Book Title: Mahapurana Part 2
Author(s): Jinsenacharya, Jindas Shastri
Publisher: Shantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
View full book text
________________
महापुराण
(२५-२६८
मही समतला रेजे संमुखीनतलोज्ज्वला । सुरैर्गन्धाम्बुभिः सिक्ता स्नातेव विरजाः सती ॥२६८ अकालकुसुमोद्भदं दर्शयन्ति स्म पादपाः । ऋतुभिः सममागत्य संरुद्धा साध्वसादिव ॥ २६९ सुभिक्षं क्षेममारोग्यं गव्यूतीनां चतुःशती । भेजे भूजिनमाहात्म्यादजातप्राणिहिंसना ॥ २७० अकस्मात्प्राणिनो भेजुः प्रमदस्य परम्पराम् । तेनुः पारस्परी मैत्री बन्धुभूयमिवाश्रिताः ॥ २७१ मकरन्दरजोवर्षि प्रत्यग्नोद्भिन्नकेसरम् । विचित्ररत्ननिर्माणकणिकं विलसद्दलम् ॥ २७२ भगवच्चरणन्यासप्रदेशेऽधिनभस्तलम् । मृदुस्पर्शमुदारश्रि पङकजं हममुद्बभौ ॥ २७३ पृष्टतश्च पुरश्चास्य पनाः सप्त विकासिनः । प्रादुर्बभूवुरुद्गन्धिसान्द्रकिञ्जल्करेणवः ॥ २७४ तथान्यान्यपि पद्मानि तत्पर्यन्तेषु रेजिरे । लक्ष्म्यावसथसौधानि सञ्चारीणीव खाङगणे ॥ २७५
त्यावेळी पृथ्वी देखील दर्पणतलाप्रमाणे उज्ज्वल झाली व देवांनी सुगंधी पाण्याची तिच्यावर वृष्टी केल्यामुळे ती धुराळयाने रहित झाली. त्यामुळे ती स्नान केलेल्या सतीप्रमाणे शोभू लागली ॥ २६८॥
वृक्षांनी देखील अकाली आपल्या ठिकाणी फुलांची उत्पत्ति दाखविली. अर्थात् वृक्षावर योग्य समयावाचून फुलें आली होती. जणु सर्व ऋतूंनी भयाने त्या वृक्षांना आलिंगन दिले ॥ २६९ ॥
जिनेश्वराच्या माहात्म्याने जिच्यात प्राणिहिंसा झाली नाही अशा या भूमीने चारशे गव्यूतीपर्यन्त सुभिक्ष, आरोग्य व कल्याण धारण केले ॥ २७० ।।
__ अकस्मात्-अवेळी सर्व प्राणी अतिशय आनन्दित झाले व परस्परांचे बन्धु झाल्याप्रमाणे एकमेकांचे मित्र झाले ॥ २७१ ॥
ज्याच्यातून मकरन्द व पराग बाहेर पडत आहे अर्थात् सारखा गळत आहे. ज्याच्यांतून ताजे केसर दररोज उत्पन्न होत आहेत, ज्याची कणिका अनेक रंगाच्या रत्नांनी निर्माण पावली आहे व जे पाकळयानी शोभत आहे ॥ २७२ ॥
ज्याचा कोमल स्पर्श आहे, जे अतिशय सुंदर आहे असे सुवर्णकमल आकाशात प्रभू जेथे पाऊल टाकतात तेथे अर्थात् प्रभुचरणाखाली उत्पन्न होत असे ।। २७३ ॥
ज्यातून दाट केसर व पराग उत्पन्न होत आहेत, अशी प्रफुल्ल सात कमले प्रभूच्या पाठीमागे व पुढे उत्पन्न होत असत व ती सगळी ज्यातून सुगंध बाहेर पसरत आहे अशी होती ॥ २७४ ।।
___ तसेच अन्य कमलें देखील प्रभूच्या मागे पुढे चारी दिशात शोभत होती. ती सगळी कमलें लक्ष्मीच्या राहण्याचे जणु सौध-प्रासाद आहेत व आकाशाङगणात जणु संचार करणारी आहेत ॥ २७५ ॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org