Book Title: Mahapurana Part 2
Author(s): Jinsenacharya, Jindas Shastri
Publisher: Shantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
View full book text
________________
२५-२९०)
महापुराण
Jain Education International
तं देवं त्रिदशाधिपचितपदं घातिक्षयानन्तर- । प्रोत्थानन्तचतुष्टयं जिनमिनं भव्याब्जिनीनामिनम् ॥ मानस्तम्भ विलोकनानतजगन्मान्यं त्रिलोकी पतिम् । प्राप्ताचिक्यबहिविभूतिमनघं भक्त्या प्रवन्दामहे ॥ २९०
इत्यार्षे भगवज्जिनसेनाचार्यप्रणीते त्रिषष्टिलक्षण महापुराण सप्रहे भगवद्विहारवर्णनं नाम पञ्चविंशतितमं पर्व ॥ २५ ॥
देवांच्या अधिपांनी म्हणजे इन्द्रानी ज्यांचे चरण पूजिले आहेत, घातिकर्माचा क्षय झाल्यानन्तर ज्यांना अनन्तचतुष्टयाची प्राप्ति झाली आहे, जे भव्य जीवरूपी कमलिनींना प्रफुल्ल करण्यास सूर्य आहेत, मानस्तम्भाचे दर्शन झाल्यानंतर नम्र झालेल्या जगताने ज्यांना मान दिला आहे, जे त्रिलोकपति आहेत, ज्यांना अचिन्त्य असे बाह्य वैभव प्राप्त झाले आहे, जे पापरहित आहेत अशा प्रभु आदिजिनाला आम्ही भक्तीने वन्दन करतो ।। २९० ।।
याप्रमाणे भगवज्जिनसेनाचार्यविरचित आर्ष, त्रिषष्टिलक्षण महापुराणसंग्रहात भगवंताच्या विहाराचे वर्णन करणारे पंचविसावे पर्व समाप्त झाले.
( ६९
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org