Book Title: Mahapurana Part 2
Author(s): Jinsenacharya, Jindas Shastri
Publisher: Shantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
View full book text
________________
२६-३०)
हंसस्वरानका काशकणिशोज्ज्वलचामरा । पुण्डरीकातपत्रासीद्दिग्जयेच्छेव सा शरत् ॥ २३ विशां प्रसाधनायाधाद्बाणासनपरिच्छदम् । शरत्कालो जिगीषोहि श्लाघ्यो बाणासनग्रहः ॥ २४ घनावली कृशा पाण्डुरासीदाशा विमुञ्चती । घनागमवियोगोत्थचिन्तयेवाकुलीकृता ॥ २५ नभः सतारमारेजे विहसत्कुमुदाकरम् । कुमुद्वतीवनं चाभाज्जयत्तारकितं नभः ॥ २६ तारकाकुमुदाकीर्णे नभःसरसि निर्मले । हंसायतेस्म शीतांशुविक्षिप्तकरपक्षतिः ॥ २७ नभोगृहाङ्गणे तेनुः श्रियं पुष्पोपहारजाम् । तारका दिग्वधूहारतारमुक्ताफलत्विषः ॥ २८ बभुर्नभोम्बुधौ ताराः स्फुरन्मुक्ताफलामलाः । करका इव मेघौघैनिहिता हिमशीतलाः ॥ २९ ज्योत्स्नासलिलसम्भूता इव बुबुदपङक्तयः । तारका रुचिमातेनुविप्रकीर्णा नभोऽङ्गणे ॥ ३०
महापुराण
हंसांचे शब्द हेच ज्याचे नगारे आहेत, काश नावाच्या गवताचे जे उज्ज्वल - शुभ्र तुरे हेच ज्याचे चामर आहेत, शुभ्र कमले ज्याचे छत्र आहे असा शरद् ऋतु जणु दिग्विजय करण्याची इच्छा करीत आहे असा भासला ।। २३ ।।
(७३
शरत्कालाने दिशांना भूषविण्याकरिता बाण नावाची फुले व असन नावाच्या फुलांचा समूह धारण केला होता. बरोबरच आहे की जो जयेच्छु असतो त्याने शत्रूला वश करण्यासाठी बाणासन-बाण ज्याने दूर फेकले जातात अशा वस्तूंचा अर्थात् धनुष्यांचा स्वीकार करणे योग्यच आहे ॥ २४ ॥
त्यावेळी सर्व दिशांचा त्याग करणारी पक्षी संगमाशेचा त्याग करणारी अशी मेघपंक्ति रोड व पांढरी झाली. धनागम- पावसाळयाच्या वियोगाने उत्पन्न झालेल्या चितेने जणु ती व्याकुळ झाली होती ॥ २५ ॥
तारकांनी सहित असे आकाश रात्री विकसित होणाऱ्या कमलसमूहाला जणु हसत आहे असे शोभत होते व कमलवनाने युक्त असे सरोवर तारकांनी युक्त असलेल्या आकाशाला जणु जिंकित आहे असे शोभत होते ॥ २६ ॥
निर्मल आकाशरूपी सरोवर तारकारूपी पांढऱ्या कमलांनी व्याप्त झाले होते व त्यात ज्याने आपले पंख पसरले आहेत अशा हंसाप्रमाणे चन्द्र शोभत होता ॥ २७ ॥
दिशारूपी स्त्रियांच्या हारातील जणु तेजस्वी मोत्यांची कान्ति धारण करणाऱ्या तारकांनी आकाशरूपी घराच्या अंगणात जणु पसरलेल्या पुष्पसमूहाच्या शोभेला वाढविले ||२८|| आकाशरूपी समुद्रात चमकणान्या मोत्याप्रमाणे स्वच्छ शुभ्र असा तारांचा समूह मेघांच्या समूहाने इकडे तिकडे टाकलेल्या बर्फाप्रमाणे थंडगार अशा जणु गारा आहेत असा भासू लागला ॥ २९ ॥
Jain Education International
आकाशरूपी अंगणात चोहोकडे पसरलेला तारकांचा समूह चन्द्रकिरणरूपी पाण्याचे जणु बुडबुडे आहेत असा शोभू लागला ।। ३० ।।
म. १०
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org