Book Title: Mahapurana Part 2
Author(s): Jinsenacharya, Jindas Shastri
Publisher: Shantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
View full book text
________________
७२)
महापुराण
(२६-१९.
कलहंसा हसन्तीव विरुतः स्म शिखण्डिनः । अहोजलप्रिया यूयमिति निर्मलमूर्तयः ।। १९ चित्रवर्णा धनाबद्धरुचयो गिरिसंश्रयाः । समं शतमखेष्वासर्बहिणः स्वोन्नति जहुः ॥ २० बन्धकैरिन्द्रगोपश्रीन तेने बनराजिषु । शरल्लक्षम्येव निष्ठ्यूतस्ताम्बूलरसबिन्दुभिः ॥ २१ विकासं बन्धुजीवेषु शरदाविर्भवन्त्यधात् । सतीच सुप्रसन्नात्मा विपङ्का विशदाम्बरा ॥ २२
आहे. हंसाला शरदऋतूची स्वच्छता आवडली हा त्याचा शुद्धिगुण स्वभाव आहे. पण मोराला पावसाळयाची अस्वच्छता आवडत होती म्हणून तो या शरत्काली हर्षित झाला नाही. मोराचा अशुद्धता हा स्वभाव आहे म्हणून त्याला शरत्कालची स्वच्छता आवडली नाही ॥ १८ ॥
निर्मल शुभ्र शरीरधारी हंस आपल्या शब्दानी जणु मोराना हसू लागले. हे मोरानो, तुम्ही जलप्रिय आहात. तुम्हाला पाणी आवडते असे म्हणून ते हंस मोराना हसू लागले. येथे ड व ल चा अभेद मानून तुम्ही जडप्रिय आहात असाही शब्द मानता येतो व त्याचा अर्थ मूर्ख
आवडतात असा होतो. वर्षाऋतु लोकांना दुःखद असल्यामुळे तो तुम्हाला प्रिय आहे असा जडप्रिय शब्दाचा अर्थ झाला. असा अर्थ घेऊन हंसानी मोराची थट्टा केली आहे ॥ १९ ॥
__ ज्यांचे पिसारे अनेक रंगाचे आहेत, वर्षाऋतुमुळे ज्यांच्या देहावर घन-पुष्कळ आबद्ध रुचि-कान्ति उत्पन्न झाली आहे. रुचि शब्दाचा अर्थ कान्ति असा येथे आहे. गिरिसंश्रयाः पर्वताचा आश्रय घेणारे- पर्वतावर राहणारे असे जे मोर त्यांनी आपल्याप्रमाणे सादृश्य ज्यात आहे अशा इंद्रधनुष्याप्रमाणे आपल्या उन्नतीचा त्याग केला. इन्द्रधनुष्ये देखिल चित्रवर्ण अनेक रंगानी युक्त असतात, घनाबद्धरुचयः मेघामध्ये त्यांची कान्ति खुलून दिसते व ते गिरिसंश्रयाः पर्वतावरील मेघांचा आश्रय घेतात. परन्तु शरदऋतूमध्ये ते मेघ नसल्यामुळे इन्द्रधनुष्येही नसतात. म्हणून इन्द्रधनुष्याप्रमाणे मोरांनीही आपल्या उन्नतीचा त्याग केला. अर्थात् मोराचा तजेला शरद्ऋतूमध्ये कमी झाला ॥ २० ॥
शरल्लक्ष्मीने थुकलेल्या तांबूलाचे बिन्दूच की काय अशा लाल रंगाच्या बन्धक पुष्पांनीजास्वंदीच्या फुलांनी अरण्यात इंद्रगोप नामक लाल रंगाच्या किड्यांची शोभा उत्पन्न केली नाही काय? सारांश इंद्रगोप किडे ज्यांना गेचवे म्हणतात ते लाल रंगाचे असतात. ते पावसाळ्यात जंगलात पुष्कळ उत्पन्न होतात. त्या गेचव्यांच्या पुंजक्याप्रमाणे लाल असलेल्या जास्वंदीच्या फुलांनी या शरदऋतूत वनात शोभा उत्पन्न केली नाही काय? अर्थात् या पुष्पांनी शरदऋतूत वनात फार शोभा उत्पन्न केली ।। २१ ॥
विशदाम्बरा- निर्मल वस्त्रे नेसलेली, विपङ्का-पापरहित-पुण्यवती व सुप्रसन्नात्माप्रसन्न अन्तःकरणाची सती स्त्री जशी बन्धुजीवेषु-आप्तलोकात विकास आनन्द हर्ष उत्पन्न करते तशी शरदऋतूची शोभा उत्पन्न झाली व ती शोभा पतिव्रता स्त्रीप्रमाणे सुप्रसन्नता उत्पन्न करणारी झाली. ती शरच्छोभा विपङ्का-चिखलरहित होती, विशदाम्बरा-निर्मल आकाशाने युक्त होती व तिने बन्धुजीवेषु विकासं अधात्-जास्वंदीच्या फुलामध्ये प्रफुल्लपणा उत्पन्न केला ॥ २२ ॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org