Book Title: Mahapurana Part 2
Author(s): Jinsenacharya, Jindas Shastri
Publisher: Shantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
View full book text
________________
२५-२८४)
महापुराण
(६७
हेमाम्भोजमयी श्रेणीमलिश्रेणीभिरन्विताम् । सुरा व्यरचयन्नेनां सुरराजनिदेशतः ॥ २७६ रेजे राजीवराजी सा जिनपत्पङकजोन्मुखी । आदित्सुरिव तत्कान्तिमतिरेकादधः लुताम् ॥ २७७ ततिविहारपद्मानां जिनस्योपाङघ्रि सा बभौ । नभःसरसि सम्फुल्ला त्रिःपञ्चककृतिप्रमा ॥२७८ तदा हेमाम्बुजैर्योम समन्तादाततं बभौ । सरोवरमिवोत्फुल्लपङकजं जिनदिग्जये ॥ २७९ प्रमोदमयमातन्वन्निति विश्वं जगत्पतिः । विजहार महीं कृत्स्नां प्रीणयन्स्ववचोऽमृतैः ॥ २८० मिथ्यान्धकारघटनां विघटय्य वचोंशुभिः । जगदुद्द्योतयामास जिनार्को जनतातिहत् ॥ २८१ यतो विजहें भगवान्हेमाब्जन्यस्तसङक्रमः । धर्मामृताम्बुसंवस्ततो भव्या धुति दधुः ॥ २८२ जिने घन इवाभ्यर्णे धर्मवर्ष प्रवर्षति । जगत्सुखप्रवाहेण पुप्लुवे धृतनिर्वृति ॥ २८३ धर्मवारि जिनाम्मोदात् पायं पायं कृतस्पृहाः । चिरं धृततृषो दध्रुस्तदानीं भव्यचातकाः ॥ २८४
ही सुवर्णकमलांची पंक्ति भुंग्यांनी शोभत होती. इन्द्राच्या आज्ञेने ही कमलपंक्ति सेवकदेवाकडून रचिली जात असे ॥ २७६ ।।
जिनेश्वराच्या चरणकमलांच्या संमुख ही कमलांची पंक्ति शोभू लागली. प्रभूच्या पायांची कान्ति अधिक होऊन जी खाली गळत होती जणु तिला ग्रहण करण्यासाठी ती कमलें तेथे आली आहेत असे वाटत असे ॥ २७७ ॥
आकाशारूपी सरोवरात फुललेली व जिनचरणकमलाच्या संमुख असलेली ही विहारकमलांची पंक्ति २२५ होती व फार शोभत होती ।। २७८ ।।
सर्व बाजूंनी सुवर्णकमलांनी व्याप्त झालेले आकाश जिनेश्वराच्या दिग्विजयाच्या वेळी ज्यातील कमले फुललेली आहेत अशा सरोवराप्रमाणे दिसत होते ॥ २७९ ॥
याप्रमाणे सर्व जगाला आनन्दमय करणारे त्रैलक्यनाथ आदिजिनेन्द्र आपल्या वचनामृतानी सगळ्या पृथ्वीला हर्षयुक्त करून तिच्यावर विहार करू लागले ।। २८० ॥
लोकांचे दुःख हरण करणाऱ्या या जिनसूर्याने आपल्या वचनरूपी किरणांनी मिथ्यान्धकाराच्या समूहाला नष्ट केले व त्याने सर्व जगाला प्रकाशित केले ।। २४१ ॥
सुवर्णकमलावर पावले ठेवणाऱ्या भगवंताने जिकडे जिकडे विहार केला तिकडे तिकडे त्यांनी धर्मरूपी अमृतजलाची वृष्टि केली व त्यामुळे भव्याना मोठा सन्तोष वाटला ।। २८२ ।।
श्रीजिनेश्वर मेघाप्रमाणे जवळ येऊन धर्मवृष्टि करीत असता ज्याला आनन्द वाटत आहे असे जग सुखाच्या प्रवाहात पोहू लागले ।। २८३ ॥
त्यावेळी अतिशय धर्मरूपी जलाची इच्छा करणारे भव्यजीवरूपी चातक आदिभगवन्तरूपी मेघापासून प्राप्त झालेले धर्मरूपी पाणी पुनः पुनः प्याले, तेव्हां त्यांची तहान भागली कारण ते फार दिवसापासून तृषित होते आणि आता कायमचे सन्तुष्ट झाले ॥ २८४ ॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org