Book Title: Mahapurana Part 2
Author(s): Jinsenacharya, Jindas Shastri
Publisher: Shantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
View full book text
________________
• २६-१८)
महापुराण
सरः सरोजरजसा परितः स्थगितोदकम् । कादम्बजायाः सम्प्रेक्ष्य मुमुहुः स्थलशङकया ॥ १० कञ्जकिंजल्कपुञ्जन पिञ्जरा षट्पदावली । सौवर्णमणिटुब्धेव शरद: कण्ठिका बभौ ॥ ११ सरोजलं समासेदुर्मुखराः सितपक्षिणः । वदान्यकुलमुद्भूतसौगन्ध्यमिव बन्दिनः ॥ १२ . नदीनां पुलिनाग्यासन शुचीनि शरदागमे । हंसाना रचितानीव शयनानि सितांशकैः ॥ १३ सरांसि ससरोजानि सोत्पला वप्रभूमयः । सहससैकता नद्यौ जहश्चेतांसि कामिनाम् ॥ १४ प्रसन्नसलिला रेजुः सरस्यः सहसारसाः । कूजितः कलहंसानां जितनपुरसिञ्जनः ॥ १५ नीलोत्पलेक्षणा रेजे शरच्छीः पङ्कजानना । व्यक्तमाभाषमाणेव कलहंसीकलस्वनैः ॥ १६ पक्वशालिभुवो नम्रकणिशाः पिञ्जरश्रियः । स्नाता हरिद्रयेवासन् शरत्कालप्रियागमे ॥ १७ मन्दसाना मदं भेजुः सहसाना मदं जहुः । शरल्लक्ष्मी समालोक्य शुद्धयशुद्धयोरयं निजः॥ १८
कमलाच्या परागांनी सर्व बाजूनी ज्याचे पाणी निश्चल झाले आहे असे सरोवर पाहून हंसीणींना ही जमीन आहे असा भ्रम उत्पन्न झाला ॥ १० ।।
कमलांच्या परागसमूहांनी पिवळसर झालेली भुंग्यांची पंक्ति सोन्याच्या मण्यांनी गुंफलेली शरदऋतूची जणु कंठी आहे अशी शोभली ॥ ११ ॥
जसे भाट लोक ज्यांची कीर्ति चोहोकडे पसरली आहे अशा दानशूर मनुष्याच्या घराकडे त्याची कीर्ति गात येतात तसे आनंदाने शब्द करणारे हंसपक्षी ज्यातील कमलांचा सुगंध पसरला आहे अशा सरोवराकडे आले ॥ १२ ॥
शरदऋतु आला त्यावेळी नद्यांची वाळवंटे शुभ्र दिसू लागली जणु ती पांढऱ्या वस्त्रांनी बनविलेले हंस पक्षाचे बिछाने आहेत असे वाटत होते ॥ १३ ॥
कमलांनी गजबजलेली सरोवरे, स्थलकमलांनी (जमिनीवर उत्पन्न होणा-या कमलांनी) युक्त अशा शेतातील जमिनी व हंसांनीसहित असे वाळूचे प्रदेश-वाळवंटे ही कामी लोकांच्या अन्तःकरणास हरण करू लागली ।। १४ ।।
ज्यांचे पाणी निर्मल झाले आहे अशी व सारसपक्षांनी सहित असलेली सरोवरे पैंजणाच्या आवाजाना जिकणाऱ्या सारस पक्षांच्या शब्दानी शोभू लागली ॥ १५ ॥
निळी कमळे हेच जिचे डोळे आहेत, शुभ्र कमळे हेच जिचे मुख आहे अशी शादरलक्ष्मी हंसिणीचे जे मधुर शब्द त्यांनी जणु स्पष्ट भाषण करीत आहे असे वाटते ॥ १६ ॥
साळी धान्याचे लोंबे ज्यांच्यावर नम्र झाले आहेत, पिंगट शोभा ज्या धारण करीत आहेत अशा पिकलेल्या साळीच्या जमिनी शरत्कालरूपी प्रिय पति आल्यावेळी हळदीने जणु त्यानी स्नान केले आहे अशा शोभू लागल्या ॥ १७ ॥
___ मंदसान-हंसपक्षी शरदऋतूची शोभा लक्ष्मी पाहून सगर्व झाले- हर्षयुक्त झाले. पण सहसान-मोर हे त्यावेळी गर्व रहित झाले, खिन्न झाले. तेव्हां हा त्याच्या शुद्धि-अशुद्धीचा स्वभाव
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org