Book Title: Mahapurana Part 2
Author(s): Jinsenacharya, Jindas Shastri
Publisher: Shantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
View full book text
________________
२६-६१)
(७७
आदधुर्धनवृन्दानि मुक्तासाराणि भूधराः । सदशानीव वासांसि निष्प्रवाणीनि सानुभिः ।। ५४ पवनाधोरणारूढा मुर्जीमूत दन्तिनः । सान्तर्गर्जा निकुञ्जेषु सासारमदसीकराः ।। ५५ शुकावली प्रवालाभचञ्चस्तेने दिवि श्रियम् । हरिन्मणिपिनद्धेव तोरणाली समप्रभा ॥ ५६ चेतांसि तरणाङ्गोपजीविनामुद्धतात्मनाम् । पुंसां च्युताधिकाराणामिव दैन्यमुपागमन् ॥ ५७ प्रतापी भुवनस्यैकं चक्षुनित्य महोदयः । भास्वानाक्रान्ततेजस्वी बभासे भरतेशवत् ॥ ५८ इति प्रस्पष्टचन्द्रांशु प्रहासे शरदागमे । चक्रे दिग्विजयोद्योगं चक्री चकपुरःसरम् ।। ५९ प्रस्थानभेर्यो गम्भीरप्रध्वानाः प्रहतास्तदा । श्रुता बर्हिभिरुद्ग्रीवर्धनाडम्बरशङ्किभिः ।। ६० धृतमङ्गलनेपथ्यो बभारोरःस्थलं प्रभुः । शरल्लक्ष्म्येव सम्भक्तं सहारहरिचन्दनम् ॥ ६१
महापुराण
ज्यातील पाणी नाहीसे झाले आहे अशा मेघांना पर्वतानी आपल्या शिखरांच्या द्वारे उत्तम दशायुक्त नवीन वस्त्राप्रमाणे धारण केले ॥ ५४ ॥
वारारूपी महात ज्यांच्यावर आरूढ ज्ञाला आहे व जे आतल्या आत गर्जना करीत आहेत व जलबिंदुरूपी मदजलाचे बिंदूंची वृष्टि करणारे असे मेघरूपी हत्ती लतागृहात भ्रमण करू लागले ।। ५५ ॥
प्रवाळ - पोवळयासारख्या लाल चोचींच्या राघूंच्या पंक्तीने पाचेच्या कोंदणात बसविलेल्या पद्मरागमण्याच्या तोरणासारखी शोभा आकाशात उत्पन्न केली ।। ५६ ।।
पाण्यातून तरून जाण्याला उपयोगी पडणाऱ्या नावावर उपजीविका करणारे कठोर अन्तःकरणाच्या नावाडी लोकांची अन्तःकरणे जे अधिकार च्युत झाले आहेत अशा कामगार लोकाप्रमाणे दीन झाली ॥ ५७ ॥
प्रखर उन्हाने संताप देणारा, सर्व जगाला जणु मुख्य नेत्र डोळा असलेला, नेहमी ज्याचा महान् उदय असतो असा व सर्व तेजस्वी पदार्थावर आक्रमण करणारा असा सूर्य महापराक्रमी, सर्व प्रजांना सन्मार्ग दाखविणारा असल्यामुळे जणु त्यांना डोळ्याप्रमाणे असलेला व प्रतिदिवशी ज्यांचे तेज वाढत आहे असा व तेजस्वी लोकावर आक्रमण करणाऱ्या भरतचक्रवर्तीप्रमाणे शोभला ।। ५८ ।।
अतिशय निर्मल चन्द्राच्या किरणांनी जणु जो खूप हासत आहे अशा शरद् ऋतूचे आगमन झाले असता, भरतचक्रवर्तीने आपल्या चक्ररत्नाला पुढे करून दिग्विजयोद्योगाला सुरुवात केली ।। ५९॥
दिग्विजयाला प्रस्थान करण्यासाठी ज्यांची गंभीर गर्जना आहे असे नगारे वाजविले गेले. ही मेघांची गर्जना होत असावी अशी शंका ज्याना वाटत होती अशा मोरांनी आपली मान उंच करून ती ऐकली ॥ ६० ॥
मंगलकारक अलंकार व वस्त्रे ज्याने धारण केली आहेत अशा त्या प्रभु भरताचे वक्षःस्थल पुष्पांचे हार व चन्दनाच्या उटीने युक्त असल्यामुळे तें शरत्कालाच्या शोभेने युक्त असल्याप्रमाणे शोभत होते ।। ६१ ।।
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org