Book Title: Mahapurana Part 2
Author(s): Jinsenacharya, Jindas Shastri
Publisher: Shantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
View full book text
________________
६४)
महापुराण
(२५-२५१
स्वसन्निधानसम्फुल्लफलिताङकुरितद्रुमः । आदर्शमण्डलाकारपरिवर्तितभूतलः ॥ २५१ सुगन्धिशिशिरोऽनुच्चरनुयायो समीरणः । अकस्माज्जनतानन्दसम्पादिपरमोदयः ॥ २५२ मरूत्कुमारसम्मृष्टयोजनान्तररम्यभूः । स्तनितासरसंसिक्तगन्धाम्बुर्विरजोऽवनिः ॥ २५३ मृदुस्पर्शसुखाम्भोजविन्यस्तपदपडाकजः । शालिव्रीह्यादिसम्पन्नवसुधासूचितागमः ॥ २५४ शरत्सरोवरस्पद्धिव्योमोदाहृतसन्निधिः । ककुवन्तरवैमल्यसन्दर्शितसमागमः ॥ २५५ धुसत्परम्पराह्वानध्वानरुद्धहरिन्मुखः । सहस्रारस्फुरद्धर्मचक्ररत्नपुरःसरः ॥ २५६ पुरस्कृताष्टमाङगल्यध्वजमालातताम्बरः । सुरासुरानुयातोऽभाद्विजिहीर्षुस्तदा विभुः ॥ २५७ तदा मधुरगम्भीरो जजम्भे दुन्दुभिध्वनिः । नभः समन्तादापूर्य क्षुभ्यदब्धिस्वनोपमः ॥ २५८
प्रभु जेव्हां ज्या देशाजवळ विहार करीत असत तेव्हा त्या प्रदेशात सर्व वृक्ष पुष्पांनी फलांनी व अंकुरांनी युक्त होत होते. आणि तेथील सर्व भूप्रदेश दर्पणाप्रमाणे निर्मल होत असे. ॥ २५१ ॥
__ वारा हा प्रभूला अनुसरून मंदपणे वाहू लागला. त्यामुळे तो सुगंधी व थंड असा होऊन जनतेला अकस्मात् आनन्द देणारा झाला ।। २५२ ॥
जिकडे प्रभूचा विहार होत असे तिकडे एक-योजनपर्यन्तचा भूप्रदेश वायुकुमार देवाकडून झाडून स्वच्छ केला जात असे व स्तनितकुमार देवानी त्या भूप्रदेशावर सुगन्धित जल शिंपडून तो प्रदेश धुराळयाने रहित केला जात असे ॥ २५३ ॥
प्रभु ज्यापासून मृदु स्पर्श सुख मिळते अशा कमलावर आपले चरण कमल ठेवून विहार करीत होते व पृथ्वीवर बारीक साळी व मोठ्या साळी आदिक धान्यांचे अमाप पीक येऊन येथे श्रीजिनप्रभूचे आगमन होईल असे सूचित होत असे ।। २५४ ।।
शरत्काली सरोवर अतिशय निर्मळ असते. जणु त्याच्याशी आकाशाने स्पर्धा केली व प्रभूचे आगमन जवळ आले आहे असे व्यक्त केले. पूर्वादिक दिशात जी अतिशय निर्मलता उत्पन्न झाली तिनेही प्रभूचा समागम झाल्याचे दाखवून दिले. अर्थात् प्रभूचा विहार जेथे जेथे झाला तेथे तेथे आकाश व पूर्वादिक दिशा अत्यन्त स्वच्छ झाल्या ॥ २५५ ॥
जेथे जेथे प्रभूचा विहार झाला तेथे तेथे देवांच्या समूहाने सर्वाना प्रभूचे आगमन झाले आहे त्यांचा उपदेश ऐकावयास या या असे आमन्त्रण दिले व त्यांच्या आमन्त्रणानी सर्व दिशा शब्दमय झाल्या व ज्याला हजार आरे आहेत असे चमकणारे धर्मचक्ररत्न पुढे चालत होते व भगवान् जिनेन्द्र त्याला अनुसरून विहार करीत होते ।। २५६ ॥
प्रभूच्या पुढे अष्टमंगल दर्पण, चामर वगैरे अष्टमंगलेही चालली होती. ध्वज व मालांनी आकाश व्याप्त झाले होते. त्यावेळी प्रभु धर्मोपदेशासाठी विहार करू लागले आणि त्यांच्यामागून सुर व असुर चार प्रकारचे देव चालू लागले ॥ २५७ ॥
तेव्हां मधुर आणि गम्भीर असे नगान्यांचे ध्वनि होऊ लागले. ते नगान्यांचे ध्वनि खवळलेल्या समुद्राच्या गर्जनेप्रमाणे होते व त्यानी सर्व आकाश व्यापलेले होते ॥ २५८ ॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org