Book Title: Mahapurana Part 2
Author(s): Jinsenacharya, Jindas Shastri
Publisher: Shantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
View full book text
________________
२६-७९)
महापुराण
कामगैर्वायुरहोभिःकुमुदोज्ज्वलकान्तिभिः । यशोवितानसङ्काशैः स रथोऽयोजि वाजिभिः ॥ ७१ स तं स्यन्दनमारुक्षाक्तसारथ्यधिष्ठितम् । नितम्बदेशमद्रीशः सुरराडिव चक्रराट् ॥ ७२ ततःप्रास्थानिकैःपुण्यनिर्घोषैरभिनन्दितः । प्रतस्थे दिग्जयोद्युक्तः कृतप्रस्थानमङ्गलः ॥ ७३ तदा नभोऽङ्गणं कृत्स्नं जयघोषैररुध्यत । नपाङ्गणं च संरुद्धमभवत्सैन्यनायकैः ।। ७४ महामुकुटबद्धास्तं परिवःसमन्ततः । दूरात्प्रणतमूर्धानः सुरराजमिवामराः ॥ ७५ प्रचचाल बलं विष्वगारुद्धपुरवीथिकम । महायोधमयी वृष्टिरपूर्वेवाभक्त्तदा ॥ ७६ पुरः पादातमाश्वीयं रथकटया च हास्तिकम् । क्रमानिरीयुरावेष्टय सपताकं रथं प्रभोः॥७७ रथ्या रथाश्वसङ्घट्टादुत्थितेहेमरेणुभिः । बलक्षोदाक्षमा व्योम समुत्पेतुरिव स्वयम् ॥ ७८ रौक्मैरजोभिराकीणं तदा रेजे नभोऽजिरम् । स्पष्टं बालातपेनेव पटवासेन चाततम् ॥ ७९
.......................
त्या रथाला जे घोडे जोडले होते ते स्वेच्छेने जाणारे, वायुप्रमाणे वेगशाली, शुभ्र कमलाप्रमाणे उज्ज्वल कान्तीचे व भरतराजाचे यशाचे जणु छत असे होते ॥ ७१ ।।
जसा इन्द्र मेरुपर्वताच्या कड्यावर चढतो त्याप्रमाणे तो चक्रवर्ती, सारथी ज्यावर पुढे बसला आहे अशा त्या रथावर आरोहण करून बसला ।। ७२ ।।
यानन्तर प्रस्थान करावयाच्या वेळी पुण्यघोषणांनी म्हणजे तुझा जय होवो इत्यादि मंगल शब्दानी ज्याने अभिनन्दन केले आहे व गमनकाली आरती ओवाळून मंगल ज्याचे केले आहे अशा त्या भरतराजाने दिग्जयासाठी उद्युक्त होऊन प्रयाण केले ॥ ७३ ।।
त्यावेळी सर्व आकाशरूपी अंगण जयघोषांनी भरून गेले व सैन्याच्या मोठ्या अधिकारी लोकांनी राजवाड्याचे अंगण भरून गेले ।। ७४ ॥
जसे देव इन्द्राला दूरून मस्तक नम्र करून व त्याला चोहोकडून घेरून उभे राहतात तसे मोठ्या मुकुटाना धारण करणारे व दूरून नमस्कार करण्याकरिता मस्तक नम्र करणारे राजे भरतराजाच्या सभोवती उभे राहिले ।। ७५ ॥
___ नगरातील सर्व रस्ते ज्याने व्यापले आहेत असे ते सैन्य ज्यावेळी दिग्विजयास निघाले तेव्हां बघणाऱ्यांना असे वाटू लागले की, ही महावीरयोद्धयांची आकाशातून अपूर्व वृष्टि झाली की काय ? ॥ ७६ ॥
सर्वांच्या पुढे पायदळ, त्यानंतर घोडेस्वार, त्यामागे रथसमूह अशा क्रमाने भरतराजाच्या ध्वजसहित रथाला वेढून ते सैन्य प्रयाण करू लागले ।। ७७ ।।
___ रथ व घोड्याच्या वेगाने जाण्याने व त्यांच्या संघर्षणाने आकाशात जी सुवर्णधूळ उडाली त्यामुळे असे वाटले की, हे रस्ते सैन्याचे संघर्षण सहन न झाल्यामुळे आकाशात उडून चालले आहेत ॥ ७८॥
त्यावेळी आकाशाङ्गण सुवर्णाच्या धुळीनी भरून गेल्यामुळे सकाळच्या कोमल उन्हाने जणु ते व्याप्त झाले आहे. अथवा सुगंधी चूर्णानी ते व्यापले आहे असे शोभ लागले ॥ ७९ ॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org