७ ।।
ही गंगानदी नेहमी राजहंसपक्ष्यानी सेविली जाते, व अलंध्य आहे व फार दीर्घविस्ताराची आहे व समुद्राला जाऊन मिळाली असल्यामुळे भरतेश्वराच्या जयलक्ष्मीप्रमाणे आहे. कारण तीही राजहंसानी-श्रेष्ठ राजानी उपासिली जाते, तिचे कोणी उल्लंघन करू शकत नाहीत, तिचा शेवट हितकर आहे, ती विस्तृत व लवणसमुद्रापर्यन्त पोहोचलेली आहे ।।१३८॥
ही गंगानदी पद्मसरोवरातून उगम पावली आहे. जनतेला आनंद देणारी आहे व जगभोग्य आहे म्हणून भरतराजाच्या जयलक्ष्मीप्रमाणे आहे. कारण ती जयलक्ष्मी श्रेष्ठराजसमूहाकडून उपासिली जात आहे. शोभणान्या पद्मनिधीपासून तिची उत्पत्ति झाली आहे व या जयलक्ष्मीचा भावीकाल फार उत्कर्षाचा आहे. याचप्रमाणे ही गंगानदी जयलक्ष्मीप्रमाणे विस्तृत आहे. ही गंगानदी भरताच्या राजलक्ष्मीप्रमाणे आहे. भरतलक्ष्मी पद्मसंभूता पद्मनिधीपासून उत्पन्न झाली व ही नदी पद्मसरोवरापासून निघाली आहे. राज्यलक्ष्मी जयभोग्य व भावी उत्कर्षाने शोभत होती व ही नदोही जगभोग्य व लांबीने दीर्घपणाने शोभत आहे ॥ १३९ ॥
अथवा ही गंगानदी भरतराजाच्या सेनेप्रमाणे आहे. कारण भरतनृपतीच्या सेनेने विजयार्द्धपर्वताच्या तटाला आक्रमन प्रशंसा मिळविली आहे. तशी या नदीने देखिल विजयार्द्ध पर्वताच्या तटाला आक्रमून प्रशंसा मिळविली आहे. दोघीही वेगवान् होत्या व त्यांचा प्रसार कोणाकडून अडविला जात नसे. सेना व गंगानदी दोघीही दिव्य आहेत ।। १४० ।।
अतिशय चंचल अशा तरंगरूप हातानी जेव्हा गंगानदीने आपल्या किना-यावर असलेल्या वनवृक्षाना स्पर्श केला तेव्हा त्या वृक्षातून अंकुर उत्पन्न झाले. तेव्हा जणु कामुक अशा वृक्षानी तिचा आश्रय घेतला आहे अशी ती भरतराजाला वाटली ।। १४१ ।।
तटावर असलेल्या लतागृहात स्वच्छंदाने बसलेल्या देवदेवाङ्गनाना जलकणापासून उत्पन्न झालेले व चोहोंकडे पसरणारे अशा मधुर शब्दानी जणु ती हसत आहे त्याची थट्टा करीत आहे असे वाटत होते ।। १४२ ॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org