Book Title: Mahapurana Part 2
Author(s): Jinsenacharya, Jindas Shastri
Publisher: Shantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
View full book text
________________
२५-२५०)
ज्वलन्महोदयस्तूप प्रकटीकृतवैभवः । नाट्यशालाद्वयेर्द्धाद्धिसंवद्धितजनोत्सवः ॥ २४२ धूपामोदित दिग्भागमहागन्धकुटीश्वरः । त्रिविष्टपणतिप्राज्यपूजार्हः परमेश्वरः ॥ २४३ त्रिजगद्वल्लभः श्रीमान् भगवानादिपुरुषः । प्रचक्रे विजयोद्योगं धर्मचक्राधिनायकः ॥ २४४ ततो भगवदुद्योगसमये समुपेयुषि । प्रचेलुः प्रचलन्मौलिकोटयः सुरकोटयः ॥ २४५ तदा सम्भ्रान्तनाकीन्द्रतिरोटोच्चलिता ध्रुवम् । जगन्नोराजयामासुर्मणयो दिग्जये विभोः ॥ २४६ जयेत्युच्चैगिरो देवाः प्रोर्णुवाना नभोऽङ्गणम् । दिशां मुखानि तेजोभिद्यतयन्तः प्रतस्थिरे ॥ २४७ जिनोद्योग महावात्याक्षुभिता देवनायकाः । चतुर्णिकायाश्चत्वारो महाब्धय इवाभवन् ।। २४८ प्रतस्थे भगवानित्यमनुयातः सुरासुरैः । अनिच्छापूर्विकां वृत्तिमास्कन्दन्भानुमानिव ॥ २४९ अर्धमागधिकाकार भाषापरिणताखिलः । त्रिजगज्जनता मंत्री सम्पादनगुणाद्भुतः ।। २५०
महापुराण
ज्यांचा प्रकाश चोहोकडे पसरला आहे अशा स्तूपांनी भगवंतानी आपले वैभव प्रकट केले होते. दोन नाट्यशालांच्या वाढलेल्या वैभवाच्या द्वारे प्रभूंनी सर्व लोकांचा आनन्द वाढविला होता || २४२ ।।
(६३
धूपांच्या योगाने जिच्यातील दिशांचे सर्व भाग सुगन्धित झाले आहेत अशा महागन्ध कुटीचे जे स्वामी आहेत व स्वर्गपति इन्द्राकडून केल्या जाणाऱ्या महापूजेला जे योग्य आहेत असे आदिजिनेश्वर विहारासाठी उद्युक्त झाले ।। २४३ ।।
त्रैलोक्याला अतिशय प्रिय, बाह्याभ्यन्तरलक्ष्मीसम्पन्न, धर्मचक्राचे श्रेष्ठ स्वामी भगवान् आदिपुरुष वृषभ जिनेश्वर हे विजयोद्योगासाठी निघाले ।। २४४ ॥
प्रभूंच्या विजयोद्योगाचा समय जवळ आला असता ज्यांच्या किरीटाचे अग्रभाग आनंदाने डुलत आहेत असे कोट्यवधि देव त्यानंतर निघाले || २४५ ।।
त्यावेळी अर्थात् प्रभूंच्या दिग्जयाच्या समयी हर्षाने गडबडलेल्या सुरेंद्राच्या मुकुटातून विचलित झालेले मणि असे वाटू लागले की जणु ते जगताला ओवाळीत आहेत ।। २४६ ।।
जय होवो, जय होवो असे मोठ्याने बोलणाऱ्या देवांनी आकाशरूपी अंगणास व्यापून टाकले व सर्वदिशांची मुखे आपल्या तेजानी उज्ज्वल करीत ते प्रस्थान करू लागले ।। २४७ ।। भवनवासी, व्यन्तर, ज्योतिष्क आणि स्वर्गवासी असे चार प्रकारचे देव व त्यांचे मुख्य स्वामी इन्द्र हे श्रीजिनेन्द्राच्या विजयोद्योगरूपी वावटळीने जणु चार समुद्राप्रमाणे अगदी क्षुब्ध झाले || २४८ ॥
याप्रमाणे सर्व देव व दैत्य ज्यांना अनुसरले आहेत असे ते भगवान् इच्छा नसताही सूर्याप्रमाणे विहार करू लागले ।। २४९॥
Jain Education International
प्रभूनी अर्धमागधी भाषारूप सर्वभाषांना बनविले व त्रैलोक्यातील सर्व जनतेमध्ये मैत्रीभाव निर्माण केला. असे अद्भूत गुण प्रभूमध्ये होते ।। २५० ॥
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org